Thursday 31 August 2017

ग्राम विकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा दौरा



नागपूर, दि. 31 :   ग्राम विकास आणि महिला व बालविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचे रविवार, दिनांक 3 सप्टेंबर रोजी मुंबईहून रात्री 8.10 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व रविभवकडे प्रयाण. रात्री रविभवन येथे मुक्काम.
सोमवार, दिनांक 4 सप्टेंबर रोजी  सकाळी 8.00 वाजता मोटारीने नरखेड(जि. नागपूर) कडे प्रयाण. सकाळी 9.00 वाजता नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील  विविध विकास कामांच्या भूमिपूजन व ‘महाराजस्व घरचलो अभियान’शुभारंभाच्या कामास उपस्थिती. सकाळी 9.30 वाजता मोटारीने त्यांचे मोर्शी (जि. अमरावती) कडे प्रयाण. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व वरुड येथील कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे वरुड येथून दुपारी 2.00 वाजता काटोल(जिल्हा नागपूर) कडे प्रयाण.
दुपारी 2.30 वाजता क्रीडा संकुल काटोल येथे आयोजित महिला बचत गट प्रशिक्षण मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 4.00 वाजता काटोल तालुक्यातील लिंगापार्डी ते अमरगोंदी ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.00 वाजता  मौ. कोढाळी, ता. काटोल (जि. नागपूर) येथील जाम नदी पुनरुज्जीवन कामाची व जलपूजन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8.25 वाजता नागपूर विमानतळावरुन त्यांचे मुंबईकडे प्रयाण.
000000

जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक संपन्न



नागपूर, दि. 31 :   प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियानातंर्गत जिल्ह्यातील युवकांना विविध कोर्सेसचे शिक्षण देण्यात येत आहे. त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळत आहे. कौशल्य विकासाअंतर्गत नाविण्यपूर्ण कोर्सेसचे शिक्षण देवून जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी यावेळी  सांगितले.
            जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली रवीभवन येथे पार पडली.
             यावेळी आमदार गिरीश व्यास, आमदार समीर मेघे, माजी आमदार मधुकर किंमतकर, महापौर श्रीमती नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, विदर्भ इंडस्ट्रियल असोसीएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, जिल्हा परिषद  अर्थ व शिक्षण सभापती ऊकेश चव्हाण, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते.
            जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचा उद्देश असून त्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरु आहे. या माध्यमातून अनेक युवकांना विविध क्षेत्रामध्ये रोजगार मिळाला आहे. असेही खासदार विकास महात्मे यांनी सांगितले.
            महानगर पालिकेच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत पंडीत दिनदयाल उपाध्याय  अंत्योदय योजने अंतर्गत 995 विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग पूर्ण केली आहे. त्यामधील 294 जणांना कॅम्पसव्दारे विविध क्षेत्रामध्ये रोजगार मिळाला आहे. सद्यस्थितीत 960 लाभार्थी ट्रेनिंग घेत आहेत. तसेच शासनाच्या विविध विभागामार्फत ऑटोमोटीव्ह रिपेअर, बँकिंग अँड अकाऊटींग, कन्सट्रक्शन, कुरिअर अँड लॉजीस्टिंग, इलेक्ट्रीकल, फॅब्रीकेशन, गारमेंट मेकींग, हॉस्पिलिटी, मेडीकल अँड नर्सींग यासारख्या विविध कोर्सेसचे शिक्षण देण्यात येत असून  त्यामाध्यमातून युवकांना रोजगार मिळवून देण्यात येत आहे. याबाबत जिल्ह्यातील संबंधित विभागाने केलेल्या कामांचा खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आढावा घेतला. यावेळी  जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागपूर जिल्ह्याच्या कौशल्य विकास आराखडा तयार करणे या विषयावर चर्चा करण्यात आली.
            नागपूर शहर व जिल्ह्यामध्ये कन्सट्रक्शन व हॉस्पिटल या क्षेत्रामध्ये रोजगाराची वाढती मागणी लक्षात घेऊन कौशल्य विकासाअंतर्गत युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कौशल्य विकासाअंतर्गत जिल्ह्यातील विविध संस्था प्रशिक्षण देत असून त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यात येतील. तसेच ग्रामीण भागातील युवकांना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेण्यासाठी व त्यांना अधिकाधिक रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. असेही ते म्हणाले.
                कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत सुरु असलेल्या कोर्सेस व्यतिरीक्त अन्य नाविण्यपूर्ण रोजगाराभिमुख कोर्सेस विविध विभागांनी  सुचवावे, असे खासदार डॉ. विकास महात्मे यावेळी म्हणाले.
                                                                        *****

