Wednesday 31 October 2018

मशरुम शेतीतून नमिता इखार यांनी साधली आर्थिक प्रगती


विशेष वृत्त
* पौष्टिक व स्वादिष्ट मशरुम उत्पादने
                      * मशरुम शेती प्रशिक्षणातून अनेकांना मार्गदर्शन
       दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात आयोजित महालक्ष्मी सरस या राज्यस्तरीय महिला बचत गटांच्या प्रदर्शनात अनेक जिद्दी  व  कष्टकरी महिलांची भेट झाली. स्वत:च्या हिमतीवर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिलांना सरसने उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. प्रदर्शन कालावधीत साधारणत: 1 लक्ष विक्री झाल्याचे मशरुमचे विविध उत्पादने बनविणाऱ्या नमिताताईंनी सांगितले.
      स्त्रीला लक्ष्मीचे रुप समजल्या जाते. कोणत्याही कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग त्या घरातील स्त्रीच्या आर्थिक नियोजनाच्या काटकसरीला जाते. अशाच मशरुम शेतीतून स्वत:च्या कुटुंबाचा आर्थिक विकास करणाऱ्या नमिता नारायण इखार.
          भंडारा जिल्ह्याहतील पवनी तालुक्यातील ब्राम्ही  गावातील नमिता इखार यांच्या कुटुंबात दोन मुलं व एक मुलगी. पती शासकीय सेवेत दोनही मुलं मास्टर इन सायन्स (एमएससी) झालेली. पूर्णवेळ गृहणी असलेल्या नमितानी कृषी विभागामार्फत जाम, जेली व लोणचे बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. पुढे उद्योजकतेची कास धरुन मशरुम मुलाच्या मदतीने मशरुम(अळींबी) शेतीची  तळघरात लागवड केली. मशरुमपासून लोणचे, सूप, पापड, फेसपॅक तयार केले. मशरुम लागवडीसाठी दमट व अंधारे वातावरण पाहिजे. मशरुमचे (अळींबी) उत्पादन हरभरा, तूर, कुटार किंवा धानाचा कोंडा हे निर्जंतूक करण्यासाठी साधारण ते 16 तास बॅरलमध्ये बंद ठेवले जाते. त्यानंतर त्यातून पाणी काढले जाते. व  एक किलो मशरुम सीड टाकले जाते ते 100 ते 150 प्रति किलो दराने मिळते. 16 x 20 इंच आकाराच्या प्लास्टिक बॅगेत कुटार भरले जाते. या आकाराच्या कमीत कमी  दहा तर जास्ती जास्त 15 बॅगासाठी एक किलो सीड वापरल्या जाते. मशरुमचे पीक येण्याचा कालावधी हा 45 दिवसांचा असतो. मशरुमसोबतच त्यांनी त्यांच्या घरासमोरील जागेवर कारली, चवळी आंबाडी, मका, दुधी, भोपळा, दोडका या पिकांची लागवड केली आहे.
          नमिता इखार यांनी जाम उत्पादनाचा पौष्टिकपणा वाढविण्यासाठी अंबाडीच्या जामचादेखील त्यात उपयोग केला. महिन्याला साधारणत: 40 ते 50 हजाराचे उत्पन्न मशरुम पावडर ते मशरुमचे जाम, लोणचे, मशरुम पापड, मशरुम मिल्क पावडर, मशरुम कुकीज, मशरुम बिस्किट यासारख्या उत्पादनातून मिळतो. पायलट मशरुम फार्म या नावाने पवनी-भंडारा रोडवर त्यांचे फार्म आहे.
मशरुमचे आरोग्य विषयक फायदे
प्रोटीनचे सर्वाधिक प्रमाण, वजन संतुलित करतो, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण करतो, हाडांचे आरोग्य सुधारतो, कॅन्सरपासून प्रतिबंध, व्हीटॅमीन बी, बी-12 याचा उत्तम स्त्रोत यामध्ये आहे. मशरुमची भाजी आरोग्यासाठी चांगली असते.

      



            मशरुमपासून पारंपरिक उत्पादनापेक्षा लवकरच मशरुमची कोल्ड कॉफी सुद्धा तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. नमितासोबत त्यांची मुलं अनंत व श्रीकांत मुलगी  शुभांगी त्यांना व्यवसायात मदत करते. मशरुमचे वितरक म्हणून त्या काम करतात. मशरुम शेती प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून इतर बेरोजगार तरुण तरुणींना व्यवसायासाठी ते प्रेरणा देतात. त्यांच्या उच्च शिक्षित मुलांनी उत्पादन विक्रीसाठी यू-ट्यूब चॅनल व फेसबुकच्या माध्यमातून मदत केली आहे. खरोखर महिन्याला 40 ते 50 हजार उत्पन्न देणाऱ्या मशरुममधून नमिताताईंनी स्वत:च्या कुटुंबाला आधार दिला आहे.

