- 2 हजार आसन क्षमता
- 73 कोटी रुपये खर्च
नागपूर, दि. 15 : येथील महानगर पालिकेच्या वतीने मध्य,पूर्व आणि दक्षिण नागपूरातील जनतेच्या सोयीसाठी रेशिमबाग मैदान परिसरात कविवर्य सुरेश भट यांच्या नांवाने भव्य सभागृह बांधण्यात येणार आहे. या सभागृहाच्या बांधकामासाठी सुमारे 73 कोटी रुपये खर्च येणार असून या सभागृहाच्या बांधकामाची पहाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी केली.
यावेळी महापौर प्रविण दटके, मनपाचे आयुक्त श्रावण हर्डिकर, मनपाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, शहर अभियंता तालेवार अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मनपातर्फे बांधण्यात येणारे सभागृह हे नागपूर शहराच्या वैभवात भर घालणारे असून या सभागृहाच्या बांधकामावर आतापर्यंत 35 कोटी रुपये खर्च झाला आहे. यातील भव्य प्रेक्षागृहाची एकुण प्रेक्षक क्षमता 2 हजार असून तळ मजल्यावर 1400 प्रेक्षक तर बाल्कनी मध्ये 600 प्रेक्षक क्षमता आहे. या शिवाय भव्य प्रेक्षागृह मंच असून 12 ग्रीन रुम्स, 2 व्हिआयपी रुम्स आहेत. नागपूर शहरातील सर्वात मोठ्या क्षमतेचे हे भव्य सभागृह राहाणार आहे. या सभागृहाची उंची 27 मिटर आहे. एकुण बांधकाम 9870 चौरस मीटरचे आहे. याशिवाय या सभागृहात प्रशस्त कॉन्फरन्स रुम, प्रदर्शन हॉल, 20 व्यक्ती एकावेळी वाहून नेण्याची क्षमता असलेली लिफ्ट, 200 केवी क्षमतेची सोलर वीज निर्मिती होईल अशी यंत्रणा, संपूर्ण सभागृह वातानुकूलित आहे. अपंगासाठी स्वतंत्र प्रसाधन गृह आहे. उच्च दर्जाची ध्वनीक्षेपण व विद्यूत व्यवस्था असलेल्या या सभागृहाची व त्यातील सर्व सोयी सुविधांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहाणी करुन समाधान व्यक्त केले. सभागृह बांधकामाची आर्किटेक्ट अशोक मोखा यांना आवश्यकत्या सुचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या.
प्रारंभी मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्य अभियंता उल्हास देबडवार आणि आर्किटेक्ट मोखा यांनी सभागृह बांधकामाची माहिती दिली. नियोजित सभागृहाची सिडी यावेळी मुख्यमंत्र्यांना दाखविण्यात आली.
00000


No comments:
Post a Comment