Wednesday, 25 November 2020

 जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन





नागपूर, २६: जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी उद्देशिकेचे वाचन केले.
अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, सुजाता गंधे, मीनल कळसकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****

 मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमितीक रजा

       नागपूर, २५: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधार मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीकरीता 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुख तसेच खाजगी औद्योगिक आस्थापनामधील अधिकारी व कर्मचारी मतदार यांना एक दिवसाची विशेष नैमितीक रजा मंजूर करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी  रविंद्र खजांजी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. सदर रजा ही अनुज्ञेय नैमितीक रजेव्यतिरिक्त असणारआहे.

 पदवीधर मतदार संघातील 80 व 104 केंद्रांना सहायकारी मतदान केंद्र म्हणून मान्यता

नागपूर, दि.25 : भारत निवडणूक आयोगाकडून नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाची  द्विवार्षिक निवडणूक 1 डिसेंबर रोजी होत असून निवडणुकीच्या अनुषंगाने कोविड-19 संदर्भातील सूचनान्वये मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडे सहायकारी मतदान केंद्राचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेता सहायकारी मतदान केंद्र म्हणून मतदार संघातील 80 व 104 प्रस्तावित करण्यात आले होते. या केंद्राना आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. त्यानुषंगाने नागपूर विभाग पदवीधर मतदान केंद्राच्या यादीत इंग्रजी व मराठी मध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी  कळविले आहे.

00000

 ऑनलाईन अनुज्ञप्ती चाचणी शिबिराचे तालुकानिहाय आयोजन 

नागपूर, २५: जिल्ह्यातील  ग्रामीण भागामध्ये‌ प्रादेशिक परिवहन विभागाकडून ऑनलाईन शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चाचणीचे डिसेंबरमध्ये तालुकानिहाय आयोजन करण्यात आले आहे. सावनेर ४ डिसेंबर, नरखेड १०, काटोल १४, उमरेड १८, मौदा २३ आणि रामटेक येथे २८ डिसेंबर २०२० रोजी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.