Thursday 31 May 2018

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर

      मुंबईदि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात पशुसंवर्धनदुग्धविकासमत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही  मुलाखत उद्या शुक्रवार दिनांक   जून  रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक युवराज मोहिते यांनी ही मुलाखत घेतली आहे.
             राज्यात दुधाचे उत्पादन आणि दुधाळ पशुंच्या दुग्धोत्पादनात भरीव वाढ करण्यासाठी शासनाकडून घेण्यात आलेले निर्णयदुधाळ जनावरांची वाटप योजनाराज्यतील कुक्कुट पालन तसेच अंडी उत्पादन वाढावे यासाठी शासनाकडून  राबविण्यात येत असलेल्या आर्थिक सहाय्याच्या योजना, ‘चारायुक्त शिवार’, सघन कुक्कुट विकास योजना, ‘कामधेनू दत्तक ग्राम योजना’ काय आहेविदर्भमराठवाड्यासाठी राबविण्यात येणारे विशेष प्रकल्प आदी विषयी सविस्तर माहिती श्री जानकर यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.
                                                            ******

पंकजा मुंडे यांनी केले पांडूरंग फुंडकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारा उमदा नेता हरपला


मुंबई, दि. 31 : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या दुःखद निधनाबद्दल राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आज सकाळी त्यांनी के. जे. सोमय्या रूग्णालयात जाऊन फुंडकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे व श्री. फुंडकर यांचा एक कौटुंबिक स्नेह होता. श्री. फुंडकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक उमदा नेता गमावला आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे नेते हरपले आहेत. तसेच हृदयात रिकामं रिकामं वाटणारी भावना होते जेव्हा आपला कोणी माणूस जातो !  श्री. फुंडकर काका गेल्याने असंच वाटत आहे. मुंडे साहेबांचे जीवलग मित्र व आमचे कुटुंबातील सदस्य भाजपाचे जेष्ठ नेते कृषी मंत्री हयात नाहीत ही न भरून येणारी पोकळी आहे. त्यांच्या जाण्याने तीव्र दुःख होत आहे अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
०००

कृषीमंत्री श्री.पांडुरंग फुंडकर यांना विधानसभा अध्यक्षांची आदरांजली शेतीप्रश्नांची जाण असलेल्या ज्येष्ठ नेत्यास तसेच चाळीस वर्षांच्या संघटनासोबतीस मुकलो...

मुंबई, दि. 31 :    राज्याचे कृषीमंत्रीभारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेश अध्यक्षमाजी लोकसभा सदस्य श्री.भाऊसाहेब तथा पांडुरंगजी फुंडकर यांच्या निधनामुळे एका कुशल संघटकास तसेच शेतीप्रश्नांची जाण असणाऱ्या ज्येष्ठ नेत्यास आपण मुकलो आहोत. पक्षसंघटनेत गेली ४० वर्षे आम्ही दोघांनी बरोबरीने काम केले आहेत्यामुळे त्यांच्या जाण्याने मला झालेली दु:खवेदना शब्दात व्यक्त करणे शक्य नाही.
 विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करतांना त्यांनी जनसामान्यांचा आवाज विधीमंडळात बुलंद केला आणि आपल्या कार्याचा ठसा उमटविला. कापूस प्रश्नासंदर्भात त्यांनी काढलेली खामगाव ते नागपूर कापूसदिंडी गाजली. शेतकरीहितासाठी ते अखंड कार्यमग्न होतेअशा शब्दात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे. फुंडकर परिवाराच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी असून परिवार आणि कार्यकर्ते यांना हा आघात पेलण्याचे सामर्थ्य परमेश्वर देवो ही प्रार्थनाअसेही त्यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हंटले आहे.
००००

कृषी आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ जाणकार नेत्याला गमाविले - शिक्षणमंत्री विनोद तावडे

मुंबई दि. 31 : ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने कृषीविषयक आणि सहकारक्षेत्रातील प्रश्नांची खरी जाण असणा-या नेत्याला आपण कायमचे मुकलो आहोतअशा शब्दात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी फुंडकर यांना श्रध्दांजली वाहिली.
श्री. फुंडकर यांनी गेली अनेक वर्षे पक्षामध्ये विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन निघणे अशक्य आहेअसेही श्री. तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
0000

