Wednesday 26 January 2022

प्रजासत्ताक दिन सोहळ्यात गुणवंतांचा सत्कार





सैन्य, पोलीस, आरोग्य, क्रीडा, प्रशासनातील उपलब्धीचे कौतुक

          नागपूर, दि.26 : प्रजासत्ताक दिनाचा सोहळा कस्तुरचंद पार्क, नागपूर येथे साजरा झाला. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते झेंडावंदन, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व त्यांचे भाषण झाल्यावर गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सैन्य, पोलीस, आरोग्य, क्रीडा, प्रशासनातील उपलब्धीचे कौतुक करण्यात आले.

          जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद हेड कॉन्स्टेबल मंगेश हरिदास रामटेके यांनी देशाकरिता दाखवलेल्या अदम्य साहस, कर्तव्यपरायणता व बलिदानाकरिता त्यांच्या पश्चात वीरपत्नी राजश्री मंगेश रामटेके यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने पालकमंत्र्यांच्या हस्ते ६० लाख रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. शहीद मंगेश हरिदास रामटेके यांच्या वीरमाता विजया हरिदास रामटेके व विरपिता हरिदास धोंडूजी रामटेके यांना प्रत्येकी २०-२० लाख रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. पालकमंत्रांच्या हस्ते हा सत्कार वीरपुत्राला जिल्ह्याची श्रद्धांजली होय.

          नागपूर जिल्ह्याने कमी वेळामध्ये ध्वजदिन निधीचे अती उत्कृष्ठ संकलन केल्याबद्दल जिल्हाधिकारी आर विमला व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांचा सैनिक कल्याण विभाग पुणे तर्फे सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जलतरणपटू जयंत प्रकाश दुबळे व सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी ज्ञानेश्वर गजभिये या जिल्हा युवा पुरस्काराच्या मानकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते दहा हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

          नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या श्वान पथकात कार्यरत असलेले रवींद्र अशोकराव टोंग यांना अॅथलेटिक्ससाठी जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या १५ वर्षांपासून टोंग नागपूरच्या खेळाडूंना अॅथलेटिक्सचे प्रशिक्षण देतात व त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाळु घडविलेत. अभिषेक प्रमोद सेलोकर व उर्वशी अनिल सनेश्वर यांची सॉफ्ट बॉल तर मृणाली प्रकाश पांडे यांची बुद्धिबळासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पालकमंत्र्यांनी सर्व जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थींचा दहा हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

          कायाकल्प योजनेअंतर्गत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळवून देण्यात योगदानाबाबत डागा स्मृती शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ सिमा पारवेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी थोरात, अ. जि.शल्य चिकित्सक डॉ. संध्या डांगे, बालरोग तज्ज्ञ डॉ. विनिता जैन व वैद्यकीय अधिकारी प्रा. अ. केंद्र धापेवाडा डॉ. प्रमोद रेवाडे यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर रुग्णालय, नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूट व आशा हॉस्पिटल या रुग्णालयांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. राज्य राखीव पोलीस बल गट क्र ४ नागपूरचे असिस्टंट कमांडेन्ट प्रमोद हरिराम लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल चंद्रभान सवाईतूल, सहाय्यक फौजदार सुरेश मुरलीधर वानखेडे यांची गुणवत्तापूर्ण सेवा अंतर्गत राष्ट्रपती यांच्या पोलीस शौर्य पदकासाठी निवड झाली आहे, पालकमंत्र्यांच्या हस्ते या सर्वांचा सन्मान करण्यात आला.

35 वर्षांपासून कार्यक्रमाचे संचलन

          डॉ. दीपक साळीवकर यांचा आवाज दरवर्षी कस्तुरचंद पार्कच्या प्रजासत्ताक सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्यांना चांगला ओळखीचा आहे. सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ.साळीवकर गेल्या ३५ वर्षांपासून या सोहळ्याचे संचलन व समालोचन करतात. सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या या व्यासंगात खंड पडला नाही. यावर्षीही कस्तुरचंद पार्क व साळीवकरांचे समालोचन ही जुगलबंदी अव्याहत सुरु होती.         

