Thursday 26 October 2023

महाराष्ट्र धनुर्विद्या खेळाची भूमी बनवू या : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खेळाडूंना ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी ओजस देवतळे, तुषार शेवाळे, आदिती स्वामी या तिरंदाजांची घेतली भेट

नागपूर दि. २6
: महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात सातत्य दाखविले असून याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. महाराष्ट्रात या क्रीडा प्रकारासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्याचा शासन कटीबद्ध आहे. राज्याला धनुर्विद्या खेळाची भूमी बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. आशिया क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदक जिंकणाऱ्या ओजस देवतळे या नागपूरकर तिरंदाजाच्या घरी जाऊन त्याचे कौतुक करणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आई-वडिलांशी बोलताना स्पष्ट केले होते. आज आपल्या व्यस्त कार्यक्रमात त्यांनी ओजसच्या घरी जाऊन त्याच्याशी हितगूज साधले. यावेळी आशियाड स्पर्धेत ओजस सोबत सुवर्णपदक पटकवणारा अमरावतीचा तुषार शेवाळे, साताऱ्याची आदिती स्वामी हे धनुर्विद्यापटू उपस्थित होते.याशिवाय ओजसचे क्रीडा मार्गदर्शक प्रवीण सावंतही उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तीनही धनुर्विद्यापटूंना त्यांच्या आशियाळ स्पर्धेतील अनुभवाविषयी विचारले. याशिवाय राज्य शासनाकडून खेळाडूंची काय अपेक्षा आहे हे देखील जाणून घेतले. ओजसने नागपूरमध्ये आणखी सुविधा निर्माण करण्याची मागणी केली. तर आदिती व तुषार शेवाळे यांनीही प्रत्येक शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. खेळाडूंच्या या अपेक्षेवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरांमध्ये मानकापूर विभागीय क्रीडा संकुल तसेच जिल्हा क्रीडा संकुल (कामठी ) नागपूर येथे दोन्ही ठिकाणी धनुर्विद्या या क्रीडा प्रकारासाठी जागतिक दर्जाच्या सोयी सवलती उपलब्ध होतील. त्या पद्धतीची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले. राज्याच्या अन्य भागातही धनुर्विद्यापटू तयार व्हावेत. यासाठी चांगल्या सुविधा दिल्या जातील. यापूर्वीही अनेक खेळाडूंनी धनुर्विद्या या प्रकारामध्ये चांगले यश दाखविले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धनुर्विद्यापटूंसाठी चांगल्या सुविधांची उपलब्धता करणे राज्य शासनाची प्राथमिकता आहे. महाराष्ट्राला धनुर्विद्या क्रीडा प्रकारामध्ये अग्रेसर करण्याकडे आमचा कल आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेमध्ये दहापट वाढ केल्याबद्दल या तीनही खेळाडूंनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. उपमुख्यमंत्र्यांनी रक्कम वाढविण्याचे श्रेय खेळाडूंना दिले. ते म्हणाले, खरे म्हणजे तुमच्या पराक्रमाने आमचा हुरुप वाढतो. तुम्ही मेडल मिळवत राहावे, आम्ही सुविधा उपलब्ध करू. महाराष्ट्राचे नाव आपण मोठे करावे, देशाचे नाव आपण मोठे करावे. उपमुख्यमंत्र्यांनी या भेटी दरम्यान पुन्हा एकदा त्यांनी ओजसच्या आई-वडिलांचे कौतुक केले. ओजसने नागपूरचे व महाराष्ट्राचे नाव मोठे केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. ओजसच्या परिवारातील अनेक सदस्यासह जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 0000000
नागपूर, दि. 26 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भेट दिली. यावेळी त्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती आणि प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे येणाऱ्या सर्व अनुयायांचे स्वागत करीत उपमुख्यमंत्री महोदयांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे कामठी हे शहर जगाच्या नकाशावर आले असल्याचे यावेळी ते म्हणाले. आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. टेकचंद सावरकर, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखा कुंभारे यांच्यासह मोठ्या संख्येने अनुयायी यावेळी उपस्थित होते. 000000