दिलखुलास मध्ये वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार (31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त)

मुंबई 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीच्या दिलखुलास  कार्यक्रमात शासकीय दंत महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांची 'तंबाखू सेवनाचे दुष्परिणामया विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून दि. 1 आणि 2 जून रोजी सकाळी 7:25 ते 7:40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका शुभांगीनी पाटील यांनी  ही मुलाखत  घेतली  आहे.
           31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी जगभर दिन पाळला जातो. या निमित्ताने समाजात जनजागृती होण्यासाठी तंबाखू सेवनाचे दुष्परिणामतंबाखू पासून होणारे विविध कर्करोगत्यांची लक्षणे व उपचार तसेच तंबाखूच्या व्यसनापासून मुक्तता मिळविण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत माहिती डॉ. पवार यांनी दिलखुलास  कार्यक्रमातून  दिली आहे.
0000

भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने कृषी क्षेत्राची जाण असणारे नेतृत्व गमावले - महादेव जानकर

            मुंबईदि. 30: राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग ऊर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाने मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आणि कृषी क्षेत्रातील जानकार व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्र पारखा झाला आहेया शब्दात पशुसंवर्धनदुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी शोक व्यक्त केला आहे.  भाऊसाहेब यांचे शेतीशी आणि मातीशी घट्ट नाते होते. शेतकऱ्यांच्या उन्नतीची तळमळ असल्याने त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. भाऊसाहेब यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्यासाठी ईश्वर बळ देवो अशी प्राथना करतोअसेही श्री. जानकर म्हणाले.
0000

विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक तक्रारींसाठी मंत्रालयात नियंत्रण कक्ष सुरु

    मुंबईदि. 31 : महाराष्ट्र विधानपरिषदेतील नाशिक विभागातील एका शिक्षक मतदार संघातूनकोकण विभागातील एका शिक्षक मतदार संघातून व 2 पदवीधर मतदार संघातून निवडून आलेल्या सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत दिनांक 7 जुलै 2018 रोजी संपत असल्याने ते निवृत्त होणार आहेत. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने दिनांक 24 मे 2018 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून दिनांक  28 जून2018 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक 2 जुलै2018 आहे. या निवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल करण्याकरिता मंत्रालयात 24 तास नियंत्रण कक्ष प्रस्थापित करण्यात आला आहे.
   या निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजेच 31 जून2018 ते 2 जुलै2018 पर्यंत कक्ष क्र. 611निवडणूक शाखासामान्य प्रशासन विभाग6 वा मजलामंत्रालय विस्तार इमारतमादाम कामा मार्गहुतात्मा राजगुरु चौकमंत्रालयमुंबई-32येथे नियंत्रण कक्ष’ 24x7 तत्वावर स्थापन करण्यात आला आहे. निवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल करावयाची असल्यास नियंत्रण कक्षात दूरध्वनी क्र.022-22026441मोबाईल क्र.9619204746 या क्रमांकावर तक्रार करावीअसे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

००००

शेतकरी आणि सर्वसामान्यांचा नेता पडद्याआड - सुधीर मुनगंटीवार

      मुंबई दि 31 : कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर  यांच्या निधनाने शेतकरी आणि  सर्व सामान्यांचा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. अशा शब्दात अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. 
            शोक संदेशात श्री मुनगंटीवार म्हणतात, शांत संयमी आणि सर्वमान्य नेता  असा  त्यांचा परिचय होतासर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी त्यांची  थेट नाळ जुळली  होती.       
            तीन वेळा अकोला मतदार संघाचे खासदारप्रदेशाध्यक्षविरोधी पक्ष नेता आणि कृषी मंत्री अशा विविध पदांवर सहजपणे काम करताना त्यांनी पक्षापलिकडे जाऊन नाती जोडली. सतत कार्यकर्त्यांच्या गर्दीत वावरणारा हा नेता होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण होती. विरोधी पक्षात असताना त्यांनी खामगाव ते आमगाव अशी शेतकरी दिंडी काढून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. आता कृषीमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत करताना या क्षेत्रातील गुंतवणुकीवर अधिक भर दिला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो तसेच त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकत देवोअसेही श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
000