 

Tuesday 25 January 2022

जनतेच्या सहभागातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज - पालकमंत्री डॉ. राऊत

कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिवस साजरा

कोरोना प्रोटोकॉलमुळे फक्त ध्वजारोहण व बक्षिस वितरण

 

नागपूर दि. 26 : ऑक्सिजन, बेड, औषधसाठा,वैद्यकीय मनुष्यबळ या सर्वांची उपलब्धता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र नागरिक स्वयंशिस्तीत जोपर्यंत कोरोना प्रोटोकॉल पाळणार नाहीत, तोपर्यंत बाधितांची संख्या नियंत्रणात येणार नाही. त्यामुळे लोकसहभागातूनच कोरोनावर मात शक्य आहे,असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केले.

      ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिनाच्या बहात्तराव्या वर्धापन दिवसानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधला. राज्य शासनाच्या सूचनेनुसार यावर्षी मर्यादित उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस बॅण्ड पथकाचे राष्ट्रगीत, पथकाची सलामी व बक्षीस वितरण असा हा मर्यादित कार्यक्रम झाला. सव्वा नऊ वा
जता त्यांनी ध्वजारोहण केले. पोलीस बॅण्ड पथकाच्या तालावर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यानंतर आपल्या संक्षिप्त भाषणात त्यांनी कोरोना उपाययोजना करतांना लोकसहभागाचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित केले.

            जगात 152 देशांमध्ये सध्या कोरोना विषाणूचा विळखा आहे. नागपूरमध्ये दररोज ही आकडेवारी पाच हजाराच्या घरात चाललेली आहे. त्यामुळे शाळा व कॉलेजेस बंद आहेत. जनतेने गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडले तर न विसरता मास्क वापरणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शहरातील व्यापारी, राजकीय पक्ष, पत्रकार या सर्व क्षेत्राने दंडात्मक कारवाई व गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही सक्तीचे उपाय करण्याबाबत प्रशासनाला आग्रह केला आहे. मात्र जनता जागरूकतेने पुढे आल्यास याबाबत कोणतेही निर्बंध व सक्ती करावी लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

            जवळपास २७ हजार बेड निर्माण करण्याची क्षमता सध्या वैद्यकीय क्षेत्राकडे आहे. याशिवाय ८७४.३१ मेट्रिक टन ऑक्सिजन साठ्याची क्षमता तयार करण्यात आली आहे .मेडिकल, मेयो, एम्स, याठिकाणी आणीबाणीच्या परिस्थितीत व्हेंटिलेटर, आयसीयू आणि ऑक्सिजन खाटांची निर्मिती करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

            आपल्या भाषणांमध्ये त्यांनी यावेळी कोरोना उपायोजना सोबत ऊर्जा मंत्री म्हणून कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 मध्ये शेतकऱ्यांना केलेल्या मदतीची माहिती दिली. या योजनेमध्ये कृषी ग्राहकांनी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम मार्च 2022 पर्यंत भरल्यास उर्वरित 50 टक्के रकमेची सवलत देण्यात येते. त्यामुळे शेतकरी थकबाकीतून मुक्त होतो. नागपूर जिल्ह्यात याला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसात नुकसान झालेल्यांना आवश्यक मदत दिली जाणार आहे ,असे त्यांनी स्पष्ट केले तर यापूर्वी कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या बाधितांच्या नजीकच्या नातेवाइकांना वाटप करावयाच्या रकमेचे काम जिल्ह्यात योग्य पद्धतीने चालू असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात कोरोना काळात आरोग्य विभाग व पोलीस विभागाने केलेल्या कार्याचा त्यांनी गौरव केला फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांनी केलेले कार्य नागरिक विसरणार नाही, असे त्यांनी सांगितले. दिवंगत नेते सरदार अटलबहादूर सिंग यांना त्यांनी आपल्या भाषणामध्ये श्रद्धांजली व्यक्त केली तर नागपूरकर बॅडमिंटनपटू मालविका बनसोड, किशोरवयीन मुलांचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त करणारा श्रीनभ अग्रवाल यांचे कौतुक केले. यावेळी विविध क्षेत्रातील उपलब्धतेसाठी मान्यवरांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावर्षी नागपूर जिल्ह्याने सीमेवरील सैनिकांसाठी ध्वजनिधी संकलनात 90% उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांना पुरस्कृत करण्यात आले.