‘अमृत कलश’ मुंबई मार्गे दिल्ली साठी रवाना* *विभागीय आयुक्त याच्या उपस्थितीत कलश रवाना*

नागपूर दि. २५ : 'मेरी माटी, मेरा देश' अभियानासाठी नागपुर विभागातील 71 अमृत कलश मुंबई मार्गे दिल्ली साठी आज दुरांतो एक्सप्रेस रवाना झाले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर अमृत कलश वहन करून नेणाऱ्या स्वयंसेवकांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील 142 स्वयंसेवकांसोबत सर्व अमृत कलश रेल्वेमार्गे मुंबईकडे रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, विभागीय रेल्वे प्रबंधक तुषारकांत पाण्डेय, रेल्वे स्थानक व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, विकास शाखेचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, महानगरपालिका उपायुक्त सुनील लहाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील कलोडे, विभागीय समन्वयक छत्रपाल पटले यांचेसह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी अमृत कलश रवाना करण्यासाठी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. ‘भारत माता की जय’, वंदे मातरम् आणि ‘मिट्टी को नमन, विरों को वंदन’ या घोषणांनी रेल्वे स्थानक परिसर देशभक्तीमय झाला होता. मुंबईच्या आजाद मैदानावर राज्यातील सर्व अमृत कलशांचे 27 ऑक्टोबर रोजी पूजन करण्यात येवून ते दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहेत. दिल्ली येथे 31 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ होणार आहे 'मेरी माटी, मेरा देश' अभियानामध्ये 'अमृत कलशच्या माध्यमातून विभागात एकत्र केलेली माती देशासाठी बलिदान देणाऱ्या विरांच्या सन्मानार्थ दिल्ली येथील कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या ‘अमृत वाटिकेत’ अर्पण केली जाणार आहे. यासाठी विभागातील सर्व तालुक्यातून 63, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचे प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे सहा आणि नागपूर व चंद्रपूर महानगरपालीकेचे एक-एक असे 71 अमृत कलश 142 स्वयंसेवकांमार्फत रवाना करण्यात आले. अमृत यात्रेसाठी विभागातील 16 लाख 58 हजार कुटूंबाकडून अमृत कलशात माती संकलीत करण्यात आली. यात नागपूर महानगरपालीकेतील 10 लाख 1351 कुटूंब, चंद्रपूर महानगरपालीका 35 हजार 243 कुटूंब, विभागातील 77 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील 3 लाख 66 हजार 108 कुटूंब व 63 तालुक्यातील 16 लाख 58 हजार कुटूंबांनी सहभाग नोंदविला. 000000000

अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा - विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर, दि. 26 : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 अंतर्गत सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.छेरिंग दोरजे, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशनी तेलगेाटे, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजय माहुरकर, दुरदृश्य प्रणालीव्दारे नागपूर विभागातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सहायक आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, शासकीय अभियोक्ता यांची उपस्थिती होती. विभागीय आयुक्त बिदरी यांनी मागील प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला, यामध्ये बलात्कार, विनयभंग, मारहाण तसेच गंभीर दुखापत यासारख्या प्रकरणांचा तपास तात्काळ पूर्ण करून चार्टशिट सादर करावी तसेच न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांची माहिती घेवून प्रकरणे तातडीने निकाली काढावी असे निर्देश यावेळी दिलेत. अनुसूचित जाती जमाती अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कमी होण्यासाठी समाजकल्याण विभागाने जनजागृती करावी याकरिता जिल्हा व तालुका स्तरावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या प्रशिक्षणांमध्ये कायद्याविषयी माहितीचा समावेश असावा. अॅट्रॉसिटी कार्यशाळेचे आयोजन करुन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. अत्याचारग्रस्ताना व इतर लाभार्थ्यांना अंत्योदय योजना, संजय गांधी निराधार योजनांचा लाभ देण्यात यावा असे यावेळी सांगण्यात आले. 00000

Wednesday 25 October 2023

लक्षावधीअनुयायांच्यासाक्षीनेदीक्षाभूमीवर 200 कोटींच्याई-भूमिपूजनाचाकार्यक्रमसंपन्न जागतिकदर्जाचेश्रद्धास्थानविकसितकरणारमुख्यमंत्री,उपमुख्यमंत्रीवकेंद्रीयमंत्र्यांचीग्वाही