मुख्यमंत्र्यांनी घेतले कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे अंतिम दर्शन


मुंबईदि.31: कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे क.जे. सोमय्या हॉस्पिटलमध्ये गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून सोमय्या हॉस्पिटलमध्ये जाऊन अंतिम दर्शन घेतले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेपदुम मंत्री महादेव जानकरगृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटीलउद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटीलराज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलआमदार राज पुरोहितआशिष शेलारसंजय कुटेमधू चव्हाणमाधव भंडारीमुख्य सचिव दिनेशकुमार जैनकृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी फुंडकर यांचे कुटुंबीय आमदार आकाश फुंडकर व सागर फुंडकर यांची भेट घेऊन सांत्वन केले.
0 0 0

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबईदि. 31 : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलआरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंतसामान्य प्रशासनचे प्रधान सचिव महेश झगडे यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0 0 0

शेती-सहकाराच्या परिवर्तनासाठी प्रयत्नशील असणारा नेता गमावला मुख्यमंत्र्यांची भाऊसाहेब फुंडकर यांना श्रद्धांजली

मुंबईदि. 31 :  राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग ऊर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनाने कृषीसहकार आणि संबंधित विषयांची सखोल जाण असणारा आणि या क्षेत्रात सकारात्मक परिवर्तनासाठी प्रयत्नशील असणारा नेता राज्याने गमावला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतातश्री. फुंडकर यांच्या निधनामुळे मी एक ज्येष्ठ सहकारी आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे. शेती आणि सहकारासह संबंधित विविध विषयांची  त्यांना सखोल  जाण होती. विरोधी पक्षनेतेआमदारसंसद सदस्यभाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळताना  पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. सध्या राज्यात शाश्वत शेती विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये त्यांचा कृषीमंत्री म्हणून मोठा पुढाकार होता. उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनापीक विमा योजनागटशेतीएकत्रित क्रॉपसॅप योजनामहावेध प्रकल्पनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पकृषी व अन्न प्रक्रिया उद्योग अशा अनेक  महत्त्वपूर्ण उपक्रम-योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचे कसोशीने प्रयत्न होते. कीटकनाशकांच्या को-मार्केटिंगवर बंदी आणतानाच  कीटकनाशके आणि बीटी बियाण्यांचे परराज्यात उत्पादन करून महाराष्ट्रात ते विविध कंपन्यांच्या नावाने विक्री करण्यासाठी (को-मार्केटिंग) परवाना न देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला होता.
तत्पूर्वीमुख्यमंत्र्यांनी सकाळी सोमय्या हॉस्पिटलमध्ये जाऊन श्री. फुंडकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
0 0 0

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख


मुंबई, दि. 31 : राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. श्री फुंडकर हे लोकनेते आणि समर्पित लोकप्रतिनिधी होते. कृषिमंत्री असताना ते मला नियमितपणे भेटत. शेतकर्‍यांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती व त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिक इच्छा होती. फुंडकर यांचे संघटन कौशल्य सर्वज्ञात होते. त्यांनी जनतेशी असलेली आपली नाळ आयुष्यभर जपली. संसद सदस्य तसेच विधानमंडळाचे सदस्य या नात्याने त्यांनी जनतेच्या विविध प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडली.  त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक उत्तम संसदपटू गमावला आहे. त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहतो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या शोकसंवेदना कळवतो,असे विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

पंजाब-हरियाणाच्या धर्तीवर राज्यात ब्रँडींग व मार्केंटिंग कार्यप्रणालीचा वापर करणार -सुभाष देशमुख