       या ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र छेरिंग दोर्जे, सहपोलीस आयुक्त अश्वती दोर्जे, नक्षलविरोधी अभियान गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., अप्पर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त आशा पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, अतिरिक्त महापालिका आयुक्त राम जोशी ,निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जगदीश काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकार यांच्यासह प्रशासनातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सेवानिवृत्त वैदयकीय अधिकारी डॉ. दिपक साळीवकर यांनी केले. नागपूर शहर पोलीस सलामी पथकाचे नेतृत्व या वेळी सचिन थोरबोले यांनी केले तर वाद्यवृंद पथकाचे नेतृत्व प्रदीप लोखंडे यांनी केले.

                                                                   *****

उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात प्रजासत्ताक दिन साजरा

            नागपूर, दि.२६ : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. नागपूर खंडपीठाचे प्रबंधक प्रशासन संजय भारुका यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

            उच्च न्यायालय प्रशासनातील अधिकारी प्रबंधक न्यायिक अमित जोशी, उपप्रबंधक योगेश रहांगडाले, उपप्रबंधक चंद्रपाल बलवानी, उपप्रबंधक अकबर हुसेन, फैजल कश्मिरी, विलास पुंडलिक, गौरी व्यंकटरमण, उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, पी. एस. चौह, शरद भट्टड, एन. एस. देशपांडे, अमोल जलतारे, गोपाल सवाई, वरिष्ठ अधिकारी-कर्मचारीवृंद उपस्थित होते.  

 

जिल्हा व सत्र न्यायालय 

 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रांगणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीनिवास बी. अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस पथक व उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

            यावेळी जिल्हा न्यायाधिश-1 असीम आजमे, जिल्हा न्यायाधिश-2 श्री. लाडेकर, जिल्हा न्यायाधिश-3 एस.ए.एस.एम. अली, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार, प्रबंधक विजय सोनटक्के, अधीक्षक ए. आर. खासडे यांच्यासह न्यायालय प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

00000



मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनव्यवहारात व्यापक वापर आवश्यक - आर. विमला



 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त परिसंवाद

 

      नागपूर दि,25मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रसार अधिक परिणामकारक होण्यासाठी शासकीय व्यवहारात मराठीचा वापर वाढला पाहिजे. त्यासाठी या यंत्रणेतील सर्व घटकांनी जाणिवपूर्वक सोप्या आणि पर्यायी शब्दांचा अवलंब करावा. यासोबतच शासन व्यवहारातील मराठीचा वाढता वापर शासन आणि लोकांमधील अनुबंध अधिक दृढ करणारा ठरेलअसा आशावाद जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज येथे व्यक्त केला.  

      मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयभाषा संचालनालय आणि विभागीय ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने विशेष परिसंवादाचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्रीमती विमला अध्यक्षीय समारोपात बोलत होत्या.

            राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मराठी भाषा विभागप्रमुख तथा प्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रमोद मुनघाटेज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. रविंद्र शोभणेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकरमाहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक हेमराज बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.

      मराठी भाषेचे वैभव मोठे असूनविविध संततत्वज्ञविचारवंतसाहित्यिक यांनी तिच्या समृद्धी आणि संवर्धनासाठी अनन्यसाधारण असे योगदान दिले आहे. अनेक मान्यवरांनी तिच्याविषयीचा जाज्वल्य अभिमान वेळोवेळी जागविला आहे. मातृभाषेचा जाणिवपूर्वक केलेला वापर आस्थाअभिमान आणि आत्मविश्वासाची भावना जागी करतो. शासनव्यवहारात मराठीचा वापर सुलभरित्य करुन तो वाढविल्यास लोकांशी जोडले जाणे अधिक सुकर होईल. या उद्देशाने तिचा वापर निग्रहपूर्व‍क करावा. इतर भाषांचा काही ठिकाणी वापर करणे गरजेचे ठरत असले तरीही मराठीचा आग्रह असायलाच हवाअसेही श्रीमती विमला यांनी आवर्जून सांगितले.

      मराठी ही ज्ञानभाषा म्हणून विकसित असताना तिचा लोकभाषा म्हणून अधिक प्रसार झाला पाहिजेअसे सांगून डॉ. प्रमोद मुनघाटे यावेळी म्हणालेनागरिकांचा प्रशासनाशी विविध पातळ्यांवर दैनंदिन संबंध येतो. त्यांच्या समस्या आणि प्रश्न हे शासनदरबारी मराठी भाषेतून अधिक व्यापकपणे मांडले गेले पाहिजेत. मराठीच्या संवर्धनासाठी राज्याच्या निर्मितीपासून प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी प्रशासनातील सर्वांनी कृतिशील राहून मातृभाषेबद्दलची निष्ठा जोपासावी. विविध प्रशासकीय बाबी हाताळताना सोप्यासर्वसामान्यांना समजणाऱ्या शब्दांचा वापर व्हायला हवा. जैवविविधतेप्रमाणेच मराठीची जैवविविधता जपली गेली पाहिजे. प्रशासनात नवीन परिभाषासंज्ञानिर्मिती करण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

      मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर जाणिवपूर्वक प्रयत्न होतानाच जनसामान्यांना समजेल अशा पद्धतीने पर्यायी शब्दांचा वापर वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करताना डॉ. रविंद्र शोभणे म्हणाले कीनव्या पिढीमध्ये मराठी भाषा आणि तिच्याविषयीची आस्था  रुजविण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच उपक्रम राबविले गेले पाहिजे. मराठी भाषेतील संचित खूप मोठे आहे. त्याचा सांस्कृतिकसामाजिक आणि वैचारिक विकासासाठी प्रभावीपणे वापर झाला पाहिजे. मराठी भाषा संवर्धनाचा विचार करताना मराठी माध्यमातील शाळांची संख्या दरवर्षी वाढली पाहिजेतरच भविष्यात मराठी अधिक समृद्ध  होऊ शकेल.

      प्रशासकीय व्यवहारातील मराठी सोपी आणि सुटसुटीत करण्यासाठी निरंतर प्रयत्न गरजेचे असल्याचे स्पष्ट करताना श्री. योगेश कुंभेजकर म्हणाले प्रशासकीय कार्यपद्धतीतील भाषाविषयक क्लिष्टता टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. इतर भाषांतील शब्दातील समावेशाने मराठी समृद्ध होत आहे. मात्र तिचा मूळ गाभा जोपासला गेला पाहिजे. त्यादृष्टीनेही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आग्रही असले पाहिजे. मराठी भाषा संवर्धनाचे  प्रयत्न अधिक परिपूर्ण होण्यासाठी लोकप्रिय माध्यमांचा प्रभावी वापर झाल्यास कोणत्याही प्रतिकुलतेला मराठी यशस्वीपणे तोंड देऊ शकेलअसेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माहिती संचालक हेमराज बागुल यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. शासन व्यवहारातील मराठी भाषेचा वाढता वापर या यंत्रणेला लोकांशी जोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेलअसे सांगताना  इतर भाषेतील शब्दांच्या वापराबाबत समतोल राखून मराठीचे सत्व आणि स्वत्व जोपासावेअसे प्रतिपादित केले.

      प्रारंभी परिसंवादाचे उद्धाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. पाहुण्यांचा परिचय सहायक संचालक हरेश सूर्यवंशी यांनी केला तर कार्यक्रमाचे संचालन विशेष समन्वय अधिकारी अनिल गडेकर यांनी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी मानले.  यावेळी उपायुक्त आशा पठाणअंकुश केदारधनंजय सुटेजिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणेविभागीय ग्रंथपाल विभा डांगेश्रीमती कांबळे आदी उपस्थित होते.

