Wednesday 23 October 2019

विधानसभा निवडणुकीसाठी 3 लाखाहून अधिक सुरक्षा जवान सुसज्ज


मुंबईदि. 18 : विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी राज्य आणि केंद्राचे पोलीस दल सुसज्ज झाले असून सुमारे तीन लाखाहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात विशेष सुरक्षा व्यवस्था केली असून तीन हेलिकॉप्टर व ड्रोन तैनात करण्यात आले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक तथा विधानसभा निवडणुकीसाठीचे सुरक्षा विषयक नोडल अधिकारी मिलिंद भारंबे यांनी दिली.
            मतदान व मतमोजणीच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नयेशांततेत सर्व प्रक्रिया पार पाडावीयासाठी राज्य पोलीस दलातील 2 लाख पोलीस अधिकारीकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलकेंद्रीय राखीव पोलीस दलनागालँडचे महिला पोलीस दल आदी केंद्रीय सुरक्षा दलाच्या 350 कंपन्या (प्रत्येक कंपनीत शंभर अधिकारी/जवानांचा समावेश)राज्य राखीव पोलीस दलाच्या 100 कंपन्याराज्य गृहरक्षक दलाचे 45 हजार जवान अहोरात्र तैनात करण्यात आल्या आहेत. याबरोबरच इतर राज्यातील सुमारे 20 हजार गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात आली आहे.
००००

Tuesday 22 October 2019

जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील 443 मतदान केंद्रांवर होणार वेबकास्टींग





नागपूर दि. 20 :  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 मध्ये जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील 4 हजार 412 मतदान केंद्रांपैकी 443 मतदान केंद्रांवर उद्या सोमवारी 21 रोजी वेबकास्टींग होणार आहे. तर 3 हजार 969 मतदान केंद्रे ही बेवकास्टींगशिवाय राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
 जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज बचत भवन सभागृहात वेबकास्टींग प्रक्रियेची पाहणी केली. जिल्ह्यातील ग्रामीण सहा विधानसभा मतदारसंघात काटोल 328 मतदान केंद्रांपैकी 32, सावनेर 366 मतदान केंद्रांपैकी 37, हिंगणा 434 मतदान केंद्रांपैकी44, उमरेड 384 मतदान केंद्रांपैकी 49, कामठी 494 मतदान केंद्रांपैकी 48 आणि रामटेक 357 मतदान केंद्रांपैकी 36  असे एकूण 2 हजार 363 मतदान केंद्रांपैकी 236 मतदान केंद्रांमध्ये वेबकास्टींग होणार आहे.
शहरातील नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 372 मतदान केंद्रांपैकी 37, दक्षिण 344 मतदान केंद्रांपैकी 35, पूर्व 336 मतदान केंद्रांपैकी 35, मध्य 305 मतदान केंद्रांपैकी 31, पश्चिम 332 मतदान केंद्रांपैकी 33 आणि उत्तर 360 मतदान केंद्रांपैकी 36 असे शहरातील 2 हजार 49 मतदान केंद्रापैकी 207 मतदान केंद्रांवर वेबकास्टींग होणार आहे. तर 1 हजार 842 मतदान केंद्र ही वेबकास्टींगशिवाय मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
*****

नवलेवाडी येथील मतदान प्रक्रिया सुरळीत


सातारा, दि.22 : विविध इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांमध्ये मतदान केंद्र क्रमांक 250 नवलेवाडी ता. खटाव जिल्हा सातारा येथे 45 सातारा लोकसभा पोटनिवडणूक व 257 कोरेगांव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता मतदान प्रक्रियेबाबत बातमी प्रसिद्ध झाली. दिनांक 21 / 10 / 2019 रोजी सकाळी 5.30 वाजता उमेदवार प्रतिनिधी श्री. दिपक रघुनाथ पवार (एनसीपी) व श्री. दिलीप आनंदराव वाघ (एनसीपी) हे अभिरुप मतदानावेळी उपस्थित होते, अभिरूप मतदानावेळी व्हीव्हीपॅट मतदान चिठ्ठीच्या मुद्रणाबाबत दोन्ही प्रतिनिधींनी आक्षेप घेतला नाही. किंबहुना सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरु असताना कोणत्याही मतदारांनी असा आक्षेप घेतला नाही. श्री. दिपक रघुनाथ पवार यांनी दुपारी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना संबंधित केंद्राध्यक्ष यांनी चाचणी मतदानासाठी जोडपत्र 15 भरुन देणेबाबत सांगितले तथापी त्यांनी तसे करण्यास नकार दिला. तद्नंतर सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती.
            सदर तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नाही. तसेच अशी कोणतीही घटना घडलेली नाही. असे कीर्ती नलावडे, निवडणूक निर्णय अधिकारी 257-कोरेगांव विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, कोरेगांव यांनी कळविले आहे.
000