कर्जमाफीसाठी आतापर्यंत 45 लाख 59 हजार 327 शेतकऱ्यांची नोंदणी -सहकार मंत्री सुभाष देशमुख



            मुंबईदि. 31  शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया  दि.२४ जुलै २०१७ पासून  सुरू झाली आहे.  दि. 31  ऑगस्ट  रोजी दुपारी 4  पर्यंत  45 लाख 59  हजार  327शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली असून, 38  लाख 90   हजार  404  शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेतअशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
      श्री. देशमुख म्हणालेछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 च्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये ऑनलाईन भरण्यात येत आहेत. यात आपले सरकार केंद्रनागरिक सुविधा केंद्रसंग्राम केंद्र आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या केंद्राचा समावेश आहे. दि. 15 सप्टेंबर2017 ही अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
००००

सहकार मंत्री सुभाष देशमुख 'दिलखुलास' कार्यक्रमात


            मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ या विषयावर सहकारपणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत  दि. १ व २ सप्टेंबररोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका शिबानी जोशी यांनी घेतली आहे.
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणीया योजनेंतर्गत कर्जमाफी व इतर प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी शेतकरी कुटुंब हा निकष विचारात घेण्यात आला आहे. या योजनेसंदर्भातील शासन निर्णयाची संपूर्ण माहितीया कर्जमाफीचे निकष काय आहेतया योजनेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक १५ सप्टेंबर २०१७ असून, शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरावेतया आवाहनांसह इतर विषयांवर सविस्तर माहिती श्री. देशमुख यांनी 'दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.
००००

राज्यातील 10 अकृषि विद्यापीठांच्या बृहत आराखड्यांसाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश




मुंबईदि. 31 : मुंबई वगळता राज्यातील दहा अकृषि विद्यापीठांनी सादर केलेल्या बृहत आराखड्यांच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. या तज्ज्ञ समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या बृहत आराखड्यांना अंतिम मंजूरी देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची आढावा बैठक आज  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार दर पाच वर्षाने तयार केलेल्या बृहत आराखड्यांना महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यानुसार राज्यातील दहा अकृषि विद्यापीठातील बृहत आराखडे यांना मंजूरी देणे यासाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली होती. आज या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादगोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावस्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडसावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे,सोलापूर विद्यापीठशिवाजी विद्यापीठ कोल्हापूरसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरसंत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती आणि श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ मुंबई या दहा विद्यापीठांनी विविध योजनांचा सर्वसमावेशक असलेले पंचवार्षिक बृहत आराखडे तयार केले आहेत त्यावर आज झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
आज विद्यापीठांनी मांडलेल्या बृहत आराखड्यांमध्ये नवीन महाविद्यालयपरिसंस्थाअभ्यासक्रमविद्याशाखा,विषय यांचा समावेश आहे. या बृहत आराखड्यांची जाहिरात करण्यासही आजच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. या बृहत आराखड्यांमध्ये विद्यापीठांचे पाच वर्षांचे व्हिजन असून त्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती लवकरात लवकर नेमून या समितीने अहवाल दिल्यानंतर या बृहत आराखड्यांना मंजूरी देण्यात येईलअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडेराज्यमंत्री रवींद्र वायकरउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटेकौशल्य विकास विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.
००००