 मुंबई,दि. 31 : मार्केटिंग फेडरेशनकृषी मंडळ पुणेमहाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ यांनी एकत्रित येवन पंजाब हरियाणाच्या धर्तीवर राज्यातग्रो-प्रोसेसिंगब्रँडींग व मार्केंटिंग कार्यप्रणालीचा वापर करून याद्वारे राज्यातील खरेदी विक्री संघशेतकरी उत्पादक संस्था,  महिला बचत गट व वि.का.स. सोसायटयांचे सक्षमीकरण करणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
अटल महापणन विकास अभियानअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन व सभासद संस्थाच्या सक्षमीकरणासंदर्भात पंजाब-हरियाणा दौरा सादरीकरणसंदर्भात श्री.देशमुख यांच्या दालनात काल आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसेकृषी पणन मंडळचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवार,महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरेविदर्भ पणन महासंघाचे  व्यवस्थापकीय संचालक श्री. हरिबाबु तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, पंजाबहरियाणा येथील मार्केटिंग फेडरेशन व सभासद संस्था यांनी मोठया प्रमाणात प्रगती केली आहे. कडधान्य,तेलबिया,गहु,तांदुळ यापासून विविध प्रकारची तयार केलेली उत्पादने जागतिक स्तरावर पोहचली आहेत. त्यांनी अन्नधान्य खरेदी बरोबरकृषी निविष्ठा पुरवठाअग्रो-प्रोसेसिंगब्रँडींग व कृषी उत्पादनांचे मार्केंटिंग असे विविध व्यवसायिक उपक्रम राबविले आहेत.

वाहतूक क्षेत्रातील बदलासाठी राज्य शासन सज्ज - मुख्यमंत्री

    यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेराज्यातील दळणवळण क्षेत्रात मोठे बदल करण्यासाठी आजचे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. सुलभसुयोग्य तसेच पर्यावरणपूरक दळणवळण व शाश्वत वाहतूक व्यवस्था वाढविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. त्यासाठी प्रदुषणमुक्त अशा विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराचे धोरण (ई व्हेइकल पॉलिसी) तयार केली आहे. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देशात होत असलेले मोठे बदल स्वीकारण्यासाठी राज्याने पुढाकार घेतला असून आम्ही वेगाने पुढे जाऊ. आता ही सुरुवात असून आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. 
 राज्यातील विशेषतः मुंबईपुणे व नागपूर सारख्या महानगरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई व्हेइकल) वापर वाढविण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार आहे. तसेच शासकीय कार्यालयांसाठी विजेवर चालणारी वाहने वापरण्यात येणार आहेतअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
सन 2030 पर्यंत सर्व वाहने विजेवर चालणारी वाहने आणणार- डॉ. हर्षवर्धन
राज्य शासनाने पर्यावर वाचविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अभिनंदन करून केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलेविजेवर चालणारी वाहने व त्यासाठीची सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला आहे. सन 2030 पर्यंत सर्व वाहने ही विजेवर चालणारी आणण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. मिशन इनोव्हेशन अंतर्गत केंद्र शासनाने विविध संशोधनावर मोठा भर दिला असून त्यासाठी विविध विद्यापीठे व संस्थांची प्रोत्साहन दिले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांची आवश्यकता आहे. ही वाहने स्वस्तसहज परवडणारी असून या वाहनांसाठी वीजपुरवठाही सुलभपणे करण्यात येणार आहे.
पर्यावरण वाचविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ व केंद्र शासन मोहीम राबविण्यात येत असून सर्वांनी पर्यावरण वाचविणे हे आपले नैतिक कर्तव्य मानून यामध्ये सहभागी व्हावेअसे आवाहन डॉ. हर्षवर्धन यांनी केले.
विजेवर चालणाऱ्या वाहनांमुळे रोजगार संधी वाढणार - इरिक सोल्हेम
संयुक्त राष्ट्र संघ- पर्यावरणचे कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम म्हणालेप्रदूषणापासून देश व पर्यावरणाच्या रक्षणासाठी याप्रकारची पावले उचलणे आवश्यक ठरणार आहे. यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने पुढाकार घेतला आहे. वीजेवर चालणारी वाहने ही पुढील काळाची आवश्यकता ठरणार असून ती स्वस्त व पर्यावरणपूरक आहेत. यामुळे या क्षेत्रात रोजगार संधी व आर्थिक भरभराट होणार आहे.
यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी पर्यावरण रक्षणासाठी महिंद्रा कंपनी नेहमीच सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक प्रविर सिन्हामुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंहपरिवहन आयुक्त शेखर चन्नेबेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांनी केला विजेवर चालणाऱ्या बसमधून मंत्रालय ते गेट वे प्रवास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्रालयात उभारण्यात आलेल्या ई चार्जिंग सेंटरचे उद्घाटन केले. त्यानंतर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री महोदयांनी वीजेवर चालणाऱ्या बेस्टच्या बसमधून मंत्रालय ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर प्रवास केला. यावेळी आमदार राज पुरोहितसंयुक्त राष्ट्र संघ- पर्यावरणचे कार्यकारी संचालक इरिक सोल्हेममहिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा आदींनी या बसमधून प्रवास केला.
000