नागपूरदि. २४ : नागपूरच्यादीक्षाभूमीवर६७व्याधम्मचक्रप्रवर्तनदिनालामहामानवडॉ. बाबासाहेबआंबेडकरयांनाअभिवादनकरण्यासाठीजमलेल्याअलोटजनसागराच्यासाक्षीनेराज्यशासनाने 200 कोटीरुपयांच्याविकासकामांचाशुभारंभकेला. राज्याचेमुख्यमंत्रीएकनाथशिंदेयांनीऑनलाईनसंदेशदेऊनतरकेंद्रीयरस्तेवाहतूकवमहामार्गमंत्रीनितीनगडकरी, राज्याचेउपमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांनीप्रत्यक्षउपस्थितराहूनयाशुभकार्याचीआजमुहूर्तमेढरोवली. नागपूरयेथे६७व्याधम्मचक्रप्रवर्तनदिनाच्यापर्वावरहीघोषणाकरण्यातआली. यासाठीनागपूरमहानगरप्रदेशविकासप्राधिकरणालाअधिकृतएजन्सीम्हणूनमान्यतादेण्यातआलीआहे. दीक्षाभूमीच्या 22.80 एकरपरिसराचाविकासजागतिकदर्जाचाकरण्यातयेणारआहे.आजकेंद्रीयमंत्रीनितीनगडकरीवराज्याचेउपमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांच्याउपस्थितीतइलेक्ट्रॉनिक्सकळदाबतयाविकासकार्याचाशुभारंभकरण्यातआला. यावेळीराज्यशासनातर्फे७०कोटीरुपयांच्याधनदेशाचेवितरणहीकरण्यातआले. यावेळीमंचावरकार्यक्रमाचेअध्यक्षभदंतआर्यनागार्जुनसुरेईससाई, प्रमुखपाहुणेडॉ.आफिनिताचाईचाना, केंद्रीयरस्तेवाहतूकवमहामार्गमंत्रीनितीनगडकरी, राज्याचेउपमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस, खा. कृपालतुमाने, पोलीसआयुक्तअमीतेशकुमार, नागपूरचेजिल्हाधिकारीडॉ.विपीनइटनकर,महानगरपालिकाआयुक्तडॉ.अभिजितचौधरी, नागपूरसुधारप्रन्यासचेसभापतीमनोजकुमारसूर्यवंशी, परमपूज्यडॉ. बाबासाहेबआंबेडकरस्मारकसमितीदीक्षाभूमीचेसदस्यडॉ.कमलाताईरा.गवई, अॅड. मा.मा. येवले, डॉ. सुधीरफुलझेले, अॅडआनंदफुलझेले, एन.आर. सुटे, डॉ.राजेंद्रगवई, डी.जी.दाभाडे, विलासगजघाटे, डॉ. प्रदीपआगलावे, डॉ. चंद्रशेखरमेश्राम,भन्तेनागदीपांकर,प्रादेशिकउपाआयुक्तसिद्धार्थगायकवाड, समाजकल्याणउपायुक्तसुकेशिनीतेलगोटेयांचीउपस्थितीहोती. दीक्षाभूमीच्याविकासकामाचेईं-भूमीपूजनकेंद्रीयरस्तेवाहतूकवमहामार्गमंत्रीनितीनगडकरी, उपमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांच्याहस्तेकरण्यातआले. यावेळीमुख्यमंत्रीएकनाथशिंदेयांचासंदेशप्रक्षेपितकरण्यातआला. 