Friday, 17 November 2017

बाळासाहेब ठाकरे स्मारकास भरघोस निधी देऊ- पालकमंत्री विजय देशमुख

सोलापूर,दि.17 : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाच्या कामास लवकरात लवकर प्रारंभ करावाअसे पालकमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले.
येथील शिवराम चौक येथे महानगरपालिकेमार्फत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी श्री. देशमुख बोलत होते. कार्यक्रमाला महापौर शोभा बनशेट्टीउपमहापौर शशिकला बत्तूलमहापालिका आयुक्त अविनाश ढाकणेशिवचरित्र अभ्यासक डॉ. शिवरत्न शेटेस्थायी समितीचे सभापती संजय कोळीसुरेश पाटीलमहेश कोठे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.देशमुख म्हणालेस्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक राज्यात प्रथम सोलापुरात होत आहेही सोलापुरसाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. स्मारकाच्या रुपाने बाळासाहेबांचे विचार आणि कार्य पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. स्मारकाच्या कामासाठी लागणारा निधी राज्यातील आमदार-खासदार यांच्या फंडातून उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जातील. बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यविचार फार मोठे आहेत. त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे असून त्यांनी नेहमीच सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका बजावली आहे. सोलापुरातील स्मारक त्यांचे कार्यविचारांचे प्रतिक व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महापौर श्रीमती बनशेट्टी म्हणाल्याबाळासाहेब ठाकरे प्रत्येकाच्या मनात रुजलेले व्यक्तीमत्व होते. महापालिकेमार्फत त्यांचे स्मारक सोलापुरात उभारले जाणे ही सोलापुरसाठी अभिमानाची गोष्‍ट आहे. सुमारे 11 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या स्मारकासाठी निधीची कमतरता होती. पण यातून मार्ग काढण्यात येणार आहे. स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मारकामुळे सोलापुरच्या वैभवात भर पडणार आहे.
डॉ.शेटे यांनी बाळासाहेबांच्या कार्य आणि विचारांची देणगी महाराष्ट्राला मिळाली असल्याचे सांगितले.
००००

No comments:

Post a Comment