ई व्हेइकलच्या वापरासाठी राज्यशासनाचे पाच महत्त्वाचे करार सार्वजनिक वाहतुकीसाठी विजेवरील वाहनांचा वापर वाढवणार - मुख्यमंत्री

मुंबईदि. 31 : विजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई व्हेइकल) वापर वाढविण्यासाठी राज्य शासनाने आज मोठे पाऊल उचलले असून या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय पर्यावरणवन मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र शासन आणि टाटा मोटर्समहिंद्रा अँड महिंद्रा व इइएसएल या कंपन्यांसोबत पाच महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. पुढील काळात शासकीय वापरासाठीची तसेच महानगरांमधील सार्वजनिक वाहतुकीसाठी ई व्हेईकलचा वापर वाढविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी केली.
राज्य शासनाच्या विजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई व्हेईकल) वापर करण्यासंदर्भातील धोरणाच्या अनुषंगाने आज राज्य शासनाने शासकीय कार्यालयेसार्वजनिक तसेच खासगी वाहतूक सेवांमध्ये ई व्हेइकलचा वापर,  चार्जिंग केंद्रे उभारणे आदीविषयी सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटीलमुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरसंयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे (युएनइपी) कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम आदी उपस्थित होते.
विजेवरील वाहनांच्या वापरासाठी राज्य शासनाचे सामंजस्य करार
महिंद्रा समूह व उद्योग विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल व महिंद्रा ॲण्ड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका यांनी स्वाक्षऱ्या केल्या. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी ही चाकण येथील प्रकल्पात वीजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या उत्पादनासाठी उत्पादन क्षमतेत वाढ करणार आहे. तसेच या वाहनांसाठी लागणारे सुटे भाग तयार करणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा व परिवहन विभाग यांच्यात झालेल्या करारावर डॉ. गोयंका व प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार विविध सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्थेसाठी इलेक्ट्रिक कार पुरविण्यासाठी महिंद्रा कंपनी शासनासोबत सहकार्य करणार आहे. परिवहन विभागाने टाटा मोटर्स बरोबर राज्य शासनाला एक हजार इलेक्ट्रिक वाहने पुरविण्यासंदर्भात आज करार केला. या करारानुसार टाटा मोटर्स ही टाटा पॉवरच्या सहकार्याने विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी राज्यामध्ये शंभर चार्जिंग केंद्रे उभारणार आहे. या करारावर टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक ग्युंटेर बुश्चेकव प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
एनर्जी इफिशियन्सची सर्व्हिसेस लिमिटेड (इइएसएल) यांच्याबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग व सामान्य प्रशासन विभागाने सामंजस्य करार केला आहे. इइएसएल ही सार्वजनिक बांधकाम विभाग व सामान्य प्रशासन विभागाला विजेवर चालणाऱ्या कार तसेच या वाहनांसाठी चार्जिंग सुविधा पुरविणार आहे. या करारांवर इइएसएलतर्फे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार व राज्य शासनामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह व सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी निधी पुरवठ्यासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम (युएनइपी) व इइएसएल यांच्यात करार झाला. यानुसार राज्यात विजेवर चालणारी वाहनांच्या वापराचा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम पर्यावरण विभाग इइएसएलला निधी पुरविणार आहे.

