मुंबई, दि. 21
: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’
कार्यक्रमात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य ग्राहक
तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे यांची विशेष मुलाखत प्रसारित
होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून शनिवार दि. 22 आणि सोमवार दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक हेमंत
बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
24 डिसेंबर
राष्ट्रीय ग्राहक दिन, महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार
निवारण आयोगाची स्थापना व आजवरच्या वाटचालींबद्दल माहिती, आयोगाच्या
कामाचं स्वरुप, जिल्हास्तरावर आयोगाची रचना, आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींचे स्वरुप व तक्रार निवारणाचं प्रमाण, ग्राहकांना देण्यात आलेले आठ ग्राहकाधिकार, आयोगाविषयी
सर्वसामान्य ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न तसेच आयोगाशी
ग्राहकांना तक्रारी करण्यासाठी संपर्क साधायचा असल्यास संपर्क क्रमांक याविषयीची
सविस्तर माहिती न्या. श्री. भंगाळे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment