Tuesday 20 February 2024

विभागीय आयुक्त कार्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 




 

नागपूर दि.20 : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात तहसिलदार महेश सावंत, नायब तहसिलदार आर.के. दिघोळेनितीन डोईफोडे, लेखाधिकारी रत्नाकर पागोटे, नाझर अमित हाडके यांच्यासह उपस्थित  अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 

*****

वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची देवलापार गो-विज्ञान अनुसंधान संशोधन केंद्रास भेट


नागपूर, दि. 16: वने, सांस्कृतिक कार्य ,मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्रास भेट दिली.

       पेंच व्याघ्र प्रकल्पातील विविध विकास कामे व उपक्रमांच्या उद्घाटनानंतर श्री मुनगंटीवार यांनी सायंकाळी  गो-विज्ञान अनुसंधान केंद्रास भेट दिली. ॲड. आशिष जयस्वाल,गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष पद्मेश गुप्ता, मुख्याधिकारी डॉ मनोज तत्ववादी, कोषाध्यक्ष हितेंद्र चोपकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता विश्वास, नागपूर वन वृत्ताच्या वनसंरक्षक श्री लक्ष्मी आदी यावेळी उपस्थित होते.

            श्री. मुनगंटीवार यांनी येथील कामधेनु पंचगव्य आयुर्वेद भवनाची पाहणी केली. येथील अवलेह विभाग, वटी विभाग, तेल विभाग, इंधन विभाग, सिरप विभाग, प्रयोगशाळा आदींना भेट दिली. येथे निर्माण होणारे फलघृत, हिंग्वाद्यघृत, अष्टमंगलघृत, गोमुत्र अर्क, दंतमंजन आदी 30 पेक्षा जास्त उत्पादनांची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी अनुसंधान केंद्राच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन श्री. मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी, या आयुर्वेद भवनाच्या परिसरात श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

0000

 वने आणि वन्यजीव संवर्धनासाठी  जनतेनी पुढाकार घ्यावा

                                        - वने मंत्री  सुधीर मुगंटीवार

                                        

Ø वने मंत्री यांच्या हस्ते पेंच व्याघ्र प्रकल्पातील विविध उपक्रमांचा शुभारंभ

 

नागपूर, दि. 16: पर्यावरण आणि मानवी समाजाच्या विकासात वने, वन्यजीवांचे अनन्य साधारण महत्व असून त्यांच्या संवर्धनासाठी जनतेने पुढाकार घ्यावा,असे आवाहन वने सांस्कृतिक कार्य,मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पेंच व्याघ्र प्रकल्पात विविध विकासात्मक कामे व उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी केले.

 

       श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते आज पेंच व्याघ्र प्रकल्पातील खुर्सापार नूतन सफारी गेट, कोलितमारा येथे परमोटरींग व हॉट एअर बलून हा साहसी क्रीडा उपक्रम, वाघोली तलाव येथे डार्क स्काय प्रकल्प आणि हत्ती कॅम्प, सिल्लारी येथे पर्यावरणपूरक पेयजल प्रकल्पाचे उद्घाटन आदिंसह विविध उप्रकमांचा शुभारंभ झाला या प्रसंगी ते बोलत होते.

 

        आमदार ॲड. आशिष जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या सदस्य शांता कुमरे, पिपरिया गावचे सरपंच प्रवीण उईके,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता विश्वास, नागपूर वन वृत्ताच्या वनसंरक्षक श्री लक्ष्मी,पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल आदी यावेळी उपस्थित होते.

 

     श्री. मुनगंटीवार म्हणाले, पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्य प्राण्यांचा अधिवास वाढविण्यास उत्तम कार्य झाले आहे. या व्याघ्र प्रकल्पासह राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्प आणि वन विभागात सर्व महत्वाची संसाधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. राज्य शासनाने वनक्षेत्रातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. आस्थापना खर्च वजात करून तेंदूपत्ता  मजुरांना 72 कोटी रुपयांचे बोनस देण्यात आले आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 25 लाखांची सानुग्रह मदत करण्यात येते. या दोन्ही तरतुदी देशात फक्त महाराष्ट्रानेच केल्याचे त्यांनी नमूद केले.

 

     वटवृक्ष वाढीसाठी वन विभागाने शासन निर्णय काढला असून वड,पिंपळ आदी वृक्षांची लागवड व्हावी आणि वृक्ष जगवणारे हात वाढले पाहिजे.वृक्ष, वन्यजिवांचा अधिवास वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत,असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. 1 ते 3 मार्च 2024 दरम्यान चंद्रपूर येथे 'ताडोबा महोत्सव' आयोजित करण्यात येणार असून देशभरातील वनमंत्री यात सहभागी होणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

पाच उपक्रमांचे आभासी पद्धतीने उद्घाटन

 

     या कार्यक्रमात आवळेघाट येथील स्वराज दुग्धसंकलन केंद्र, नागलवाडी येथील प्रगती अगरबत्ती निर्माण केंद्र,सुवरधरा येथील सुवरधरा शिलाई केंद्र, नरहर येथील वंदे मातरम वन ई-सेवा केंद्र आणि जटायु (गिधाड) संवर्धन प्रकल्पाचे श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते आभासीपद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

 

      पेंच व्याघ्र प्रकल्पातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचारी व स्थानिक नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.तीन वनरक्षकांना 'स्टार ऑफ द मंथ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जलद बचाव दलामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले. प्राथमिक प्रतिसाद दलातील दोन कर्मचाऱ्यांनाही गौरविण्यात आले. 'अंगार मुक्त पेंच स्पर्धेती'ल विजेत्या पाच ग्रामपंचायतींना यावेळी सन्मानित करण्यात आले.

 

       व्यावसायिक सामाजिक जबाबदारीद्वारे (सीएसआर) पेंच व्याघ्र प्रकल्पाला विविध विकासात्मक कामांसाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते 'पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कॉफीटेबल बुक' आणि 'पक्षी सर्वेक्षण अहवाला'चे  विमोचन करण्यात आले.

 

       ॲड. आशिष जयस्वाल यांनीही उपस्थितांना संबोधित केले. महिप गुप्ता यांनी प्रास्ताविक केले तर रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

       तत्पूर्वी, श्री मुनगंटीवार यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पास भेट देत येथील विविध विकास कामांचे उद्घाटन केले. सर्वप्रथम त्यांनी खुर्सापार नूतन सफारी गेटचे उद्घाटन केले. येथेच त्यांनी निसर्ग मार्गदर्शक आणि जिप्सी चालक यांना गणवेश वाटप केले. व्यावसायिक सामाजिक जबाबदारीद्वारे (सीएसआर) पेंच व्याघ्र प्रकल्पास देण्यात आलेल्या जेसीबीचे हस्तांतरण श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.या परिसरातील तिकीट घर, स्मरणिका व वस्तू विक्री केंद्र, उपहारगृह, स्वच्छतागृह,सुसज्ज कार्यालयाचेही उद्घाटन त्यांनी केले.

       पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सील्लारी गेट परिसरातील विविध उपक्रमांचे श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. येथील

 पिपरिया गावाशेजारील कोलितमारा येथे परमोटरींग व  हॉट एअर बलून हा साहसी क्रीडा उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले.वाघोली तलाव येथे 'डार्क स्काय प्रकल्प' आणि 'हत्ती कॅम्पचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. अमलतास येथे श्री.मुनगंटीवार यांनी विविध उपक्रमांच्या स्टॉल्सला भेट दिली व पाहणी केली.

0000



ऑनलाईन विक्री व व्यवस्थापन हाच आजच्या काळात महिला बचत गटांसाठी यशाचा मंत्र


 

▪जि.प.अध्यक्षा मुक्ता कोकड्डे 10 दिवसीय महालक्ष्मी सरस महोत्सवास प्रारंभ

 

▪महाराष्ट्रातील विविध खाद्य पदार्थांसह दर्जेदार उत्पादने ग्राहकांच्या भेटीला

जिल्हा परिषद व उमेदतर्फे भव्य व्यवस्था

 

नागपूर दि.17 :  बचत गटातील महिलांनी आर्थिक व्यवहारापलीकडे जाऊन आता विचार केला पाहिजे. आपल्या उत्पादनांना गुणवत्तेची जोड देत त्याचे पॅकेजिंग, मांडणी ही अधिक चांगली करण्यावर प्रयत्नशिल असणे गरजेचे आहे. ऑनलाईन विक्री व व्यवस्थापन हा आजच्या काळाचा यशस्वी मंत्र असून यासाठी नवतंत्रज्ञान साक्षरतेकडे बचत गटांनी वळावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी केले.

 

रेशीमबाग येथील मैदानात राज्यस्तरीय अतिरिक्त महालक्ष्मी सरस महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. 10 दिवसीय चालणाऱ्या या  महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास  उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाडे, अपर जिल्हाधिकारी तूषार ठोंबरे, उमेदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बापासाहेब निमाने, उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे, उपसंचालक शितल कदम, निलेश कारंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका  वर्षा गौरकर व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांनी एक चांगला दर्जा प्राप्त केला आहे. महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंसाठी बाजारपेठ मिळावी, चालना मिळावी यासाठी केंद्र व राज्य शासन सतत प्रयत्नशील आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शन याचाच एक भाग आहे. या माध्यमातून आपल्या गुणवत्तापूर्ण उत्पादनातून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या बचत गटातील महिलांना एक चांगली संधी मिळाली आहे.  मुंबईच्या पाठोपाठ  नागपूर येथे राज्यपातळीवरील महालक्ष्मी सरस महोत्सवास नागपूरकरांनी भरघोस प्रतिसाद देऊन महिला बचत गटांना सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी केले. 

 

उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांची एक अभूतपूर्व चळवळ राज्य शासनाने महाराष्ट्रात रुजविली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सुमारे 3 कोटी महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ मिळणार असे जाहीर केले आहे. यादृष्टीने महाराष्ट्राला 17 लाख महिलांचे उद्दिष्ट दिले आहे. यातील सुमारे 15 लाख महिलांनी आपल्या बचत गटांच्या माध्यमातून लखपती दिदी होण्याचा मान मिळविला असून उर्वरित दोन लाख महिलांच्या लखपती दिदी होण्याचे उद्दिष्ट लवकरच महाराष्ट्र साध्य करेल, असा निर्धार उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयेश जयवंशी यांनी व्यक्त केला. नागपूर येथील राज्यपातळीवर आयोजित करण्यात आलेला हा सरस महोत्सव नागपूरकरांच्या प्रतिक्षेत असून रेशिमबाग येथील या प्रदर्शनाला अधिकाधिक लोकांनी भेट देऊन, येथील वस्तु विकत घेऊन बचत गटांच्या महिलांचा आत्मविश्वास अधिक दृढ करावा, असे ते म्हणाले. 

 

महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीसह प्रत्येक जिल्ह्यातील वैविद्यपूर्ण उत्पादने या प्रदर्शनात आहेत. जालना येथून कोवळ्या लोकरीच्या घोंगड्या, कोकणातील मालवणी मसाला, खानदेशी पापड, आपली भिवापूरची तिखट मिरची, मसाले, गाईचे तुप असे खुप सारे वैविद्यपूर्ण उत्पादने या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत. सुमारे 300 स्टॉल्स या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात आहेत. 10 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी दिली.

 

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाडे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा सुंदर गाव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  उपस्थितांचे आभार ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका वर्षा गौरकर यांनी केले तर सुत्रसंचलन रेणुका देशकर यांनी केले. यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

0000000

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत मुरलीधर पांडुरंग निनावे प्रथम विजेता


 

नागपूर दि.17 :  विभागीय हातमाग कापड स्पर्धेत मुरलीधर पांडुरंग निनावे प्रथम विजेता ठरला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.  विदर्भातील विणकर आपले नाविण्यपूर्ण वाणाचे प्रकार विभागीय हातमाग कापड स्पर्धेसाठी आणतात. त्या वाणांमधून समितीमार्फत 3 पारितोषिक दिले जातात व विणकरांना अनुक्रमे रक्कम 25 हजार, 20 हजार व 15 हजार असे पुरस्कार देण्यात येतात.

 

विजेत्यांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योग आयुक्त अविद्यांत पंडा होते तर प्रमुख अतिथी म्हणून खनिकर्म संचालनालयाच्या वासुमना पंत (पंडा) होत्या. उपायुक्त श्री. पराते, प्राध्यापक लिपीका चक्रवर्ती,, गंगाधर गजभिये, अंजू बालपांडे यावेळी उपस्थित होते.

           

प्रारंभी दीप प्रज्वलन करुन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी हातमाग कापडाची पाहणी केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त सिमा पांडे यांनी केले. राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून विणकरांना लाभ देत असते. त्या विविध योजनेबद्दल माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एच रोहणकर यांनी केले. यावेळी प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

00000


--

 


विभागीय आयुक्त कार्यालयात

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन   

 

नागपूर दि.20 : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात तहसिलदार महेश सावंत, नायब तहसिलदार आर.के. दिघोळेनितीन डोईफोडे, लेखाधिकारी रत्नाकर पागोटे, नाझर अमित हाडके यांच्यासह उपस्थित  अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 


छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्तालयात साजरी



 

नागपूर, दि.19 : स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विपीन  इटनकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.निवासी उपजिल्हाधिकारी श्रीराम मुंदडा, अधीक्षक कमलाकर गायकवाड यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

             विभागीय आयुक्त कार्यलयात आयोजित कार्यक्रमात उपायुक्त चंद्रभान पराते यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तहसिलदार आर.के.दिघोळे,लेखाधिकारी रत्नाकर पागोटे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

                  उभय कार्यालयांमध्ये कार्यक्रम प्रसंगी ‘गर्जा महाराष्ट्र माझा …’ हे  राज्यगीत सादर झाले.

00000

 

Monday 12 February 2024

नागरिकांच्या तक्रारींना वेळेत उत्तर देवून सुस्पष्ट मार्गदर्शन करा -विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

 



 

§       विभागीय लोकशाही दिनात 4 तक्रारी प्राप्त

§       कमी तक्रारी ही लोकशाही दिन आयोजनाची सफलता

§       नागरिकांना लोकशाही दिनात तक्रार करण्याची गरज पडू नये

 

   नागपूर दि. 12  :  विभागीय लोकशाही दिनात अपील अर्जांची संख्या कमी होवून तालुका व जिल्हास्तरावरील लोकशाही दिनातच नागरिकांच्या समस्या निकाली निघणे, ही लोकशाही दिन आयोजनाची सफलता आहे. मात्र शासकीय कार्यालयांनी नागरिकांना त्यांच्या तक्रारींवर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीसंदर्भात विहित वेळेत उत्तर देवून सुस्पष्ट मार्गदर्शन करावे, जेणेकरून त्यांना लोकशाही दिनात तक्रार करण्याची गरजच पडणार नाही, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

  प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या सोमवारी विभागस्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज विभागीय आयुक्त कार्यालयात श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) विजय माहुरकर व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

  विभागीय लोकशाही दिनात आज एकूण चार तक्रार अर्ज दाखल करण्यात आले. विभागीय आयुक्त यांनी संबंधीत तक्रारदारांकडून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या व पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. प्राप्त सर्व तक्रार अर्ज पुढील 10 दिवसात निकाली काढण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी संबंधीत विभागांना दिले.

याप्रसंगी विविध विभाग प्रमुख व अधिकारी हजर होते.

0000

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा -सारथीचे आवाहन


 

                             15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार

 

नागपूर,दि.12 : मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेने (सारथी) ‘महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना 2023-2024’ जाहीर केली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी कार्यरत सारथी संस्थेने या समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना घोषित केली आहे. या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथीच्या नागपूर विभागीय कार्यालयाचे उप व्यवस्थापकीय संचालक हरिष भामरे यांनी  केले आहे. या शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती सारथीच्या www.sarthi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000000 

 


--

आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड


 

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन

 

    गोंदियादि.11 :  देशाच्या अमृत काळात 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल. यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून प्रकृतीची काळजी घ्यावी तसेच  देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करावीअसे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले.

       येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूच्या भूमिपूजन समारंभात उपराष्ट्रपती श्री. धनखड बोलत होते. राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेपालकमंत्री धर्मरावबाबा आत्रामवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफखासदार सर्वश्री प्रफुल्ल पटेलसुनील मेंढेडॉ. सी.एम. रमेशडॉ. श्रीकांत शिंदेआमदार सर्वश्री विनोद अग्रवालविजय रहांगडालेराजू कारेमोरेमनोहर चंद्रिकापुरेसहसराम कोरेटे,  वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेआयुक्त राजीव  निवतकर व अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यावेळी उपस्थित होते.

          महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण तसेच सार्वजनिक आरोग्य विषयक सुविधांबाबत समाधान व्यक्त करून उपराष्ट्रपती म्हणालेआयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना जगातील सर्वात मोठे आरोग्यविषयक सुरक्षा कवच देण्यात आले आहे. नागरिकांना उपचारासाठी केवळ आर्थिक मदत नव्हे तर या माध्यमातून आरोग्यविषयक संपूर्ण सेवा अत्यंत प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वेद हा देशाचा मोठा सांस्कृतिक वारसा असून त्यात मोलाचे आरोग्यविषयक मार्गदर्शन आहे. उत्तम आरोग्याची जपणूक करून आपण नव्या भारताच्या निर्मितीत योगदान देऊ शकतोअसे त्यांनी यावेळी सांगितले.

        योगविद्येच्या माध्यमातून भारताने जगाला एक मोठी देणगी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभरात योग पोहोचला आहे असे सांगून उपराष्ट्रपती म्हणालेयापूर्वी साधारण आजारांवरील उपचारांसाठीही परदेशात जावे लागत होते आता देशात सर्वत्र प्रगत उपचार उपलब्ध झाले आहेत. महाराष्ट्राने जिल्हास्तरावर सुपरस्पेशालिटी रुग्णालय स्थापन करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठी मदत होईल. औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचा विशेष उल्लेख करून प्राचीन काळापासून सुरू असलेली आयुर्वेद जीवनपद्धती जपण्याचे आवाहन, उपराष्ट्रपतींनी केले.

आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त - मुख्यमंत्री

        गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नव्या स्वतंत्र इमारतीची उभारणी व्हावी ही जिल्ह्यातील नागरिकांची आग्रही मागणी होती.  नव्या वास्तूचे भूमिपूजन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले असून या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

        राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. शासकीय रुग्णालयात सर्व सेवा मोफत देण्यात येणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांना दीड लाखांवरुन आता 5 लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे. हे सरकार लोकाभिमुख असून शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. राज्य शासनाने धानाला प्रथमच 20 हजार रुपये बोनस दिला  आल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सशक्तीकरणा अंतर्गत राज्यातील 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. माता सुरक्षीत तर देश सुरक्षीत असे धोरण राबविण्यात येत आहे. लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मग्रारोहयो अंतर्गत कामे सुरु आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग आता गोंदिया पर्यंत पोहोचणार आहेअसे त्यांनी यावेळी सांगितले.

                                                                                               

 

         वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीम म्हणालेजिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या उत्तम सेवा देण्यासाठी गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता होतीच, जिल्ह्यातील नागरिकांची मागणीही होती. ही मागणी आज पूर्ण होत आहे. 690 कोटींच्या निधीतून या महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये अत्याधुनिक सुविधेंसह 400 बेडची क्षमता राहणार आहे. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 150 विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

                खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले कीवैद्यकीय महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी गोंदिया येथील विद्यार्थ्याना नागपूर येथे व दूरवर जावे लागत होते. परंतु आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून ही पायपीट दूर झालेली असून आर्थिक व वेळेची बचत सुध्दा झालेली आहे.  या नवीन इमारतीमुळे गोंदिया जिल्ह्यातील १३ लाखांवर नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा सुविधा तर मिळतीलचशिवाय बालाघाटराजनांदगाव आणि छत्तीसगडमधील इतर जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या गरजाही पूर्ण होतील असे त्यांनी सांगितले. या भूमिपूजन समारंभास नागरिकवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाविषयी थोडक्यात...

          गोंदिया, कुडवा येथे ६८९ कोटी रुपये खर्च करून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. गोंदिया जिल्ह्याला सन २०१३-१४ मध्ये "विद्यमान जिल्हा/संदर्भ रुग्णालयांसह नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची परवानगी मिळाली. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची परवानगी मिळाल्यानंतर कुंवर तिलकसिंह सामान्य रुग्णालय (केटीएस जनरल हॉस्पिटल) आणि बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय (बीजीडब्ल्यु जनरल हॉस्पिटल) गोंदिया येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयांच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून १०० एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचचे प्रवेश सुरू केले. केंद्र सरकारने २०१९ मध्ये ५० जागा वाढवून दिल्या.                  

       दरवर्षी सुमारे दोन लाख रूग्णांची ओपीडी आणि २८ हजाराहून अधिक रुग्णांना दाखल केले जाते. दरवर्षी या हॉस्पिटलमध्ये १६ हजार शस्त्रक्रिया आणि जवळपास ५ हजार प्रसूती केल्या जातात.

        कुडवा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयगोंदियाच्या नवीन आवारात अत्याधुनिक आयसीयू सुविधाएमसीएच केअर सुविधा आणि ओटी कॉम्प्लेक्स असतील. यामुळे विविध बहु-विशेष विभागांमध्ये उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात मदत होणार आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण केल्यानंतरखाटांची क्षमतावॉर्ड्सची पायाभूत सुविधा आणि जीएमसीच्या ओपीडीओटीलेबर रूमआयसीयूमुळे ३ लाख ते ४ लाख ओपीडींना आरोग्य सेवा पुरविण्यात मदत होणार आहे.

            या ठिकाणी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. नवीन आवारात वैद्यकीय शिक्षणासाठी सुसज्ज लायब्ररीप्रगत संवादात्मक अध्यापन कक्षपरीक्षा कक्षक्रीडा सुविधा आणि सांस्कृतिक सभागृह उपलब्ध होणार आहेत.

000000