जिल्हा कौशल्य विकास कार्यालयात लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अधिसूचना प्राप्त

नागपूरदिनांक 22 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन केंद्रनागपूर या कार्यालयास महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचना प्राप्त झाली आहे.
 या कार्यालयामार्फत पात्र व्यक्तींना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांची नाव नोंदणी नियोक्त्यांची नोंदणीरिक्त पदे अधिसूचना यासह सर्व सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. लोकसेवा हक्क अधिनियम  अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन संबंधित सार्वजनिक प्राधिकरण म्हणून कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता संचालनालयाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयामार्फत नियत कालमर्यादापदनिर्देशित अधिकारीप्रथम व व्दितीय अपीलीय अधिकारी अधिसूचित करण्यात आले आहेत.
 ही लोकसेवा रिअल टाईम इलेक्ट्रानिक सर्विस मार्फत www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलव्दारे देण्यात येत आहेअशी माहिती कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता संचालनालयाचे आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी पत्रकाव्दारे कळविली आहे.
*******

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जमात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव आमंत्रित

नागपूरदि. 22 : अनुसूचित जमाती  प्रमाणपत्र तपासणी समितीनागपूर या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अंतर्भूत असलेल्या नागपूरवर्धाभंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील  विविध शैक्षणिक  संस्थांमध्ये  प्रवेशित विद्यार्थ्यांनी अनुसूचित जमातीचे जमात प्रमाणपत्र तपासणी करण्याचे  प्रस्ताव दिनांक 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत समितीच्या www.etribevalidity.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेअसे आवाहन समितीचे सहआयुक्त विनोद पाटील यांना केले आहे.
विविध शैक्षणिक संस्थामध्ये सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षामध्ये वैद्यकीयअभियांत्रिकी व सर्व प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश घेण्यास च्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित प्रस्ताव सादर करावे.
शैक्षणिक संस्थामध्ये  प्रवेश घेतलेल्या तसेच  वर नमद अभ्यासक्रमासाठी च्छुक  असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित शैक्षणिक संस्थेने विहित कालमर्यादेत पुरस्कृत करण्याची जबाबदारी संस्थांची आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी देखील त्यांचे जमात प्रमाणपत्र मुदतीत तपासणी होण्याकरिता तसेच प्रवेशापासून वंचित होवू नये यासाठी त्यांचे जमात प्रमाणपत्र तपासणीचे प्रस्ताव शिक्षण घेत असलेल्या शैक्षणिक संस्थेमार्फत विहीत कालावधीत समितीस सादर होईलयाची दक्षता घ्यावी.
ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जमातीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या सर्व संस्था प्रमुखांना व शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी हे अभियान राबविण्यास सहकार्य करावे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रस्तावात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी समिती कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 0712-25600031 यावर संपर्क साधावाअसे आवाहन अनुसूचित जमाती  प्रमाणपत्र तपासणी समिती समितीचे सहआयुक्तांनी यांना केले आहे.
                                                                                                            ********   