                                                                                      शैलजा वाघ- दांदळे
       8381001097
  ****

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा नागपूर दौरा

नागपूर, दि. 31 :  केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचे गुरुवारदिनांक१ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.४५ वाजता दिल्ली येथून नागपूर विमानतळावर आगमन व मोटारीने गांधीनगर,जिल्हा चंद्रपूरकडे प्रयाण. रात्री ९.३० वाजता मोटारीने गडचिरोली येथून रविभवन येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवारदिनांक २ नोव्हेंबर रोजी स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती.
                                                                                     ****

जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

           नागपूर, दि 31 :  लोहपुरुषदेशाचे माजी उपप्रधानमंत्रीगृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करुन अभिवादन केले.
            यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी जिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, श्रीमती सुजाता गंधे, श्रीमती राजलक्ष्मी शहा, श्रीमती विजया बनकर, रविंद्र कुभांरे, श्री कडू, श्री. कातकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  सरदार वल्लभाई पटेल यांच्या जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जात आहे  या दिनानिमित्त जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी राष्ट्रीय एकता व अखंडतेची शप दिली.  
                                                                           ****

विभागीय आयुक्त कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन




           नागपूर, दि 31 : लोहपुरुषदेशाचे माजी उपप्रधानमंत्रीगृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करुन अभिवादन केले.
            यावेळी उपायुक्त सुधाकर तेलंग, संजय धिवरे, के. एन. के. राव, प्रादेशिक चौकशी अधिकारी  शैलेंद्र मेश्राम, श्री राठी, सहायक आयुक्त मनषा जायभाये, नायब तहसिलदार सुजाता गावंडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सरदार वल्लभाई पटेल यांच्या जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जात आहे या दिनानिमित्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी राष्ट्रीय एकता व अखंडतेची शपथ दिली.
                                                                         *****

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या विविध बैठका.

मुंबईदि. 31 : अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विविध बैठका पार पडल्या. यात रायगड जिल्ह्यातील प्रलंबित समस्यांचा आढावा त्यांनी घेतला. विविध विषयांवर झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, स्थानिक लोकप्रतिनिधी व संबधित विभागांचे अधिकारी उपस्थ‍ित होते.
रायगड येथे रिलायन्स गॅस पाईपलाईनसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात तफावत असल्याप्रकरणी पेण प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहेतसेच रिलायन्स गॅस पाईपलाईनसाठी तालुक्यातील काही  शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात असलेली तफावत दूर करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळावा यासाठी त्यांनी पाठवलेले प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, असे निर्देश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. 
रायगड येथील पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या पैशातून घेतलेल्या जमिनीच्या प्रश्नांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पभारत सरकारच्या चॅम्पियन सर्व्हिस सेक्टरमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी घेण्यात येणारे नाविन्यपूर्ण प्रकल्पस्वदेश दर्शन या विषयांवर सिंधुदुर्ग जिल्हा जल पर्यटन विकास कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
००००

‘मॉस्को - मुंबई थेट विमानसेवेमुळे व्यापाराला चालना मिळेल’

रशियाच्या नवनियुक्त व मावळत्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई, दि. 31 : रशियाचे नवनियुक्त वाणिज्यदूत अलेक्सी सुरोवत्सेव यांनी मावळते वाणिज्यदूत आंद्रेई झिलत्सोव यांचेसमवेत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची बुधवारी राजभवनमुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
पुढील वर्षापर्यंत रशियातील मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग ही दोन मोठी शहरे मुंबईशी थेट विमानसेवेने जोडली जाणार असून त्यामुळे व्यापारपर्यटन आणि विशेषतः महाराष्ट्रातून होणाऱ्या फळांच्या निर्यातीला चालना मिळेल असे वाणिज्यदूतांनी सांगितले.
रशिया आणि भारत यांचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले असल्याचे नमूद करून संरक्षणसामरिक सहकार्यउर्जा यांसह विविध क्षेत्रात घनिष्ठ सहकार्य आहे. उभय देशांमधील व्यापार संबंध वाढल्यास त्यातून रोजगार निर्मिती होईल आणि उभय देशांना त्याचा फायदा होईल असे वाणिज्यदूतांनी सांगितले. आगामी काळात रशियातील विविध शहरांमधून उद्योजकांचे एक मोठे शिष्टमंडळ दिल्ली तसेच मुंबई भेटीवर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात पायाभूत सुविधापर्यटन विकास आणि फलोत्पादन या क्षेत्रात सहकार्याच्या मोठ्या संधी असून विद्यापीठ स्तरावर विद्यार्थी देवाण घेवाण देखील व्हावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. मावळते वाणिज्यदूत आंद्रेई झिलत्सोव यांनी त्यांना तीन वर्षाच्या कार्यकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.
००००