सहकार मंत्री सुभाष देशमुख 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात


     मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या विषयावर सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत शुक्रवार दि. १ सप्टेंबररोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका शिबानी जोशी यांनी घेतली आहे.
           छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी, या योजनेंतर्गत कर्जमाफी व इतर प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी शेतकरी कुटुंब हा निकष विचारात घेण्यात आला आहे. या योजनेसंदर्भातील शासन निर्णयाची संपूर्ण माहिती, या कर्जमाफीचे निकष काय आहेत, या योजनेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १५ सप्टेंबर असून शेतक-यांनी विहित मुदतीत अर्ज भरावेत, या आवाहनांसह इतर विषयांवर सविस्तर माहिती श्री. देशमुख यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.  
0000

अतिवृष्टीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात झालेल्या नुकसानीचा वनमंत्र्यांची घेतला आढावा अर्थसहाय्याची मागणी करणारा प्रस्ताव त्वरित पाठवण्याच्या सूचना


 मुंबई दि. ३१ : अतिवृष्टीने बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात झालेल्या नुकसानीचा आढावा आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्यानातील अनेक बाबींचे नुकसान झाले असल्याने, नुकसान झालेल्या मालमत्ता पुन:स्थितीत आणण्यासाठी अर्थसहाय्याची मागणी करणारा प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठवावा,  अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
आपत्कालीन परिस्थितीत कार्यालयीन कर्मचारी आणि शासकीय निवासस्थानातील त्यांचे कुटुंबीय यांना तातडीने सुरक्षित जागेत हलवण्याच्या सूचना वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी उद्यानातील कार्यालयीन व निवासी इमारतीत्यातील काही सामानउद्यानाच्या संरक्षक भिंती आणि कुंपणशासकीय वाहनेउद्यानातील साईन बोर्डहोर्डिंग्ज,  मिनी ट्रेन चा ट्रॅक यांचे नुकसान झाले आहे.  सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे उद्यानातील ५० मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आपल्या निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भूरळ पाडणारे उद्यान असून उद्यानाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पर्यटक भेट देत असतात. अतिवृष्टीने उद्यानातील नुकसान झालेल्या सर्व घटकांची पुन:स्थापना करण्यात येऊन उद्यानाचे वैभव पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात यावेतअसे आदेश ही वनमंत्र्यांनी यावेळी दिले.
००००

महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान


नवी दिल्ली३१ : महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
            प्रवासी भारतीय भवन येथे महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास राज्यमंत्री कृष्णाराजसचिव राकेश श्रीवास्तवअपर सचिव अजय टिक्री आणि संयुक्त सचिव राकेश कुमार उपस्थित होते.
            केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशभरातील ५१ अंगणवाडी सेविकांना यावेळी श्रीमती गांधी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. २५ हजार रूपये आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चंद्रपूर जिल्हयातील गोपालपूर येथील केंद्राच्या चंद्रकला झुरमुरे,परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील पडेगाव अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी सेविका लताबाई वांईगडे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पैंडाखले अंगणवाडी केंद्राच्या सेविका चंद्रकला चव्हाण यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
चंद्रकला झुरमुरे गोपालपूर अंगणवाडी केंद्रात १९९१ पासून कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत त्यांनी ६ कार्यक्रमांमध्ये उत्कृष्टरित्या कार्य केले आहे. तसेचप्रत्येक बालक व त्यांच्या आई-वडीलांजवळ आधार कार्ड असावे हा ध्यास घेऊन त्यांनी जनजागृती केलीपरिणामी त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांनी १०० टक्के आधार कार्ड बनवून घेतले. शालेय विद्यार्थी आणि ग्रामीण जनतेच्या विविध प्रश्नांसंबंधी जनजागृती केली. श्रीमती झुरमुरे यांनी दारूबंदी साठी केलेल्या जागरुकतेमुळे आज गोपालपूर गाव पूर्णपणे दारूमुक्त झाले आहे.
              लताबाई वांईगडे या पडेगांव अंगणवाडी केंद्रात १९९६ पासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत त्यांनी ६ कार्यक्रमांमध्ये उत्कृष्टरित्या कार्य केले आहे. तसेच, ‘पल्स पोलिओ कार्यक्रम’, ‘कृमी नाशक दिन’ आणि बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानात सक्रीय सहभाग घेऊन उत्तम कार्य केले आहे. एड्स आणि कुष्ठ रोग जनजागृतीच्या कार्यातही श्रीमती वांईगडे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
             चंद्रकला चव्हाण या पैंडाखले अंगणवाडी केंद्रात वर्ष २००० पासून कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत त्यांनी  कार्यक्रमांमध्ये उत्कृष्टरित्या कार्य केले आहे. तसेचपल्स पोलिओ कार्यक्रमस्वच्छ भारत अभियान आणि निर्मलग्राम अभियानात सक्रीय सहभाग घेतला
००००