0000

 

Saturday 15 January 2022

शेतकऱ्यांनो धीर धरा, शासन तुमच्या पाठीशी - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत






·         जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी

 

            नागपूर, दि. 15: गेल्या आठवड्यात नागपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी बांधवांनी या संकटाचा धैर्याने सामना करावा. राज्य शासन तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, लवकरच मदत देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज शेतकऱ्यांना दिले. प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश‍ दिले असून ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर गारपीट झालेल्या नागपूर ग्रामीणमधील बैलवाडा, गुमथळा, गुमथी तर रामटेक तालुक्यातील दाहोदा, जमुनिया, घोटी, आणि पारशिवनी तालुक्यातील करंभाड, इटगाव आणि लोणखैरी या गावांना भेटी देत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

            खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲङ आशिष जैस्वाल, आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी आर. विमला, पोलीस अधीक्षक विजयकुमार कुमार, नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, रामटेकच्या वंदना विरानी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, तहसीलदार आशिष वानखेडे, रामटेकचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के  यांच्यासह कृषि व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. राऊत यांनी बैलवाडा येथील जगन्नाथ शेषराव जुमडे यांच्या शेतात गारपीटीने झालेल्या  दोन एकरातील वाल आणि पालक भाजीची पाहणी करत दौऱ्याला सुरुवात केली. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, कृषि व महसूल विभागाकडून जवळपास पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी सौर पॅनल योजनांच्या माध्यमातून दिवसा पिकांना पाणी देता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना अंधारात पिकांना पाणी देण्याची समस्या उदभवणार नसल्याचे सांगतानाच या संकटाचा सर्वजण सामना करुयात, असा आशावादही त्यांनी पेरला.

            जिल्ह्यातील गुमथी येथील अशोक मोरे, दाहोदा येथील रेखाताई कुमरे यांच्या दोन एकर शेतातील विक्रीस आलेले टमाटे पिक गारपिटीने हातचे गेले आहे. तसेच देवराव सकरु उईके यांच्या संत्रा, वांगे, काजूची झाडे, कापूस, तूर, गहू, उन्हाळी सोयाबीनचे नुकसान झाले असून, भाजीपाला पिकांमध्ये फुलकोबी, पानकोबी, मेथी, टमाटे, वाल, चवळी, पालक, कांदा, हरभरा आदी पिकांची मोठी नासाडी झाली आहे, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले. कृषि व महसूल विभागाकडून पंचनामे सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

0000

 

Tuesday 4 January 2022

‘गोसेखुर्द’च्या बाधित क्षेत्रातील गावांचे सॅटेलाईट सर्वेक्षण - प्राजक्ता लवंगारे-वर्मा


·         पाणीपातळीनुसार बाधित गावांच्या स्थलांतराचा प्रस्ताव

·         पुनर्वसनाची अपूर्ण कामे पूर्ण करण्याला प्राधान्य

·         मूलभूत सुविधांच्या कामांवर भर

·         विशेष आर्थिक पॅकेजनुसार बाधित कुटुंबांना लाभ

 

        नागपूर, दि.05गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणीपातळीनुसार ज्या गावांचे स्थलांतरण करणे आवश्यक आहे अशा गावांचे सॅटेलाईट सर्वेक्षण करण्यात येत असून जी गावे अंशत: अथवा पूर्ण बाधित होणार आहेत अशा गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे दिल्या.

            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या कामाचा आढावा विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी घेतलागोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणीपातळीनुसार 245 मीटर 50 सें.मी.पर्यंत बाधित होणाऱ्या नागपूरभंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील गावासंदर्भात या बैठकीत पुनर्वसनाबाबत आढावा घेतला. 245 मीटर 50 सें.मी.वर 3 हजार 151 कुटुंबांची संख्या असून यासंदर्भातही सॅटलाईट इमेजनुसार या गावांच्या बाधित क्षेत्राबाबत महसूल व सिंचन विभागाने संयुक्तपणे प्रस्ताव तयार करण्याबाबत त्यांनी सांगितले.  

भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदमभंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मूननागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकरगोसेखुर्द प्रकल्पाच्या उपायुक्त आशा पठाणमुख्य अभियंता आशिष देवगडेअधीक्षक अभियंता अंकुर देसाईटालेउपजिल्हाधिकारी हेमा बढेभूमी अभिलेख उपसंचालक विसाशिंदे यासह गोसेखुर्द प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा निर्माण व्हावायास शासनाने प्राधान्य दिले आहेगोसेखुर्द प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने व्हावेयासाठी बाराशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले होतेत्यानुसार नागपूर व भंडारा जिल्ह्याला निधी वितरीत करण्यात आला आहे. विशेष पॅकेज अंतर्गंत कामे योग्य पद्धतीने व्हावीतयासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना शासनाच्या निर्देशानुसार लाभ वाटप करण्यात आला आहेन्यायालयीन कक्षेत येणाऱ्या प्रकरणांचाही जलदगतीने निपटारा करण्याबाबत यावेळी संबधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

  विशेष आर्थिक पॅकेजच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पर्यायी शेतजमिनीऐवजी रोख स्वरुपात एकूण 405 कोटी 25 लाख रुपये, तसेच पुनर्वसन अनुदानापोटी 25 हजार 246 खातेदारांना 195 कोटी 35 लाख रुपयेतर गोठा बांधकामासाठी एकूण 15.91 कोटी रुपये एकमुस्त अशी 534.87 कोटी रुपये तसेच वाढीव कुटुंबासाठी घरबांधणी अनुदानापोटी 24.70 कोटी रुपयांचे यानुसार वाटप करण्यात येत आहेपॅकेजच्या दुसऱ्या टप्प्यातील एकूण निधीपैकी नागपूर व भंडारा जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांना 892 कोटी 81 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असूनत्यापैकी 874 कोटी 67 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

 या पॅकेजमधील 18 जून 2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार 1199.60 कोटी रुपयांचे वितरण करताना नागपूर जिल्ह्यातील हजार 275 कुटुंबातील 11 हजार 163 खातेदार असे एकूण 19 हजार 438 खातेधारकांना  तसेच भंडारा जिल्ह्यातील हजार 636 कुटुंब आणि हजार 590 शेती खातेधारकांना असे एकूण 15 हजार 226 जणांना निधी वाटप करण्यात आला आहे. 94.39 असे त्याची एकूण टक्केवारी असूनवाढीव कुटुंबांना पॅकेजचा लाभ देण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे उपायुक्त आशा पठाण यांनी सांगितलेत्यामध्ये एका कुटुंबाच्या नावावर एकापेक्षा अधिक घरेएकाच घरावर एकापेक्षा जास्त कुटुंबांची नावे नमूद असणेरिक्त भूखंड किंवा मोकळे क्षेत्र आदी त्यामागची कारणे आहेत.

नागपूर जिल्ह्यातील 6 हजार 464 अर्जांपैकी छाननी केल्यानंतर हजार 862 पात्र वाढीव कुटुंबांना 82 कोटी 96 लाख रुपये निधी वितरीत करायचा असून, त्यापैकी 82 कोटी 94 लाख रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल आहेही रक्कम हजार 860 कुटुंबांना वितरीत करण्यात आली आहेतर भंडारा जिल्ह्यातील हजार 984 अर्जांपैकी छाननीनंतर पात्र ठरले असून, 705 वाढीव कुटुंब पात्र ठरली आहेतत्यांना 20 कोटी 44 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