खांदा कॉलनी, वागळे इस्टेट एमआयडीसीतील 373 कर्मचाऱ्यांना मिळणार स्व मालकीची घरे - उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबईदि. 31 : रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील खांदा कॉलनी तसेच ठाण्यातील वागळे इस्टेट येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी भूखंड देण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. या निर्णयामुळे 373 कर्मचाऱ्यांना स्व मालकीची घरे मिळू शकतील.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 376 वी बैठक पार पडली. यावेळी उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे पाटीलउद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवईएमआयडीसीचे सीईओ पी. अनबलगनविकास आयुक्त (उद्योग) हर्षदीप कांबळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          यावेळी पनवेल येथील खांदा कॉलनी व ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एमआयडीसी कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थांसाठी भूखंड देण्याचा प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. खांदा कॉलनीतील एकूण 12 नियोजित सोसायट्यांसाठी तसेच 168 सभासदांसाठी 9 हजार 850 चौरस मीटर क्षेत्र वाटप केले जाणार आहे. तर ठाणे येथील 9 नियोजित सोसायट्यांच्या 205 सभासदांसाठी 9 हजार 710 चौरस मीटर क्षेत्र  राखीव ठेवण्यात आले आहे.
          बारवी धरण प्रकल्पबाधित कुटुंबांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने नोकरीऐवजी प्रत्येकी पाच लाख रुपये रोखीने देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
महापालिकेतर्फे सुलभच्या धर्तीवर एमआयडीसी क्षेत्रात शौचालय संकूल बांधण्यासाठी सुविधा भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुलभ इंटरनॅशनल सोशल संस्थेने एमआयडीसी हद्दीत अद्ययावत सुलभ शौचालये उभारणे व देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला होता.
          या शिवाय विदर्भमराठवाडाउत्तर महाराष्ट्र व कोकण या मागास भागात उद्योग वाढीसाठी भूखंड देताना प्राधान्य देण्याचे धोरण यावेळी मान्य करण्यात आले. त्याचप्रमाणे समूह (क्लस्टर) उद्योग योजना राबविण्यास या बैठीकीत मंजुरी देण्यात आली.
-एमआयडीसी कर्मचाऱ्यांना उपदानाची (ग्रॅच्युटी) मर्यादा सात लाख रुपयांवरून वाढवून दहा लाख करण्यास मंजुरी.
-पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राजवळील बोरीवली ग्रामपंचायतीच्या पाणी साठवण टाकीसाठी भूखंड मंजूर
-लोटे परशुराम क्षेत्राजवळील धामणगावाच्या स्मशानभूमीसाठी भूखंड मंजूर.
००००

रेशनवर मिळणार साखर, चणा व उडीद डाळ - अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट

मुंबईदि. 31 : सर्व सामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्यातील सुमारे 1 कोटी 23 लाख प्राधान्य कुटुंबांना प्रती कुटुंब 1 किलो साखर 20 रुपये दराने वाटप करण्यात येणार आहे. तरप्रती शिधापत्रिका चणाडाळ 1 किलो आणि उडीद डाळ 1 किलो किंवा दोन्हीपैकी एक डाळ 2 किलो याप्रमाणे वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
            श्री. बापट यांनी सांगितलेलाभार्थ्यांना नोव्हेंबरच्या अन्नधान्य  वाटपासोबत ई पॉस द्वारे साखर घेता येणार आहे. यासाठी राज्यात 39 कोटी किंमतीची 1 लाख 22 हजार 947 क्विंटल साखर उपलब्ध करुन दिली आहे. या वितरण प्रक्रियेत राशन दुकानदारांना 1.50 कोटी रुपयांचे कमिशन मिळणार आहे.  चणाडाळ प्रतिकिलो 35 रु. व उडीदडाळ प्रतिकिलो 44 रु. या दराने रेशन दुकानावर उपलब्ध होणार आहे. 
राज्यात माहे नोव्हेंबर 2018 पासून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना केंद्रशासनाकडून अनुदानित दराने  प्राप्त होणाऱ्या  चणाडाळ व उडीदडाळीचे वाटप सुरु होणार आहे. राज्यात सुमारे 25 लक्ष अंत्योदय व 1 कोटी 23 लक्ष प्राधान्य कुटुंबास याचा लाभ मिळणार असून एकूण 7 कोटी 16 हजार लाभार्थी राज्यभरात आहेत.
धान खरेदीस सुरुवात-
राज्यात सन 2018-19 या चालू हंगामात 450 धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले असून त्यापैकी सद्यस्थितीत 114 केंद्रावर प्रत्यक्षात धान खरेदी सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. बापट यांनी दिली. राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी म्हणून रु. 200 प्रति क्विंटल संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट जमा करण्यात आले आहे. हंगाम 2016-17 मध्ये प्रोत्साहनपर राशीसाठी रु. 63.50 कोटी व हंगाम 2017-18 करिता रु. 45.78 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे.
विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्यांची खरेदी ऑनलार्ईन पध्दतीने करण्यात येते. हंगाम 2017-18 मध्ये सुमारे 1 लाख 11 हजार 564 इतक्या शेतकऱ्यांकडून धान व भरडधान्याची खरेदी करण्यात आली आहे.   हंगाम 2016-17 मध्ये शेतकऱ्याकडून सुमारे 610.35 कोटी व हंगाम 2017-18 मध्ये सुमारे 400.68 कोटी इतक्या रकमेचे धान खरेदी करण्यात आले.
            हंगाम 2014-15 पासून केंद्र शासनाच्या 10 रु. प्रती क्विंटल या धान भरडाई दरांव्यतिरिक्त 30 रु. प्रती क्विंटल अतिरिक्त भरडाई दर  राज्य शासनाकडून मंजूर त्यामुळे धान भरडाईच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्य शासनाकडून हंगाम 2016-17 पासून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत विकेंद्रीत खरेदी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये पूर्वी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान हे भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI)  जमा करण्यात येत होते. DCPयोजनेअंतर्गत आता थेट राज्य शासनाकडून लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये वितरित करण्यात येते. त्यामुळे धान उत्पादक जिल्हयांतील तयार होणाऱ्या तांदळाची  तात्काळ विल्हेवाट लावता येणे राज्य शासनास शक्य झाले आहे. परिणामी यापूर्वी योजना राबवितांना होणारा कालापव्यय टाळता आला आहे.
सणासुदीच्या दिवसात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई
            दिवाळी हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. या दिवसात आपल्याकडे गोडधोड खाद्यपदार्थाची रेलचेल असते. या काळात मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थांना मोठया प्रमाणात मागणी असते. ही वाढती मागणी लक्षात घेताहे पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याकडे भेसळीचे प्रमाण  वाढण्याची शक्यता असते. या भेसळयुक्त पदार्थामुळे दिवाळीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच खवामावा याची आवक बाहेरच्या राज्यातून ट्रॅव्हल्सरेल्वे यातून होताना आढळून येते म्हणून याबाबत सर्व बाबींवर बारीक लक्ष ठेवून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. बापट यांनी दिली.
         श्री. बापट पुढे म्हणाले,  राज्यात दिवाळी व इतर सणानिमित्त भेसळयुक्त बर्फीखवा/मावातेल तूप या अन्नपदार्थावर धाड टाकून हे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत 21 हजार 225 कि.ग्रॅ. सुमारे 35 लाख किंमतीचा भेसळयुक्त खवा/मावा जप्त करण्यात आला आहे. तसेच या दरम्यान 1 लाख 55 हजार 652 कि.ग्रॅ. सुमारे दीड कोटी किमतीचे भेसळयुक्त वनस्पती तूप/खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे तसेच भेसळयुक्त मिठाई  46 हजार 976 कि.ग्रॅ. याची बाजार किंमत सुमारे 37 लाख 77 हजार 95 जप्त करण्यात आली. प्रशासनाच्या पुणे कार्यालयाने अहमदाबाद-गुजरात येथून प्रवासी वाहनातून स्पेशल बर्फी हा अनियंत्रित तापमानामध्ये साठा करुन आरोग्यास घातक अशा परिस्थितीमध्ये साधारण 24 तासापेक्षा जास्त कालावधीत वाहतूक केलेला  होता. यावर कारवाई करुन एकूण 17 हजार 552 कि. ग्रॅ. असा जवळजवळ 31 लाख 82 हजार 432 रुपये एवढया किंमतीची बर्फी जप्त करण्यात आली.
          धाडीसोबत जनसामान्यांकरिता प्रबोधनाचे कार्य केले जात आहे. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून  ईट राईट इंडिया ही चळवळ नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी स्वास्थ भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये स्वास्थ मेळावे प्रभातफेरी सांस्कृतिक कार्यक्रमपोस्टर स्पर्धा इ. कार्यक्रमाचे संपूण देशात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे. स्वास्थ भारत यात्रेतून आरोग्यदायी खास्वच्छ खानिरोगी रहा हा संदेश जनतेपर्यंत पोहचवण्यात येत आहे. हा स्वास्थ भारत यात्रेचा  शुभारंभ  जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने करण्यात आला आहे.
          भेसळयुक्त पदार्थाच्या माहितीसाठी अन्न व औषध प्रशासनाने  1800222365 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला असून नागरिकांना अशा काही भेसळयुक्त पदार्थाची माहिती असल्यास या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही यावेळी श्री.बापट यांनी केले.
००००