200 कोटींचेविकासकार्यदीक्षाभूमीवरलवकरचपूर्णहोईल. दीक्षाभूमीवचैत्यभूमीवरीलविकासकार्यासाठीराज्यशासनकटीबद्धअसूनसर्वकामेजागतिकमानांकनाचीवगतीनेकरण्यातयेईल, असेमुख्यमंत्र्यांनीआपल्याव्हीडीओशुभेच्छासंदेशातस्पष्टकेले. नागपूरमहानगरप्रदेशविकासप्राधिकरणामार्फतदीक्षाभूमीवरजागतिकदर्जाच्यास्तरावरीलकामेहोतील. यामध्येयासंपूर्ण 22.80 एकरपरिसराचाकायापालटकेलाजाईल, आज७०कोटींचाधनादेशदिलाजातअसल्याचेमुख्यमंत्र्यांनीस्पष्टकेले. उपमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांनीयावेळीसंबोधितकरताना, नागपूरहेशहरदेशाच्याअतूटश्रध्देचेकेंद्रआहे. त्यामुळेकोणत्याहीनिमंत्रणाशिवाय, कोणीहीबोलवल्याशिवाययाठिकाणीलाखोचाजनसमुदायबाबासाहेबांच्याश्रध्देपोटीएकत्रयेतो. त्यामुळेयाठिकाणीजेकाहीनिर्माणहोईल, जेकाहीबनेलतेभव्यअसेल. तेजागतिकदर्जाचेअसेल.जगातीलबौद्धधर्माचेविचारकज्यावेळीयाठिकाणीमहामानवापुढेनतमस्तकव्हायलायेईलत्यावेळीत्यांनायाठिकाणाच्यासोयीसुविधाजागतिकदर्जाच्यामिळतील.दीक्षाभूमीचाविकासहामाझ्यासाठीभावनिकविषयआहे. दीक्षाभूमीमाझ्यामतदारसंघातआहे. त्यामुळे२००कोटींचाहाविकासजागतिकदर्जाचाहोईल, असेस्पष्टकेले. यावेळीत्यांनीदीक्षाभूमीच्याविकासाचेहेदुसरेपर्वअसल्याचेघोषितकेले. यापूर्वीमुख्यमंत्रीअसतानादीक्षाभूमीच्याविकासाचेझपाट्यानेकामसुरूझालेहोते. मात्रमधल्याकाळातत्यालाअडथळाआला.आताहाअडथळादूरझालाअसूनलवकरचकामेपूर्णत्वासजाईलअसेत्यांनीसांगितले. हेराज्यबाबासाहेबांच्यावैचारिकवारश्यालापुढेनेणारेअसूनलंडनमधीलबाबासाहेबांच्याघराचेस्मारकातरूपांतरअसो, जापानमधीलविद्यापीठाच्यापुतळ्यांचेअनावरणअसो, कीइंदूमिलच्याविकासाचेकार्यअसो. बाबासाहेबांच्याविचाराप्रमाणेसर्वनिर्मितीभव्य -दिव्यअसेलवपुढीलवर्षाअखेरपर्यंतइंदुमिलयेथीलबाबासाहेबांचेजागतिकदर्जाचेस्मारकपूर्णहोईल, अशीअपेक्षात्यांनीयावेळीव्यक्तकेली. केंद्रीयरस्तेवाहतूकवमहामार्गमंत्रीनितीनगडकरीयांनीयावेळीदीक्षाभूमीवरजमलेल्याअथांगभीमसागरालाअभिवादनकरतानादेशाच्याकानाकोपऱ्यातूनआलेल्याअनुयायांचेनागपुरातस्वागतअसल्याचेसांगितले. देशपातळीवरबुद्धिस्टसर्किटपूर्णकेल्याचाआपल्यालाआनंदअसल्याबद्दल, आणियाकार्यालादेशभरातूनदिल्यागेलेल्याकौतुकाच्यापावतीबद्दलकृतज्ञताव्यक्तकेली. कार्यक्रमाच्यामुख्यअतिथीथायलंडयेथीलडॉ. अफिनिताचाईचानायांनीयावेळीसंबोधितकेले. महामानवडॉ. बाबासाहेबआंबेडकरयांचेमानवकल्याणाच्याउत्थानार्थकेलेलेकार्यकेवळभारतासाठीनाहीतरथायलंडसारख्यादेशातहीपूजनीयआहे. आपलेविरोधककितीमोजण्यापेक्षाआपल्याविचारांचीमाणसेवाढविण्याचामोलाचासल्लात्यांनीदिलाआहे. आजच्यापरिस्थितीतगौतमबुद्धांचेविचारजगाच्यापरिप्रेक्शामध्येउपयुक्तठरतात. कार्यक्रमाचीप्रस्तावनादीक्षाभूमीस्मारकसमितीचेराजेंद्रगवई , सूत्रसंचालनविलासगजघाटेतरआभारप्रदर्शनअॅड. आनंदफुलझलेयांनीकेले.