पाणीपुरवठा प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता मुरबाड तालुक्यातील 113 गावपाड्यांचा सुटणार पाणी टंचाईचा प्रश्न



मुंबई, दि. 31 : मुरबाड तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावे आणि पाड्यांना भावली व पिंपळगाव जोगे धरणातून पाणी पुरवठा करण्याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
            सह्याद्री अतिथीगृह येथे भावली व पिंपळगाव जोगे धरणातील पाण्याच्या आरक्षणासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे आदी उपस्थित होते.
            प्रारंभी मुरबाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या पाणी टंचाई संदर्भातील आढावा सादरीकरणाच्या माध्यमातून घेण्यात आला.
            ठाणे जिल्हा परिषदेने मुरबाड तालुक्यातील गावपाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याचा प्रस्ताव कुकडी सिंचन मंडळ, पुणे यांच्याकडे सादर केला होता. या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेकरिता पिंपळगाव जोगे धरणातून पाणी गुरुत्व वाहिनीने, ग्रीड पद्धतीने नेण्याचे प्रस्तावित केलेले आहे. कुकडी प्रकल्प हा आठमाही प्रकल्प असून, कुकडीच्या संयुक्त प्रकल्पातील पिंपळगाव जोगे धरण आहे. या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे मुरबाड तालुक्यातील 113 गावपाड्यांच्या पाणी टंचाईचा प्रश्न दूर होणार आहे. जवळपास 1 लाख 60 हजार लोकांना याचा फायदा होणार आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, लाभक्षेत्र विकासचे सचिव च. आ. बिराजदार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक रा. ब. धोटे, सिंचन व्यवस्थापनचे उपसचिव संजीव टाटू आदी उपस्थित होते.
०००

Monday 28 August 2017

अशोक बुरलेच्या मृत्यूची होणार चौकशी



        नागपूर, दि.28 : येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदी अशोक ऊर्फ छोटू शामराव बुरलेच्या मृत्यूची चौकशी उपविभागीय दंडाधिकारी  शिरीष पांडे यांच्यामार्फत करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले आहे.
            अशोक बुरलेचा 27  जुलै 2016  रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. मृत्यू होण्याची कारणे व परिस्थिती तसेच मृतकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेली इतर संयुक्तिक कारणांचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. अथवा या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छुकांनी सर्व माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह तहसील कार्यालय, नागपूर येथील खोली क्र.1 मध्ये 11 सप्टेंबर 2017 पर्यंत किंवा त्यापूर्वी सादर करावे, असे उपविभागीय दंडाधिकारी शिरीष पांडे यांनी कळविले आहे.