सहकारातूनच सहकार समृद्ध करणार- सहकार मंत्री सुभाष देशमुख



मुंबई, दि. 31 : सहकारातूनच सहकार क्षेत्र अधिक समृद्ध करायचे आहे. केवळ देशातच नव्हे तर जगात महाराष्ट्राचे नाव सहकार क्षेत्रात अग्रेसर कसे होईल हे पाहायचे आहेअसे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज रंगशारदा सभागृहबांद्रा येथे केले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत सहकार पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
             यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकरराज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष डॉ.सचिन पटवर्धनआमदार जयंत पाटीलअँड.अशिष शेलारप्रवीण दरेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
             याप्रसंगी बोलताना मंत्री श्री. देशमुख म्हणालेमी मार्गदर्शन नव्हे तर सहकार क्षेत्रातील मान्यवरांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. राज्यात सहकार क्षेत्राची ताकद खूप मोठी आहे. जवळपास राज्याची अर्धी लोकसंख्या विविध माध्यमातून सहकार क्षेत्राशी निगडित आहे. त्यामुळे राज्यात सहकार क्षेत्र अधिक वाढले तर आपला महाराष्ट्र अधिक समृद्ध होऊ शकतो ही भूमिका घेऊन सहकार विभाग कार्य करत आहे. आपणास महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून 5हजार विविध सहकारी संस्थांचे बळकटीकरण करायचे आहे. त्यासाठी सर्व सहकारी संस्थांनी सहकार्य करावेअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
काम करताना चूक होते ,पण जाणीवपूर्वक वारंवार चुका करू नयेत, असे सांगून श्री. देशमुख यांनी विभागाच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला.
यात अटल पणन अभियानाचा प्रामुख्याने उल्लेख केलातसेच राज्यात सहकार रुग्णालय सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. पहिल्या टप्प्यात किमान जिल्ह्याच्या ठिकाणी हे रुग्णालय सुरू करावेज्याचा लाभ गोरगरिबांना होईलत्यांचा जीव वाचेल असेही ते म्हणाले .त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात कॉपशॉप सुरु करण्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील सहकारी सोसायट्यांच्या मालकीची मैदाने गोरगरीब शेतकऱ्यांना आठवड्यातून एक दिवस आठवडी बाजारासाठी उपलब्ध करून दिल्यास सोसायटीतील लोकांना ताजा व माफक दरात भाजीपाला व गोरगरीब शेतकऱ्यांना थेट मदत होईलअसे श्री. देशमुख म्हणाले.
सर्व  पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून, त्यांनी उत्तम सोसायट्या व उत्तम कार्य करणाऱ्या संस्थांचा विशेष उल्लेख केला.  राज्यातील उत्तम कार्य केलेल्या संस्थांना सर्वांनी भेट देऊन त्यांचे अनुकरण करावे असे आवाहन केले. सहकार क्षेत्र वाढीसाठी सर्व प्रमुख संस्थांच्या संचालकांनी व सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर किमान एक संस्था काढावी संस्थेचे संस्थापक व्हावे असेही आवाहन श्री. देशमुख यांनी यावेळी केले.
याप्रसंगी आमदार प्रवीण दरेकरजयंत पाटील, आशिष शेलारशेखर चरेगावकर ॲड.सचिन पटवर्धन यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सहकार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. चांगले कार्य करणाऱ्यांचे अभिनंदनकौतुक करावे व इतरांना त्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटीलदिलीप बनकरसाखर आयुक्त संभाजी कडू-पाटील तसेच विविध क्षेत्रातील, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विविध पुरस्कार विजेते
            सहकार महर्षी या राज्यस्तरीय पुरस्काराने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन्मानित करण्यात आले. त्यांना 1 लाख रुपये रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
            तसेच विविध गटांमध्ये सहकार भूषण व सहकार निष्ठ हे पुरस्कार देण्यात आले. त्याचे स्वरुप सहकार भूषण पुरस्कार 51 हजार रुपये रोखप्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह व सहकार निष्ठ पुरस्कार 25 हजार रुपये रोखप्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह असे आहे.
