Thursday, 9 November 2017

'दिलखुलास' कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे


            मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात  'ग्रामविकासातून महिला सबलीकरणाकडे या विषयावर ग्रामविकासमहिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची  मुलाखत आकाशवाणीवरून उद्या शुक्रवारदि. १० आणि शनिवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका उत्तरा मोने यांनी घेतली आहे.
            गेल्या तीन वर्षात ग्रामीण विकास विभाग आणि महिला व बालविकास विभागाअंतर्गत  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनामाझी कन्या भाग्यश्री योजनाउमेद अभियान,बचत गटांचे सक्षमीकरणकौशल्य विकासस्मार्ट ग्राम योजनाआपले सरकार सेवा केंद्रसर्वांसाठी घरेस्वच्छता अभियानकुपोषणमुक्त गावं या योजना प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या आहेत.या सर्व योजनांची  सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून श्रीमती मुंडे यांनी दिली आहे.

००००

No comments:

Post a Comment