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली तंबाखू विरोधी शपथ

मुंबईदि. 31 : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज मंत्रालयात तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना शपथ दिली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलआरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत उपस्थित होते.
मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामावर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सर्वप्रथम दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तंबाखू विरोधी शपथेचे मुख्यमंत्र्यांनी वाचन केले. घरपरिसर,कार्यालयमंत्रालय आणि संपूर्ण महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याची शपथ सर्वांनी घेतली.
यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्याससंचालक डॉ. संजीव कांबळेसहसंचालक डॉ. साधना तायडे आदींसह दंत महाविद्यालयाचे विद्यार्थीमुंबई संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्यात 16 जून रोजी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा


मुंबई, 31 : राज्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी आता रोजगाराच्या एकत्रीतपणे बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून संधी उपलब्ध होणार आहेत.  पुणे जिल्हयातील उरळी देवाची येथे शनिवार दि. 16 जून रोजी  हा मेळावा होणार आहे. दहावी उत्तीर्ण ते पदवीधर मुला-मुलींना या मेळाव्यातून माहिती तंत्रज्ञान, औषध उत्पादक, हॉटेल  व इतर व्यवसाय क्षेत्रातील रोजगाराची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे कौशल्य विकास विभाग, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, उद्योग संचालनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यावतीने युवक / युवतींना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून राज्यभर मेळावे घेतले जाणार आहेत.  त्याचा प्रारंभ पुणे जिल्ह्यातील हडपसर परिसरातील उरळी देवाची येथून 16 जून रोजी सकाळी 10 ते 2 या कालावधीत होणार आहे. 
या मेळाव्यात पुणे परिसर व जिल्ह्यातील प्रमुख उद्योग, कारखाने तसेच माहिती तंत्रज्ञान, औषध उत्पादक, हॉटेल उद्योग आदी क्षेत्रातील .80 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.  संबंधित कंपन्या आपल्या प्रतिनिधीमार्फत इच्छुक उमेदवारांची आवड निवड लक्षात घेऊन प्रत्यक्षात नोकरीची संधी उपलब्ध करुन देणार आहेत. या मेळाव्यात कौशल्य विकास व स्वयंरोजगार या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मेळाव्यात शासनाच्या विविध विभागांची रोजगार-स्वयंरोजगार संबंधीची दालने मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील.  या ठिकाणी इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.  तसेच मेळाव्यानंतरही त्यासंबंधीचा पाठपुरावा केला जाणार आहे.
सीआयआय या उद्योग संघटनेचा या उपक्रमात प्रमुख सहभाग आहे. राज्याच्या विविध भागात अशा प्रकारे मेळावे आयोजित केले जाणार असून त्याद्वारे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी  www.balasahebthackrayrojgarmeleva.com  या संकेतस्थळावर 4 ते 10 जून दरम्यान नोंदणी करावी, असे आवाहन उद्योग मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 
000

ग्रामीण आणि शेतीच्या समस्या जाणनारा नेता हरपला -उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. 31; ग्रामण भागातल समस्या सोडविण्यावर भर देणारे आणि कृषी क्षेत्रातील आव्हानांची जाण असणारे राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने मंत्रिमंडळातील एक जाणकार सहकारी हरपला आहे.  गेली चार दशकं राजकारणात सक्रिय असलेल्या भाऊसाहेबांचे ग्रामण भागातील जनते सोबत विशेष ऋणानुबंध होते. कृषी, सहकार या विषयावर त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
***

राज्याने एक ज्येष्ठ आणि द्रष्टा नेता गमविला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 31; राज्याचे कृषिमंत्री पांडुरंगजी उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने राज्याने एक ज्येष्ठ आणि द्रष्टा नेता गमविला आहे. राज्यातील कृषी, सहकार क्षेत्राचा दांडगा अभ्यास असलेल्या भाऊसाहेबांनी कृषी मंत्री म्हणन राज्याला दिशा दाखविणारे महत्वपूर्ण निर्णय घेतले. विरोधी पक्षनेतेआमदारसंसद सदस्यभाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्याआप्त-मित्रांच्याकार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
***