गट-1 : प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था :
        सहकार भूषण पुरस्कार-पुणे-अंकलखोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीजि.सांगली. कोकण-आसुद ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाआसुदजि. रत्नागिरी औरंगाबाद-अंधारी विकास सेवा संस्थासिल्लोडजि.औरंगाबाद.
        सहकार निष्ठ पुरस्कार- नाशिक-शेतकरी विकास सहकारी संस्थापिंपळगावजि.नाशिक.
 गट-2 : नागरी पतसंस्थाग्रामीण बिगरशेती पतसंस्था व पगारदार नोकरांच्या पतसंस्था :
        सहकार भूषण पुरस्कार -कोकण-शिवकृपा सहकारी पतपेढीमुंबई पुणे-शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थाभोसरीपुणे ;  नागपूर-सेवाश्री साई नागरी सहकारी पतसंस्थानागपूर.
            सहकार निष्ठ पुरस्कार-अमरावती-पत्रकार व नागरिक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थाशिरसगांव कसबाजि.अमरावती औरंगाबाद-औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थाऔसाजि.लातूर.
गट-3 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामहाराष्ट्र राज्य सहकारी बँका :
        सहकार भूषण पुरस्कार-औरंगाबाद-लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.लातूर.
गट-4 : नागरी सहकारी बँका :
        सहकार भूषण पुरस्कार-औरंगाबाद-वैश्य नागरी सहकारी बँक म. परभणी कोल्हापूर- दि कोल्हापूर अर्बन को-ऑप.बँक लि.कोल्हापूर कोकण-चिपळूण अर्बन को-ऑप.बँक लि.चिपळूणजि.रत्नागिरी.
            सहकार निष्ठ पुरस्कार-नाशिक-श्री स्वामी समर्थ सह.बँक मर्या.निघोजपारनेरजि.अहमदनगर.
गट-5 : सहकारी साखर कारखानेसहकारी सूतगिरणीसहकारी दूध संघ :
        सहकार भूषण पुरस्कार-साखर कारखाने-श्री. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना मर्या.भेंडा बु. नेवासाजि.अहमदनगर सूतगिरणी-चौंडेश्वरी सहकारी सुतगिरणी मर्या.इचलकरंजीहातकणंगलेजि.कोल्हापूर दूधसंघ-राजाराम बापू सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.इस्लामपूरजि.सांगली.
            सहकार निष्ठ पुरस्कार-दूधसंघ-पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.पुणे.
गट-6 : गृहनिर्माण सहकारी संस्था :
        सहकार भूषण पुरस्कार-मुंबई-श्री श्रद्धा माता को.ऑप.हौसिंग सोसायटीपवईमुंबई-76 ; मुंबई-साई शिल्प को.ऑप.हौसिंग सोसायटीमुलूंड पूर्वमुंबई.
            सहकार निष्ठ पुरस्कार-कोकण- नवमिनल को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.डोंबिवली (पूर्व)जि.ठाणे पुणे-रविराज सहकारी गृहरचना संस्था मर्या.वारजेपुणे अमरावती-डॉ.पंजाबराव देशमुख गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या.अमरावती.
गट-7 : औद्योगिक संस्थाहातमाग व यंत्रमाग संस्थाउपसा सिंचन संस्था व इतर संस्था :
        सहकार भूषण पुरस्कार-औद्योगिक संस्था-सिद्धार्थ बिडी उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्या.पिंपळगावजि.भंडारापाणीपुरवठा-कै.अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्था मर्या.व्हनाळीसाके केनवडेजि.कोल्हापूर.
            सहकार निष्ठ पुरस्कार-इतर-आर्म्ड फोर्सेस एक्स ऑफिसर्स मल्टीसर्व्हीस को.ऑ.सोसायटी लि., 364, गोखले रोडमॉडेल कॉलनीपुणे-16.
गट-8 : फळे भाजीपाला संस्थाखरेदी विक्री संघप्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था :
        सहकार भूषण पुरस्कार-खरेदी विक्री-चंदगड तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघ लि.तुर्केवाडीचंदगडजि.कोल्हापूर प्रक्रिया-सिंदेवाडी सहकारी भातगिरणी संस्था मर्या.सिंदेवाडीजि.चंद्रपूर.
            सहकार निष्ठ पुरस्कार-ग्राहक संस्था-उमरखाडी कन्झ्युमर्स को.ऑप.सोसायटी लि.डोंगरीमुंबई-09.        
            या समारंभास प्रधान सचिव पणन अनुपकुमारप्रधान सचिव वस्द्योद्योग अतुल पाटणेसहकार आयुक्त सतीश सोनीसाखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटीलवस्त्रोद्योग संचालक डॉ.माधवी खोडे-चवरेपणन संचालक दिपक टावरे उपस्थित होते.
००००