Thursday 19 October 2023

‘मेरीमाटीमेरादेश’ अभियानातविभागातून 71 अमृतकलशांचासमावेश - विजयलक्ष्मीबिदरी

Ø दिल्ली येथे 31 ऑक्टोबर रोजी मुख्य समारोह Ø विभागातून 142 स्वयंसेवकांचा समावेश नागपूर दि. 19 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'मेरी माटी, मेरा देश' अभियानात विभागातून 71 अमृत कलश 142 स्वयंसेवकांसोबत पाठविण्यात येणार आहेत. तत्पुर्वी मुंबईच्या आजाद मैदान येथे राज्यातील सर्व अमृत कलशांचे पूजन होइल व त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होतील. अमृत कलश सन्मानपूर्वक पाठविण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे दिल्या. 'मेरी माटी, मेरा देश' अभियानासंदर्भात विभागीय आयुक्तांनी आज आढावा घेतला. उपायुक्त कमलकिशोर फुटाणे व प्रदीप कुळकर्णी, नगरप्रशासनचे मनोजकुमार शाह, अपर जिल्हाधिकारी आशा पठाण उपस्थित होते. तसेच विभागीतील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दृकश्राव्य पद्धतीने उपस्थित होते. 'मेरी माटी, मेरा देश' अभियानामध्ये 'अमृत कलशच्या माध्यमातून विभागात एकत्र केलेली माती दिल्ली येथील कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या अमृत महोत्सव स्मारकातल्या ‘अमृत वाटिकेत’ अर्पण केली जाईल. यासाठी विभागातील तालुक्यातून 63, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचे प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे सहा व नागपूर व चंद्रपूर महानगरपालीकेचे एक-एक असे 71 अमृत कलश 142 स्वयंसेवकांमार्फत रवाना करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व अमृत कलश 27 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे पाठविण्यात येतील. दिल्ली येथे 31 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ होणार आहे. प्रत्येक नागरिकाचा सहभाग अमृत यात्रेसाठी 16 लाख 58 हजार कुटूंबाकडून अमृत कलशात माती संकलीत करण्यात आली. यात नागपूर महानगरपालीकेतील 10 लाख 1351 कुटूंब, चंद्रपूर महानगरपालीका 35 हजार 243 कुटूंब, विभागातील 77 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील 3 लाख 66 हजार 108 कुटूंब व 63 तालुक्यातील 16 लाख 58 हजार कुटूंबांनी सहभाग नोंदविला. अमृत कलश अभियानासाठी उपस्थित राहणाऱ्या स्वयंसेवकांच्या प्रवास व निवास व्यवस्थेचाही श्रीमती बिदरी यांनी आढावा घेतला. 000

Wednesday 18 October 2023

अंबाझरी येथे राज्य शासनच उभारणार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन’ - उपमुख्यमंत्री फडणवीस

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कृतीसमितीचे आंदोलन स्थगित
नागपूर,दि.18 : अंबाझरी येथे राज्य शासनाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्यात येईल, तसेच या जागेवरील खाजगी प्रकल्पाच्या कामास स्थगितीच्या निर्णयावर कायम असल्याची घोषणा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृती समितीच्या आंदोलनाला श्री. फडणवीस यांनी भेट दिली. तसेच, कृति समितीच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी कृति समितीच्या प्रमुख सरोज आगलावे, डॉ. सरोज डांगे, सुगंधा खांडेकर, ज्योती आवळे, पुष्पा बौद्ध, सुषमा कळमकर, तक्षशिला वाघदरे, उषा बौद्ध, माजी प्रशासकीय अधिकारी किशोर गजभिये आदी सदस्य यांच्यासह आमदार विकास ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते. अंबाझरी येथील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन शासनाच्यावतीने बांधण्यात येणार असून या जागेवरील खाजगी प्रकल्प रद्द करण्यात येणार आहे. हा प्रकल्प रद्द करण्यात कोणती त्रुटी राहून नये यासाठी राज्याचे महाधिवक्ता यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली. या प्रकल्पाला राज्य शासनाने याआधीच स्थगिती दिली आहे. या संदर्भात लेखी आदेश जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कृति समितीला देण्यात येईल, कृती समितीतर्फे २७२ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती करण्यासाठी आपल्यामध्ये आलो असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कृति समितीने आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे यावेळी जाहीर केले. अंबाझरी येथील उद्यानात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल व लवकरच हे उद्यान जनतेसाठी खुले करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. सरोज आगलावे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कृति समितीतर्फे सुरु असलेल्या आंदोलना संदर्भात माहिती दिली. तसेच, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल आभार मानले. आमदार विकास ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. 00000

विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मोबाईल ॲपच्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यासक्रम - विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर, दि. 17 : ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्यभूत ठरणारा ‘आकांशा’ या ‘शिक्षण आपल्या दारी’ प्रकल्पांतर्गत विभागातील सर्व शासकीय शाळांमध्ये अँड्रॉईड मोबाईल ॲपच्या माध्यमातून 10 वीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषय सुलभपणे मोफत शिकता येणार आहे. हा प्रकल्प 50 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी रोटरी क्लबची मदत होणार असल्याची माहिती, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे दिली. विभागातील जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपरिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता ९वी व १०वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘आकांशा’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी प्रशासनाला रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन संपूर्ण शैक्षणिक ॲप मोफत उपलब्ध करून देणार आहे. रोटरीचे प्रकल्प प्रमुख विरेंद्र पात्रिकर, अध्यक्ष अभिजित देशपांडे व प्रकल्प सल्लागार मोहन पांडे यांनी विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांना या प्रकल्पासंदर्भात संमतीपत्र आज दिले. ‘आकांशा’ प्रकल्प विभागातील इयत्ता १०वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या व इयत्ता ९वी मध्ये प्रवेश घेत असलेल्या मराठी, सेमी इंग्लीश आणि इंग्लीश माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.प्रारंभी जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपरिषदेच्या शांळातील विद्यार्थ्यांची मुख्याध्यापकांमार्फत नोंदणी करून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा निहाय नोंदणी करण्यात येईल व या नोंदणी नुसार मुख्याध्यापकांमार्फत लॉगईन सुविधा देण्यात येईल. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विकास उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे, नगर प्रशासनाच्या सहायक आयुक्त संघमित्रा ढोके यांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पास राज्यशासनाच्या बालभारती पाठयक्रम मंडळाची मान्यता घेण्यात आली आहे. शिकवणीवर होणार खर्च टाळून विद्यार्थ्यांना सहाय्यभूत शिक्षण मोफत उपलब्ध करून देणे आणि इयत्ता १०वीचे शिक्षण सुलभ व आनंददायी व्हावे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. नगर पालिका,महानगर पालिका तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांतील नोंदणी झाल्यानंतर ईतर खाजगी शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना या अँड्रॉईड मोबाईल ॲपचा लाभ देण्यात येईल. रोटरी क्लबतर्फे इयत्ता १०वीच्या ५० हजार विद्यार्थ्यांपर्यंत अँड्रॉईड मोबाईल ॲप पोहोचविण्याची जबाबदारी राहणार आहे. रोटरीचे जिल्हा प्रकल्प सचिव विरेंद्र पात्रिकर व प्रकल्प सल्लागार मोहन पांडे यांनी या प्रकल्पासंबंधीचे सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. विभागातील सर्व शासकीय शाळांमधून हा प्रकल्प प्राधान्याने राबविण्याची त्यांनी विभागीय आयुक्तांना विनंती केली. ०००००

‘गडकरी’ चित्रपटामुळे नव्या पिढीसमोर गडकरींचे वैविध्यपूर्ण व्यक्तीमत्व उलगडेल - उपमुख्यमंत्री फडणवीस  गडकरींवरील बायोपीकच्या टिझरचे प्रकाशन

