Thursday, 9 November 2017

जलयुक्त शिवारची कामे जुन पर्यंत पूर्ण करा-प्रा. राम शिंदे

Ø  जलयुक्त शिवार विभागीय आढावा बैठक संपन्न
Ø  यशोगाथाचे संकलन करुन ठेवावे
Ø  टंचाईग्रस्त गावांचा प्राधान्याने समावेश करा
वर्धादि 9 (जिमाका)  जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नागपूर विभागात चांगली कामे झाली असून त्याचा फायदा शेतकरी  लोकांना  होतो आहे,  ही समाधानाची बाब आहे. 2016-17 मधील कामे 31 मार्च पर्यंत तसेच सन2017-18 मधून प्रस्तावित आराखडयातील कामे जुन 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मृद  जलसंधारण मंत्री प्राराम शिंदे यांनी दिले.
आज विकास भवन येथे नागपूर विभागातील सहा जिल्हयांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या तीन वर्षातील कामांचा आढावा घेण्यात आलायावेळी खासदार रामदास तडसजिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावीआमदारसमिर कुणावाररोहयो  जलसंधारण सचिव एकनाथ डवलेविभागीय आयुक्त अनुपकुमाररोहयो उपायुक्त पराग सोमनजिल्हाधिकारी शैलेश नवालनागपूर चे जिल्हाधिकारी सचिन कुर्वेभंडाराचे सुहास दिवसे , गोंदियाचेअभिमन्यू काळे,  गडचिरोलीचे एस.आर.नायकचंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्री उपस्थित होते.
प्राशिंदे म्हणाले किजलयुक्त  शिवार ही लोकचळवळ झाली आहेत्यामुळे यावर्षी कमी पाऊस असतांनाही त्याची झळ फारशी बसलेली नाहीअभियानाचे हे तिसरे वर्ष असून या योजनेविषयी लोकांचे अभिप्राय घेऊनत्यानुसार योजनेत दुरुस्ती करण्याची गरज आहेसन 2015-16 आणि 2016-17 मध्ये झालेल्या कामांमुळे अनेक यशोगाथा तयार झाल्या आहेगोंदिया जिल्हयात जलयुक्त शिवारमुळे जसे धानाचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढले तसेचइतर जिल्हयातही अशाच प्रकारचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेया सर्व यशोगाथा प्रत्येक जिल्हयांने माहितीपटछायाचित्र पुस्तिकायशकथा पुस्तिका स्वरुपात तयार करुन त्या प्रसारमाध्यमातून  चित्ररथाच्या माध्यमातूनलोकांपर्यंत पोहोचवाव्यातयामुळे निराशावादी लोकांनाही यातून प्रेरणा मिळून चांगले काम होत राहील.
सन2017-18 मध्ये निवडलेल्या गावांचा माथा ते पायथा या परिमानानुसार  आराखडा तयार करुन त्याला विभागीय आयुक्तांकडून तातडिने मान्यता घ्यावीतसेच ही कामे 15 जुन पर्यंत पूर्ण करण्यासाठी  नियोजन पध्दतीनेअंमलबजावणी करावीअशा सुचना त्यांनी यावेळी दिल्यातनालाखोलीकरण करतांना पाणी वाहून जाणार नाही याची दक्षता घेतांना मध्येमध्ये अडथळे करावेतसेच नाल्याच्या दोन्ही बाजुला पिचींग करावीम्हणजे माती पुन्हा नाल्यातवाहून येणार नाहीकंत्राटदारांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार नोडल अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत्यामुळे काम वेळेत पूर्ण  करणा-या कत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करावीमागील दोन वर्षातनिवडण्यात आलेल्या गावांमध्ये टंचाईग्रस्त  गावे सुटली असल्यास त्यांना प्रथम प्राधान्याने घेण्यात यावेप्रत्येक गावात काम सुरु करतांनाच कामाचा फलक लावण्यात यावा.                                     

ज्या जिल्हयांमध्ये जलयुक्त  शिवारचे कामासाठी यंत्राची आवश्यकता आहेतिथे जिल्हा नियोजन आराखडयातून खरेदी करावीतसेच 15 टक्के निधी  जलयुक्त शिवार कामासाठी राखून ठेवावा,  अशा सुचना सर्वजिल्हाधिका-यांना दिल्या.
प्रास्ताविक करतांना विभागीय आयुक्त यांनी जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत विभागात  झालेल्या कामाबाबत सविस्तर  माहिती दिलीविभागात सन 2015-16 मध्ये जलयुक्त शिवार अभियानात 1077 गावांमध्ये 23हजार 379 विविध जलसंधारणाची  कामे पूर्ण झाली असून 156 कामे प्रगतीपथावर आहेलोकसहभाग  शासकिय यंत्रणेच्या माध्यमातून तलाव  नाल्यामधून 75.23 लक्ष घन मीटर गाळ काढण्यात आला आहेया सन 2015-16मध्ये सर्व गावे जलपरिपूर्ण झालेली असून यातून 1 लाख 9 हजार 108 हेक्टर क्षेत्र सवंरक्षित सिंचनाखाली आले आहे.
सन 2016-17 मध्ये 915 गावांमध्ये 22 हजार 95 विविध जलसंधाराणाच्या कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होतेआज अखेंर 19 हजार 732 कामे पूर्ण झाले असून 843 कामे प्रगतीपथावर आहे. 915 पैकी 712 गावेजलपरिपूर्ण झाली असून यामुळे 43 हजार 713 हेक्टर संरक्षित सिंचनाखाली आले आहेसन 2017-18 मध्ये 757 गावाची निवड करण्यात आली असुन यामध्ये 21 हजार 120 काम प्रस्तावित केली आहेयापैकी 955 कामे सुरुझाली असून शासनाकडून 146 कोटी 65 लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहेअशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी नागपूरचे मुख्यकार्यकारी अधिकारी कांदबरी भगत ,चंद्रपूरचे  जितेंद्र पापळकरभंडाराचे मनोजकुमार सुर्यंवंशीगडचिरोलीचे शंतुन गोयलगोंदियाचे आर.एच.ठाकरेवर्धेच्या नयना गुंडे तसेच जलयुक्त शिवारअभियानाची अंमलबजावणी करणा-या यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होतेकार्यक्रमाचे संचालन अतुल  राजपायले  यांनी केले.
प्रारंभी जलयुक्त शिवार अभियान 2017-18 मधील गावामध्ये जनजागृती करणा-या चित्ररथाचा जलसंधारण मंत्री प्राराम शिंदे यांनी फीत कापून शुभारंभ  केलादरम्यान सकाळी पुलगाव येथील दारुगोळा भांडार यांच्याअखत्यारित असलेल्या नाचनगाव येथील दर्गा टेकडीवरील जलयुक्त शिवार कामाची पाहणी केलीयावेळी त्यांनी तिथे वृक्षरोपन करुन जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी सहकार्य करणारे दारुगोळा भंडारचे सर्व प्रशासकियअधिकां-याचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केलातसेच  कवठा रेल्वे येथील जलयुक्त शिवार अभियान कामाचीही पाहणी केली.   
                                                0000

No comments:

Post a Comment