सरासरी 58 ते 59 टक्के मतदानाचा अंदाज



विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019

नागपूर,दि.21 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनातर्फे 4 हजार 412 मतदान केंद्रांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.78 टक्के मतदान झाले असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 58 ते 59 टक्के मतदानाचा अंदाज आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे मतदान संपल्यानंतर प्राप्त होणाऱ्या एकूण मतदानाच्या आकडेवाडीनुसार मतदानाची टक्केवारी रात्रौ उशिरापर्यंत प्राप्त होईल.
विधानसभा मतदारसंघनिहाय सायंकाळी उशिरापर्यंत प्राप्त झालेल्या मतदानाच्या एकूण अंदाजानुसार 48 काटोलमध्ये – 64.55, 49 सावनेर – 66.25, 50 हिंगणा – 57.15, 51 उमरेड – 68.03, 52 नागपूर दक्षिण-पश्चिम – 49.51, 53 नागपूर दक्षिण – 48.94, 54 नागपूर पूर्व – 53.18, 55 नागपूर मध्य – 50.13, 56 नागपूर पश्चिम – 48.45, 57 नागपूर उत्तर – 50.71, 58 कामठी – 57.20, 59 रामटेक – 62.69 असे एकूण 12 विधानसभा मतदारसंघात 55.72 टक्के मतदानाचा अंदाज आहे. मतदानाची टक्केवारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अंतिम झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी पाठविण्यात येईल. उपरोक्त मतदानाची टक्केवारी मतदान संपण्यापूर्वीची असून अंतिम टक्केवारीत वाढ होणार आहे.

** * * * **

दक्षता जागृती सप्ताह 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान


यावर्षीची संकल्पना इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ
मुंबई, दि. 22 : राज्यात यावर्षीचा दक्षता जनजागृती सप्ताह दि. 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ईमानदारी- एक जीवनशैली’(इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ) या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात येणार आहे.
            भ्रष्टाचाराविरुद्ध जागृती निर्माण करण्यासाठी राज्यात सन 2000 पासून दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला जातो. भ्रष्टाचार निर्मुलन, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा तसेच भ्रष्टाचाराचे गंभीर परिणाम आणि धोके याविषयी परिणामकारक जनजागृतीचे माध्यम म्हणून केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) जनजागृती सप्ताहाकडे विशेष लक्ष केंद्रित करते. यावर्षी आयोगाने इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफया संकल्पनेनुसार जनजागृतीवर भर देण्याचे निश्चित केले आहे.
            राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था व स्वायत्त संस्थांमार्फत सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ होईल.  त्यानंतर राज्यपालांचा संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येणार असून हा संदेश राज्यातील जनतेसाठी प्रसृत करण्यात येईल.
            या सप्ताहाच्या निमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यालयाच्या दर्शनी भागात व मोक्याच्या ठिकाणी भित्तीपत्रक, कापडी फलक लावण्यात येणार आहेत. कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, निबंधस्पर्धा, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विशेष पुस्तिकांचे प्रकाशन करणे तसेच केंद्रीय दक्षता आयोगाच्या http://www.cvc.nic.in या संकेतस्थळावरील जनजागृती साहित्याचे जनतेमध्ये वितरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
            राज्यातील अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी दक्षता जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.
000