****   

महाभारत की पूर्वसंध्या : एक व्यवहारिक प्रयोग – मुख्य सचिव सुमित मल्लिक



अंमलबजावणी संचालनालयाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल रचित महाभारत की पूर्वसंध्याचे सादरीकरण
मुंबई, दि. 28 : ‘महाभारत की पूर्वसंध्या’ या महाकाव्यातून महाभारतात कमी लेखलेल्या पात्रांना व्यवहारिकदृष्ट्या न्याय मिळवून देण्याचा कल्पक प्रयत्न विनीत अग्रवाल यांनी केला असल्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक काल (रविवार) येथे सांगितले.
अंमलबजावणी संचालनालयाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल रचित महाभारत की पूर्वसंध्या’ या महाकाव्याचे सादरीकरण एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट) मधील नाट्यगृहात पार पडलेयावेळी ते बोलत होते. श्री. मल्लिक म्हणालेविनीत अग्रवाल हे कल्पक कवी व अधिकारी असून हे महाकाव्य महाभारतातील पात्रांवर नव्याने व्यवहारिकदृष्ट्या प्रकाश टाकून भाष्य करणारे आहे. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक विवेक फणसाळकरप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तरप्रकाश झा प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अभिनेता आशिष कौलविवेक ओबेरॉयस्वप्नील जोशीअभिनेत्री पूनम ढिल्लन आदी मान्यवर व रसिक उपस्थित होते.
महाभारत की पूर्वसंध्या या महाकाव्याचे सादरीकरण विनीत अग्रवाल यांनी स्वत: केले. हे सादरीकरण एवढे अप्रतिम होते की सर्वांनी उभे राहून दाद दिली. दरम्यान अभिनेत्री ढिल्लन यांनी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी या काव्यरचनेसाठी आपण 19 पुस्तकांचे वाचन करून त्याचा संदर्भ घेतला असल्याचे श्री. अग्रवाल यांनी सांगितले. महाभारताचा आपल्या जीवनाशी कशा प्रकारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहेत्यातून आपण काय घ्यावे आणि काय नको यावरही त्यांनी भाष्य केले. तर श्री. अग्रवाल रचित हे महाकाव्य साहित्याचा अप्रतिम नमुना असून ते अंतर्मुख करणारे असल्याचे गौरवोद्गार श्री. अख्तर यांनी काढले. ते पुढे म्हणालेमहाभारत हे महासागराप्रमाणे आहे. आपण जेवढ्या वेळा त्यात डुबकी मारणार तेवढ्या वेळा नवीन मोती आपली वाट पाहत असतात. याचे जेवढे चिंतनवाचन केले तेवढ्या नवनव्या बाबी समोर येतात. श्री. अग्रवाल सारख्या लेखकांनी साहित्य विश्वाची मुळे घट्ट करण्याचे काम केले असल्याचेही ते म्हणाले. तर महाभारतातील आतापर्यंत दुष्ट समजल्या जाणाऱ्या पात्रांच्या वेगळ्या पैलुंची ओळख या काव्यातून झाली असल्याचे अभिनेता विवेक ओबेरॉय व स्वप्नील जोशी यांनी सांगितले. 
००००

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात


             मुंबईदि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात स्वाईन फ्लू आजार आणि उपचार’ या विषयावर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत  मंगळवार दि. २९ ऑगस्ट २०१७ रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका मनाली दीक्षित यांनी घेतली आहे.
              राज्यात स्वाईन फ्लू या आजारासंदर्भात आरोग्य विभागामार्फत घेण्यात येत असलेली खबरदारी ,स्वाईन फ्लूवरील औषध आणि इतर साधनसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का अति जोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत लसीकरणबाईक ॲम्बुलन्सची सेवाअवयवदान आदी संदर्भात सविस्तर माहिती डॉ. सावंत यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे. 
००००