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 31 :  महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. या पुरस्कारांसाठी 5 ते 25 नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडूसाहसी उपक्रमदिव्यांग खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शक यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 5 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर अशी ठेवण्यात आली आहे.
अर्जदारांनी विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करून त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाहस उपक्रमदिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्तेउत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकमहिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी जिजामाता क्रीडा पुरस्कार तसचे ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
सन 2017-18 या वर्षासाठी मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडूसाहसी उपक्रम दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते,उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकमहिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या ठरावासह दि. 25 नोव्हेंबर 2018 पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 27 नोव्हेंबर 2018 पूर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावी. तर उर्वरित पुरस्काराच्या अर्जदारांनी 5 डिसेंबर 2018 पूर्वी सादर करावी.
याबाबत अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 16 ऑक्टोबर 2017शासन शुध्दीपत्रक 8 डिसेंबर 2017 आणि शासन शुध्दीपत्रक 24 ऑक्टोबर 2018  चे अवलोकन करावे.
अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी यांना संपर्क साधावा.
००००

बेघरांना मिळणार परवडणाऱ्या किंमतीत घरे

मंत्री पंकजा मुंडे यांची अमेरीकेतील नामवंत संस्थेसमवेत चर्चा
मुंबई, दि. 31 : बचतगटांच्या महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या समुहाने आज जागतिक दर्जाच्या वेगा बिल्डींग सिस्टीमसह अमेरिकेतील विविध नामवंत संस्थांना भेटी दिल्या. महाराष्ट्रातील ग्रामविकासाची चळवळ कशी बळकट करता येईल याबाबत विविध मान्यवरांशी चर्चा आणि आदान प्रदान केले.  
"सर्वांसाठी घरे" हे उद्द‍िष्ट साध्य करण्यासाठी तसेच राज्यातील बेघरांना परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे जागतिक दर्जाच्या वेगा बिल्डींग सिस्टीमच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली. यावेळी या कंपनीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून परवडणाऱ्या किंमतीत घरे बांधण्याबाबत चर्चा झाली.
येत्या दोन महिन्यात भारतात येऊन तंत्रज्ञान देवाण - घेवाणीबाबत काम करण्याचे वेगा बिल्डींग सिस्टीमच्या प्रतिनिधींनी मान्य केले. यावेळी वेगा बिल्डींग सिस्टिम कंपनीचे चेअरमन डेव्हिड कोहेन, मुख्य कार्यकारी अधिकारी केन होलेन, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला, फिक्कीचे प्रतिनिधी रुबाब सूद आदी उपस्थित होते.
स्टॅनफर्ड विद्यापीठाला भेट
समुहाने आज अमेरिकेतील नामवंत अशा स्टॅनफर्ड विद्यापीठालाही भेट दिली. राज्यातील गावे आदर्श करण्यासाठी योगदान देण्याबाबत यावेळी डॉ. कलवजीत सिंग आनंद आणि संमिना कॉर्पोरेशनचे डॉ. सुंदर कामत यांच्यासमवेत चर्चा झाली. डॉ. सनी आनंद आणि डॉ. कामत यांनी यावेळी आदर्श गाव निर्माणबद्दल कामाची माहिती सादर केली. अंजनी कोचर यांच्याबरोबर राज्यातील महिला बचतगटांच्या प्रगतीचा अभ्यास करून महाराष्ट्र  शासनाला अहवाल सादर करण्याबाबत चर्चा झाली.
साई ग्लोबल मिशनमार्फत उर्जा, शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि सामाजिक उद्योजकता यांचा समावेश असणारे आणि त्यासाठी योग्य तंत्रज्ञान आणि सहयोगी व्यासपीठांच्या माध्यमातून त्यांची टीम  ग्रामीण समुदायांचा विकास करत आहे. त्यांच्या अनुभवांचा आणि तंत्रज्ञानाचा राज्याला खूप उपयोग होईल. त्यांच्या प्रतिनिधींना  नोव्हेबर-डिसेंबर मध्ये राज्यात येण्याचे निमंत्रण देण्यात आले.
उमेद अभियानाच्या डिल्लन कोहेन, नाव्या कोंडा आणि वीर शहा या तीन युवकांना येथे अभ्यासासाठी पाठविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यानी देखील चर्चेत सहभाग घेतला.
                                                                      ००००

विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार - विनोद तावडे


पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

मुंबई, दि. 31 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 नुसार महाविद्यालय आणि विद्यापीठ निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. लिंगडोह समितीच्या शिफारशी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार महाविद्यालयीन आणि विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पुढील शैक्षणिक वर्षात 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