Monday 21 October 2019

नागपूर शहरात सर्वत्र उत्साहात मतदान


·         तीन पिढ्यांचे एकत्रित मतदान
·         सखी मतदान केंद्रावर सखींचे उत्साहात स्वागत
·        नवमतदारांमध्ये मतदानाचा विशेष उत्साह
नागपूरदि. 21: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी नागपूर शहरात सर्वत्र उत्साहात मतदान करण्यात आले. मतदान करण्यामध्ये वयोवृद्ध, दिव्यांग यांचा विशेष सहभाग होता. तसेच प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतदारांमध्ये मतदान करण्याचा विशेष उत्साह जाणवला. दिवसभर शहरामध्ये  सर्वच मतदान केंद्रांमध्ये उत्साहात मतदान पार पडले.
तीन पिढ्यांचे एकत्रित मतदान
अजनी येथील माऊंट कार्मेल शाळेतील आदर्श मतदान केंद्र 52/144 येथे आज कुरमी कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी एकत्रित मतदान केले. यामध्ये आई श्रीमती फुलवती कुरमी (वय 80 वर्षे), अंध मुलगा रघुवीर कुरमी (वय 56 वर्षे) तसेच नातू आशुतोष कुरमी (वय वर्षे 23) यांनी मतदानाचा हक्क बजावला.
तसेच मोतीबाग येथील स्वस्तिक माध्यमिक विद्यालय येथे देखील आई श्रीमती देवकाबाई श्रीवास (वय वर्षे 95), मुलगी श्रीमती नर्मदा श्रीवास (वय वर्षे 65), नातू मनोज श्रीवास (वय वर्षे 44), नातसून श्रीमती गायत्री श्रीवास (वय वर्षे 32) या तीन पिढ्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
सखी मतदान केंद्रावर सखींचे उत्साहात स्वागत
प्रताप नगर येथील प्रताप नगर शिक्षण संस्थेच्या ‘सखी मतदान केंद्रा’वर केंद्राध्यक्ष श्रीमती सोनाली पवार यांनी महिलांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. दक्षिण-पश्चिम मधील या सखी मतदान केंद्रामुळे  महिलांमध्ये मतदानासाठी विशेष उत्साह जाणवला.
नवमतदारांमध्ये मतदानाचा विशेष उत्साह
सोनेगाव येथील प्रियदर्शनी शिक्षण महाविद्यालयातील मतदान केंद्रावर पूर्वा देशपांडे, शिवानी जोशी, वैभवी जोशी तसेच वैभव जोशी यांना अठरा वर्षे पूर्ण झाल्यामुळे यांनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाचे एक मत देखील महत्वपूर्ण असल्याचा कौल या नवमतदारांनी दिला.
सोनेगाव येथील प्रियदर्शनी महाविद्यालयातील शिक्षिका श्रीमती शुभांगी भोयर या स्वत: दिव्यांग असून देखील त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. शिवाय मतदानासाठी आईला देखील मतदान केंद्रावर आणून त्यांची  मदत केली. येथेच सुनील वसू (वय वर्षे 49) यांनी देखील व्हील चेअरवर येवून मतदानाचा हक्क बजावला. 
आझाद कॉलनी, ताजबाग येथील मलिक उर्दू हायस्कुल येथे मुस्लीम बंधू-भगिनींनी  उत्साहात मतदान करुन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी श्रीमती रेहाना परवीन, श्रीमती शाहीस्ता अंजुम, श्रीमती सलमा कुरेशी, श्रीमती नासिरा परवीन तसेच श्रीमती यास्मीन अख्तर यांनी  मतदानाचा हक्क बजावला आणि  आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले, असे त्यांनी सांगितले.
चिबली ले-आऊट येथील माधवी उच्च प्राथमिक शाळेत दीक्षा घेतलेले महानुभाव पंथी यदुराज बेलसरे (वय वर्षे 73), श्रीमती सुमन बेलसरे (वय वर्षे 70) तसेच श्रीमती सुमित्रा राखोंडे (वय वर्षे 80) यांनी मतदानाचा हक्क बजावला. महानुभाव पंथी यदुराज बेलसरे म्हणाले, आम्ही संसारातून जरी संन्यास घेतला तरी मतदान हे आमचे मुख्य कर्तव्य समजून पार पाडले.
*******

5 वाजेपर्यंत जिल्ह्यात 53.98 टक्के मतदानाचा अंदाज

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2019

 नागपूर,दि.21 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.98 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचा अंदाज आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या अंदाजानुसार 48-काटोलमध्ये – 62.01, 49-सावनेर – 63.33, 50 हिंगणा – 53.61, 51 उमरेड – 66.30, 52 नागपूर दक्षिण-पश्चिम – 47.27, 53 नागपूर दक्षिण – 47.77, 54 नागपूर पूर्व – 51.29, 55 नागपूर मध्य – 47.91, 56 नागपूर पश्चिम – 47.15, 57 नागपूर उत्तर – 48.41, 58 कामठी – 55.42, 59 रामटेक – 59.95 असे एकूण 12 विधानसभा मतदारसंघात 53.98 टक्के मतदानाचा अंदाज आहे.

** * * * **


विधानसभा निवडणूक : मतदानाची टक्केवारी



जिल्हानागपूर विभाग
लोकसभा मतदार संघाचे नांव
एकूण मतदार
मतदानाची टक्केवारी
अंतिम टक्केवारी
सकाळी 7 ते 9
सकाळी 9 ते 11
सकाळी 11 ते 1
दुपारी 1 ते 3
दुपारी3 ते 5
सायं. 5 ते 6
वर्धा
1149758
5.48
8.36
15.42
12.58
53.98


भंडारा
991890
3.89%
-
31.45
50.56
64.01


नागपूर
4171420
7.26%
19.74%
29.78
40.07
53.98


गोंदिया
1098270
9.06%
23.70
40.33
46.36



गडचिरोली
775369
14.05
33.40
50.87


-
-
चंद्रपूर
1876351
16.79%
-
31.56
42.31
55.84


एकूण टक्केवारी
-