 प्रकल्पाच्या पाणीपातळीनुसार 245 टरपर्यंत नागपूर जिल्ह्यातील एकही गाव बाधित नाहीमात्र चंद्रपूर जिल्ह्यातील दोन गावातील 178 कुटुंब बाधित होत आहेतसध्या नागपूर जिल्ह्यातील 33.26 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करायचे असून, 27.96 हेक्टर भूसंपादनासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहेतर सरळ खरेदीनुसार 5.30 हेक्टर संपादन करायचे आहेभंडारा जिल्ह्यामध्ये 12 हजार 475 हेक्टरपैकी 12 हजार 337 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहेऊर्वरित क्षेत्र हे थेट खरेदी करण्याला मंजुरी देण्यात आली असली तरी काही तांत्रिक अडथळ्यांमुळे 136 हेक्टर क्षेत्र अद्याप संपादन करणे बाकी असल्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील हजार 682 हेक्टरपैकी हजार 632 हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहेतर 46.44 हेक्टर क्षेत्राच्या संपादनाची प्रक्रिया सुरु आहे.

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उपायुक्त श्रीमती आशा पठाण यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

*****

ओमिक्रॉनपासून बचावासाठी वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवा - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

 

 

पालकमंत्र्यांची एम्स, मेडिकल व मेयोला भेट व पाहणी

 


           

            नागपूर, दि.5 : ओमिक्रॉन संक्रमितांची वाढती रुग्णसंख्या व कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून  बचाव करण्यासाठी ऑक्सिजन खाटा, आयसीयू कक्ष, बालकांसाठी स्वतंत्र वार्ड, ऑक्सिजनची उपलब्धता तसेच अनुषंगिक सर्व वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश राज्याचे उर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जिल्हा प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला आज दिले.

            जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पालकमंत्र्यांनी आज अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन कोविड वार्ड, खाटांची संख्या, ऑक्सिजन प्लाँट, मनुष्यबळ आदी बाबींची पाहणी केली. जिल्हाधिकारी आर. विमला, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  पातूरकर, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

            पाहणी दौऱ्यात प्रारंभी पालकमंत्र्यांनी एम्स येथील कोविड वार्ड, ऑक्सिजन खाटांची संख्या, कोविड चाचणी प्रयोगशाळेची पाहणी केली. ओमिक्रॉनचे वाढते संक्रमन व कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता एम्स प्रशासनाने डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करावी. सध्या याठिकाणी डॉक्टरांच्या एकूण 50 पदांपैकी 43 पदे भरलेली आहेत तर 7 पदे रिक्त आहेत. ओमिक्रॉन बाधितांसाठी व संशयित कोविड बाधितांसाठी 100 खाटांचे स्वतंत्र कोविड वार्ड उभारण्यात आले असून 40 आयसीयू खाटा, 25 व्हेंटिलेटर, चाचणी प्रयोगशाळा आदी सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कोविड बाधितांसाठी 160 खाटांचे वार्ड सध्या कार्यरत असून 340 ऑक्सिजनयुक्त खाटांचे स्वतंत्र वार्ड चवथ्या माळ्यावर तयार करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वैद्यकीय, नर्सिंग कर्मचारी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. नॉन कोविड रुग्णांसाठीही एम्समध्ये स्वतंत्र सुविधा करण्यात आली आहे. एम्समध्ये 400 सिलेंडची क्षमता असेलेले चार पीएसए प्लाँट निर्माण होत असून याव्दारे 30 किलोग्रॅमचे 458 जम्बो सिलेंडर ऑक्सिजनची उपलब्धता होईल, अशी माहिती डॉ. दत्ता यांनी दिली.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी मेडीकल कॉलेज येथे पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने उपाययोजनांचा आढावा घेतला. तेथील कोविड वार्डातील खाटांची स्थिती, संख्या, ऑक्सिजनयुक्त खाटा, आयसीयू आदीची त्यांनी पाहणी केली. यावेळी शासकीय मेडीकल कॉलेजच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मेडीकल कॉलेज व मेयो येथील ऑक्सिजन प्लाँटची पाहणी करुन ऑक्सिजनची उपलब्धता व क्षमता यासंदर्भात त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

0000


--

Thanks & Regards;