Friday, 24 January 2020

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा गणेश पेठ बसस्थानक केंद्रावर होणार आरंभ

·         नागपुरात रविवारपासून पाच ठिकाणी मिळणार शिवभोजन थाळी

                नागपूर, दि. 24 :  राज्य शासनाच्या वतीने सुरु करण्यात येणाऱ्या शिवभोजन थाळी या उपक्रमाचा  रंभ गणेश पेठ बसस्थानक येथील केंद्रांवर रविवार दिनांक  26 जानेवारी रोजी पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे. 
         राज्यातील जनतेला अवघ्या दहा रुपयांत जेवण देण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून प्रारंभ होत आहे. या थाळीचे वाटप करण्यासाठी नागपूर शहरात नऊ संस्थांची निवड करण्यात आली असून या संस्था दररोज 750 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी भास्कर तायडे यांनी दिली.  
         शिवभोजन योजनेंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदानप्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्याएक वाटी भाजीएक वाटी वरण आणि भाताचा समावेश असलेली जेवणाची थाळी 10 रुपयांत मिळणार आहे. त्यामुळे या थाळीचा वापर गरजू व गरीब नागरिकांसाठी होणार आहे. 
       शिवभोजन थाळी शहरातील यशवंत लक्ष्मण पांडे यांच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सह. संस्था डागा रुग्णालय 150 थालीगणेश पेठबसस्थानक येथे किशोर रतनलाल कुमेरीया यांच्या श्रीमती जानकीदेवी बहु. संस्था आणि हर्षल गणेश शिंदे यांच्या श्री गणेश भोजनालयात प्रत्येकी 75 शिव भोजन थाली मिळणार आहे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल येथे मुलचंद हिरामन सोनवानेश्री गुरुदेव भोजनालयात आणि हर्षाली पाटमासेमंथन महिला बचत गटाकडून प्रत्येकी 75 थाळी  गरजुंना भोजन मिळणार आहे.
       कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रोशन लारोकरसी. आर. ट्रेडर्स आणि पुरुषोत्तम तेलमासरेतेलमासरे भोजनालय यांच्याकडे प्रत्येकी 75 शिवभोजन थाळी  उपलब्ध होणार आहे. तसेच मातृसेवा संघ हॉस्पिटल येथे संजय दामोदर कसोधन यांच्या मातोश्री जिजाऊ माँसाहेब बहुद्देशीय संस्था आणि सुरेखा सी. खोब्रागडे यांच्या सुविधा बहुद्देशीय संस्थेकडून प्रत्येकी 75 थाळी मिळणार असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी भास्कर तायडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.     
*****

No comments:

Post a Comment