नंदुरबारला विमानतळ
उभारणीबाबत मंत्रालयात बैठक
मुंबई, दि. 30 :
नंदुरबारमध्ये विमानतळ उभारणी करण्यासंदर्भात पाहणी करण्यासाठी लवकरच विमान
प्राधिकरणाचे अधिकारी येणार आहेत. धुळे येथील गोंदूर विमानतळही अत्याधुनिक करून
तिथे प्रवाशी विमान वाहतूक आणि मुंबई फ्लाईंग क्लबच्या धर्तीवर क्लब सुरू
करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या पुढाकारातून प्रयत्न केले जात आहे. या
संदर्भातील महत्वपूर्ण बैठक मंगळवारी मंत्रालयात झाली. नंदुरबार आणि धुळे हवाई
नकाशावर आणण्यासाठी मंत्री जयकुमार रावल आग्रही आहेत.
गोंदूर विमानतळवर "सेफ
लँडिंग अँड डेव्हलपमेंट" या धर्तीवर सुधारणा केल्या जाणार आहेत.
सध्या गोंदूर विमानतळाचा रनवे
1 हजार 380 मीटर लांबीचा आहे. त्यामुळे 19 सीटर विमानच येथे उतरू शकते. इथून
प्रवाशी विमान वाहतूक सुरू करायची असेल तर रनवे 1 हजार 700 ते 1 हजार 800 मीटर
असणे आवश्यक आहे. म्हणजे 72 सीटर विमान उतरू शकेल. कमर्शियल फ्लाईटसाठी नाईट
लँडिंगसाठी विमानतळ सक्षम असणे आवश्यक आहे.
तसेच गोंदूरला पर्यायी रनवे निर्माण केला गेला तर एअर स्पोर्टसाठी 2/3 सीटर
उतरण्याची सोय केली जाईल. बॉम्बे फ्लाईंग क्लबच्या धर्तीवर हा मोठा निर्णय होऊ
शकतो. धुळे नंदूरबारला भविष्यात उद्योग आणि पर्यटन दृष्टीने मोठी संधी आहे.
त्यासाठी विमानतळ प्रगतीपथावर असणे आवश्यक आहे.
1994 नंतर प्रथमच धुळे विमानतळ प्रगती संदर्भात बैठक झाली. साक्रीचे आमदार
डी. एस. अहिरे, विमान प्राधिकरण अधिकारी श्री. काकाणी यांच्यासह संबंधित विविध विभागांचे
वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
खानदेशसाठी जागतिक हवाई
नकाशावर असलेल्या मुंबई,
सुरत, इंदौर हेच प्रवाशी विमानतळ आहेत. धुळे
नंदुरबारमध्ये विमानतळ झाल्यास या सर्व शहरांचा मध्यबिंदू साधला जाईल. खान्देशात
येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना हवाई सेवेचा पर्याय उपलब्ध होईल. तसेच भविष्यात
उडाणसारख्या योजनांचा लाभ घेऊन इथून प्रवाशी विमानसेवा सुरू होईल अशी अपेक्षा
व्यक्त केली जाते आहे.
००००
No comments:
Post a Comment