Thursday, 30 August 2018

राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या उपाध्यक्षा श्रीमती अनुसया उईके नागपूर दौऱ्यावर


नागपूर, दि. 30 : राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या उपाध्यक्षा श्रीमती अनुसया उईके व सदस्य  माया इवनाते या नागपूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 31 ऑगस्ट रोजी रात्री  9.40 वाजता दिल्लीवरुन येथे आगमन व रविभवनला मुकाम. शनिवार, दिनांक 1 सप्टेंबर रोजी पेंच राष्ट्रीय उद्यान व अनुसूचित क्षेत्रात भेट व पाहणी. सायंकाळी 4.30 वाजता रविभवन येथे छत्री अनुसूचित जनजाती विकास समिती सोबत बैठक.
रविवार, दिनांक   2  सप्टेंबर रोजी  नागपूर येथून विमानाने रात्री 8.25 वाजता दिल्लीकडे प्रयाण.
***

No comments:

Post a Comment