जपानने पर्यटन क्षेत्रात गुंतवणुक करावी -पर्यटनमंत्री जयकुमार रावल



मुंबई, दि. 28 : जपानने महाराष्ट्रातील पर्यटनपायाभूत सुविधा निर्मितीतंत्रज्ञानस्मार्ट सिटी आदी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करावीअसे आवाहन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी जपानमधील वाकायामा शासनाच्या शिष्टमंडळाला केले.
            जपानमधील वाकायामा शासनाच्या शिष्टमंडळाने आज पर्यटनमंत्र्यांची यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व वाकायामा शासनाच्या आंतरराष्ट्रीय नियोजन विभागाचे महासंचालक हिरोयुकी त्सुई यांनी केले. शिष्टमंडळात ओनीशी तात्सुनोरीकाझुओ यामासाकी,मसाकी शिमीझुइतारु ताकाहाशीहिडेकाझु हिराईश्रीमती चिनात्सु साकामोटोयुमी नाकामोटोताईको मिनामी यांचा समावेश होता. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारेपर्यटन विभागाचे सह सचिव दिनेश दळवीएमटीडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोडउप महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आदी उपस्थित होते.
            येत्या जानेवारी 2018 मध्ये वाकायामाचे गव्हर्नर भारतामध्ये तसेच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्या अनुषंगाने विविध सामंजस्य करार होणार आहेत. या सामंजस्य करारामध्ये पर्यटन क्षेत्रातील वृद्धीनाशिक शहराच्या अनुषंगाने शेती तसेच अन्न प्रक्रिया उद्योगमेक इन महाराष्ट्र ला चालना देण्यासाठी जपानचे योगदानराज्यातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूकस्मार्ट सिटी प्रकल्पविद्यार्थी आदान- प्रदान योजना आदींबाबत करार व्हावेत अशी अपेक्षा श्री. रावल यांनी यावेळी व्यक्त केली.
            हिरोयुकी त्सुई यांनी महाराष्ट्र दौऱ्यात मिळालेल्या अगत्याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला. विद्यार्थी आदान- प्रदान तसेच ज्ञान आदान प्रदान हा दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. तसेच वाकायामा गव्हर्नर यांच्या दौऱ्यात राज्य शासनाकडील विविध क्षेत्रांच्या अपेक्षासंदर्भात चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळात शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असल्याने त्यांचे पुणे तसेच मुंबईतील शाळांना दिलेल्या भेटीसंदर्भातीलतेथील शिक्षण पद्धतीविषयीचे अनुभवांवरही चर्चा करण्यात आली.
            शिष्टमंडळातील सदस्यांना पर्यटनमंत्र्यांनी हिमरु शाल तसेच अजिंठा लेण्यातील छायाचित्रांच्या फोटो कॉपीज भेट दिल्या. 

वाशिम जिल्ह्यातील श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्राच्या 25 कोटीच्या विकास आराखड्यास शिखर समितीची मान्यता




