नागपूर, दि. 9 : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवणे व उद्याने विभागातर्फे 51 वे वार्षिक पुष्प प्रदर्शन दिनांक 25 व 26 जानेवारी रोजी विधान भवन परिसरात आयोजित करण्यात आले आहे. पुष्प प्रदर्शन स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन उपवणे व उद्याने विभागाचे सहायक संचालक संदीप जाधव यांनी केले आहे .
वार्षिक पुष्प प्रदर्शन दिनांक 25 व 26 जानेवारी 2026 रोजी विधान भवन येथे आयोजन केलेले आहे. पुष्पप्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रवेश फॉर्म दिनांक 12 जानेवारी सोमवार पासून (शासकीय सुट्टीचे दिवस वगळता सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत शासकीय रोपवाटिका, जुने सचिवालय परिसर, सिव्हिल लाइन, नागपूर येथे उपलब्ध आहेत .
उद्यान स्पर्धेसाठी प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी असून, पुष्पप्रदर्शनासाठी प्रवेश फॉर्म शुल्कासह भरण्याची अंतिम तारीख दिनांक 22 जानेवारी आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0712-2561425 वर संबंधितांनी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे सहायक संचालक, उपवने व उद्याने संदीप जाधव यांनी कळविले आहे.
उद्यान प्रेमींनी तसेच जनतेने याची नोंद घ्यावी व जास्तीत जास्त
प्रवेशिका नोंदवून सहभाग घ्यावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
00000

No comments:
Post a Comment