Monday, 25 February 2019

‘जय महाराष्ट्र’ मध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी


            मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांची 'प्रभावी वैद्यकीय शिक्षण : तत्पर सेवा' या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या मंगळवार दि. 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.
            राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण व संशोधनाविषयीची सद्य:स्थिती, राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याकरिता शासनाचे धोरण, वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणारे नवीन अभ्यासक्रम, आयुष संचालनालयामार्फत सुरू असलेले उपक्रम, कर्करोग या आजाराविषयी करण्यात येत असलेली जनजागृती, पब्ल‍िक प्रायव्हेट पार्टनरशीपद्वारे राबविण्यात येत असलेले उपक्रम आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. मुखर्जी यांनी जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.
000




No comments:

Post a Comment