नागपूर दि.07 : डॉ. झाकीर हुसेन
मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत 2018-19 करीता
अनुदान प्राप्त करण्यासाठी दिनांक 14 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव
सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी मि. भा. नारिंगे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मदरसांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सुरु
करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीद्वारे
जिल्ह्यातील पात्र मदरशांना शासकीय अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव सादर करता येणार
आहे. पात्र मदरसा चालकांनी दिनांक 14 ऑगस्टपर्यंत
जिल्हाधिकारी कार्यालय (गृह शाखा) नागपूर येथे प्रस्ताव सादर करावे.
शासन अनुदान प्राप्त करण्यासाठी अल्पसंख्यांकबहुल खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक
प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी देखील दिनांक 14 ऑगस्टपर्यंत
प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे.
विहित मुदतीत सादर
प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणी करून दिनांक 15 सप्टेंबरपर्यंत शासनास पाठविण्यात येणार असल्याची माहिती
जिल्हा नियोजन अधिकारी मि. भा. नारिंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment