नागपूर, दि. 14 : भारताचे पहिले
प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात
आज त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी के. एन. के. राव
यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन
केले.
यावेळी
उपजिल्हाधिकारी रविंद्र खजानजी, प्रकाश पाटील, सुभाष चौधरी, अधिक्षक प्रदिप कापसे,
तहसीलदार जे. बी. पोहणकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
****

No comments:
Post a Comment