मुंबईदि. 28 : श्री संत सेवालाल महाराजपोहरादेवी (ता. मानोराजि. वाशिम) तसेच श्री मुंगसाजी महाराज समाधी स्थळधामणगाव (ता. दारव्हाजि. यवतमाळ) ही दोन तीर्थक्षेत्रे आणि स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक (सातारा) व स्वातंत्र्य सैनिक कै. पांडू मास्तर उर्फ पांडुरंग गोविंद पाटील स्मारकयेडेनिपाणी (ता. वाळवाजि. सांगली) या दोन स्मारकांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली.
           शिखर समितीची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृहामध्ये आज झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेसहकार मंत्री सुभाष देशमुखमहसूल राज्यमंत्री संजय राठोडजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतखासदार संजय पाटीलआमदार राजेंद्र पटणेआमदार शिवाजीराव नाईकमुख्य सचिव सुमित मल्लिक उपस्थित होते.
             श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकासासाठी 25 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये भक्त निवास बांधकाम- 2 कोटी 55 लाख 38 हजार रुपयेसंरक्षण भिंतीचे बांधकाम- 1 कोटी 2हजार रुपयेप्रदर्शन केंद्र- 14 कोटी 64 लाख 42 हजार रुपये,अंतर्गत रस्त्याचे बांधकाम- 96 लाख 49 हजार रुपयेसभामंडपाचे बांधकाम- 2 कोटी 40 लाख 2 हजार रुपयेजमिनीचे सपाटीकरणबगीचा व सौंदर्यीकरण- 3कोटी 46 लाख 50 हजार रुपये इतक्या खर्चाच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. यापेक्षा अधिक लागणारा खर्च तीर्थक्षेत्र ट्रस्टने करावा असे ठरले.
श्री मुंगसाजी महाराज समाधी स्थळ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी निधी
श्री मुंगसाजी महाराज समाधी स्थळ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने प्रथम टप्प्यात उच्चाधिकार व शिखर समितीने 6 कोटींचा निधी तातडीच्या कामांसाठी वितरीत केला होता. त्यानुसार त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी 25 कोटीं रुपयांच्या रकमेची मर्यादा असल्याने उर्वरित 19 कोटी 47 लाख रुपये खर्चाचा आराखडा मान्यतेसाठी ठेवण्यात आला. त्यास शिखर समितीने मान्यता दिली. यामध्ये दर्शन बारीचे बांधकाम- 20 लाख रुपयेसामुहिक प्रसाधनगृहे-82 लाख रुपयेसभामंडप- 80 लाख रुपयेभोजन कक्ष बांधकाम- 1 कोटी 61 लाखबाल उद्यान व शेडसह इतर बांधकाम- 1 कोटी 74 लाखभक्त निवास (मुख्य मंदिर परिसर)- 3 कोटी 50 लाख रुपयेभक्त निवास (चिंच मंदिर परिसर)- 50 लाख रुपयेसी.सी.टी.व्ही. कॅमेरे व पोलीस चौकीचे बांधकाम- 20 लाख रुपयेधामणगाव (देव) येथे येणाऱ्या पोच मार्गांचे बांधकाम- 1 कोटी 50 लाख रुपयेस्वागत कक्ष व लॉकर कार्यालय बांधकाम- 25लाख रुपयेआरोग्य सुविधा केंद्र व इतर सुविधांचे बांधकाम- 1 कोटी 75 लाख रुपयेबस स्थानकाचे बांधकाम-30 लाख रुपयेसंरक्षण भिंत- 60 लाख रुपयेपाणी पुरवठा व्यवस्था- 3 कोटी रुपयेविद्युत पुरवठा व्यवस्था-1 कोटी 50 लाख रुपयेतज्ज्ञ सल्लागार खर्च- 73 लाख रुपये इतक्या खर्चाच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.
स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक उभारण्याबाबतच्या आराखड्यास मान्यता
सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक उभारण्याबाबतच्या आराखड्यासही मान्यता देण्यात आली. यापूर्वी स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्ताने जिल्हा परिषद परिसरात बहुद्देशीय सभागृह बांधण्यासाठी शासनाने 10 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला होता. यासाठी जिल्हा परिषद सेस फंड मध्ये 3 कोटी 90 लाख रुपये दिले होते. सभागृहातील विद्युतीकरणाच्या कामासाठी अजून 84 लाख रुपयांची आवश्यकता आहे. तसेच स्मारक बांधण्यासाठी एकूण 8 कोटी 19 लाख 6 हजार 803 रुपयांचा आराखडा शिखर समितीच्या मान्यतेसाठी बैठकीमध्ये ठेवण्यात आला. सभागृहाचे विद्युतीकरण आणि स्मारकाचा विकास आराखडा असा एकूण 9 कोटी 03 लाख 6 हजार 803 रुपयांच्या आरखड्यास शिखर समितीने मान्यता दिली.
             येडेनिपाणी येथे प्रस्तावित पांडुमास्तर स्मारकाचा 2 कोटी 25 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. आराखड्यामध्ये इमारत बांधकामबहुद्देशीय सभागृहपुतळारेनवॉटर हार्वेस्टींग यंत्रणा आदींचा समावेश आहे
               बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहायपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शाम लाल गोयलवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही गिरीराजपर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रेऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंगसार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंगग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्तावन विभागाचे सचिव विकास खारगेसंबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीविविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
००००