आज मंत्रालयात विद्यार्थी निवडणूका संदर्भातील पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तेव्हा श्री. तावडे यांनी महाविद्यालयीन आणि विद्यापीठ निवडणुकासंदर्भातील माहिती दिली.
श्री. तावडे यांनी सांगितलेविद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रम 31 जुलै पूर्वी घोषित करण्यात येईल आणि शैक्षणिक वर्षाच्या 30 सप्टेंबर पूर्वी विद्यापीठ विद्यार्थी परिषद गठित करण्यात येईल. विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेसाठीची व महाविद्यालय विद्यार्थी परिषदेसाठीची निवडणूक सरळ बहुमताच्या तत्वानुसार घेण्यात येईल. संबंधित विद्यापीठामध्ये विद्यापीठ विभाग तसेच सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेसाठीची निवडणूक एकाच दिवशी घेण्यात येईल. महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसरामध्ये अध्यक्षसचिवमहिला प्रतिनिधी आणि आरक्षित संवर्ग प्रतिनिधींची निवड विद्यार्थी थेट मतदानाद्वारे करतील. तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड चार महाविद्यालय प्रतिनिधी करतील. ही प्रक्रिया दरवर्षी कालबध्द पध्दतीने व कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप टाळून राबविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद आणि महाविद्यालय विद्यार्थी परिषद यांच्या निवडणूकीच्या बाबतीत मतमोजणी आणि निकालाची घोषणा मतदानाच्या दिवशीच करण्यात येईल.
निवडणू‍क लढविण्याकरिता विद्यार्थ्यांने महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या पूर्ण वेळ मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्षात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांने मागील कोणताही विषय शिल्लक न ठेवता किंवा सत्र पुढे चालू ठेवण्याची मुभा न घेता अगोदरच्या वर्षाचे सर्व विषय उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. विद्यार्थी एकाच वर्गात पुन:प्रवेश घेतलेला नसावा तसेच निवडणुका लढविण्यासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादाही त्या शैक्षणिक वर्षाच्या 30 सप्टेंबर रोजी त्याच्या वयाची 25 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले.
००००

शिधापत्रिकेशिवायही मिळेल लोह व आयोडीन युक्त मीठ - अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट


              मुंबईदि. 31 : नागरिकांना शिधापत्रिकेवर आता धान्याबरोबरच रास्तभाव दुकानातून लोह आणि आयोडिनयुक्त’(डबल फोर्टीफाईड) शुद्ध मीठाचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर राज्यातील सामान्य नागरिकांना सुद्धा शिधापत्रिकेशिवाय शिधावाटप दुकानातून हे मीठ मिळणार आहेअशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी मुंबई येथे दिली.
आज गिरगाव येथील चित्पावन ब्राह्मण संघ सभागृह येथे नागरिकांना आयोडिनयुक्त मीठाचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विभागाचे प्रधान सचिव महेश पाठकनियंत्रक शिधावाटप दिलीप शिंदेतसेच या या भागातील नगरसेविका डॉ. अनुराधा पोतदारमाजी नगरसेवक संपत ठाकूर हे उपस्थित होते.
श्री. बापट म्हणालेमीठ हे सकस अन्नघटक असून आरोग्यासाठी आयोडीनयुक्त मीठ आवश्यक असते. भारतातील आरोग्य सर्व्हेनुसार 6 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांना आयोडिनच्या कमतरतेमुळे विविध आरोग्यविषयक समस्यांना  सामोरे जावे लागते. त्यामुळेच लोह व आयोडिनयुक्त शुद्ध मीठ प्रतिकिलो 14 रुपये दराने उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
नागरिकांना आयोडीन व लोहाच्या कमतरतेमुळे ॲनेमियाइतर अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. यामध्ये मुख्यत्वे महिला व लहान बालके यांचा समावेश असतो. आहारातील लोह व आयोडिनची कमतरता दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभाग व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात डबल फोर्टिफाईड शुद्ध मीठाचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही श्री. बापट यांनी यावेळी सांगितले.
        राज्यात जुलै महिन्यात नागपूर येथून आयोडिनयुक्त मीठ वाटप सुरुवात झाली असून राज्यात आतापर्यंत 3 लाख कुटुंबांनी या आयोडिनयुक्त मीठाची मागणी केली आहे. डबल फोर्टिफाइड मीठ बाजारात 24 ते 25 रु. प्रतिकिलो या दराने विकले जाते परंतु शिधावाटप दुकानामध्ये हे 14 रु. किलो दराने मिळणार आहे यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 2022 सालापर्यंत ॲनिमिया मुक्त भारत हे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
००००

वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ शपथ




मुंबई, दि. 31 : भारताचे पहिले उप प्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंत्रालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्व. पटेल आणि स्व. गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवस’ निमित्त शपथ दिली.
या कार्यक्रमास आमदार प्रतापराव चिखलीकरसामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपिन मल्लिकपशुसंवर्धनदुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार,सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव छाया वडते यांच्यासह मंत्रालयातील अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.
0000