नागपूर, दि. 17 : नितीन गडकरी यांच्या बहुविध क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांना देशाने स्विकारले आहे. गडकरी हे इन्होवेटर असून संपूर्ण जगात पायाभूत सुविधासह रस्ते विकासाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना रोडकरी म्हणूनही ओळखले जाते. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा या क्षेत्रात राबविलेल्या अनेक अभिनव कल्पनांमुळे त्यांना संपूर्ण देशाने स्विकारले आहे. ‘गडकरी’ या चित्रपटामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक कंगोरे नवीन पिढीपर्यंत पोहचतील तसेच त्यांच्या कार्यामुळे प्रेरणा मिळेल. असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या बायोपिकच्या टिझरचे प्रकाशन श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी माजी खासदार दत्ता मेघे, आमदार कृष्णा खोपडे, प्रविण दटके, विकास कुंभारे, भारतीय क्रिकेट संघातील आघाडिचा गोलंदाज उमेश यादव तसेच चित्रपटाचे निर्माते अभिजीत मुजुमदार उपस्थित होते. नितीन गडकरी यांच्यावरील बायोपीकचे प्रकाशन प्रसंगी मुख्य भूमिकेत असलेले राहुल चोप्रा व चित्रपटातील सहकलाकार आदींची उपस्थिती लक्षवेधक ठरली. प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिपप्रज्वलीत करुन टिझरचे प्रकाशन केले. हा चित्रपट दिनांक 27 ऑक्टोंबर पासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शीत होणार आहे. गडकरी यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे तीन तासात दाखविण्याचे कठीण काम या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी लिलया पार पाडले आहे. चित्रपट प्रदर्शीत झाल्यानंतर त्यांच्या कार्याच्या आढावा घेणारा गडकरी-2 हा चित्रपट सुद्धा प्रदर्शीत करण्याची जबाबदारी दिग्दर्शकावर राहणार आहे असे मत श्री. फडणवीस यांनी व्यक्त केले. गडकरींमधील कामाचा झपाटा आणि ते पूर्ण करण्यासाठी असलेली क्षमता प्रत्येकाने आत्मसाद करावी असे सांगतांना श्री. फडणवीस म्हणाले की, गडकरी हे प्रसिद्ध अभिनेता राज कपूर सारखे आहेत. ते छोटे स्वप्न कधी पाहत नाहीत आणि हाती घेतलेले प्रत्येक काम देहभान हरपून पूर्ण करतात आणि त्याशिवाय थांबत नाहीत. मुंबई-पुणे एक्प्रेस हायवे पूर्ण करण्याचे त्यांचे कार्य जगा समोर आदर्श म्हणून बघितले जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती होत असतांनाच पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा रोड मॅप तयार करण्याची जबाबदारी श्री. गडकरी यांच्यावर सोपविल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. प्रसिद्ध क्रिकेटपटू उमेश यादव यांनी जगात फिरतांना रस्त्याचे महत्व लक्षात येते याच पद्धतीने देशातील रस्ते तयार करण्याचे काम श्री. गडकरी यांनी केले आहे. नागपुरातील विकासा संदर्भात बोलतांना ते म्हणाले की, मेट्रो रेल्वेचा डबल डेक्कर पूल हा बांधकाम क्षेत्रातील महिलाचा दगड ठरला असून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी या कामाचे विशेष कौतुक केल्याचे उमेश यादव यांनी अधोरेखित केले. यावेळी आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे यांनी श्री गडकरी यांच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलू आपल्या भाषणातून उलगडले. गडकरी या चित्रपटाचे निर्माते अभिजीत मुजुमदार निर्मिती प्रमुख अक्षय देशमुख तसेच अनुराग भुसारी, मिहीर फाटे, अक्षय पाटील यांनी स्वागत केले. 00000

“महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशनद्वारे” राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल - उपमुख्यमंत्री फडणवीस

नागपूर, दि. 16 : भांडवलासोबतच कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, उद्योजक अशी साखळी निर्माण करुन जागतिक संधी प्राप्त करण्यास महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन सहाय्यभूत ठरेल आणि राज्य विकासाच्या मार्गाने वेगाने पुढे जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. राज्यात रोजगार निर्मिती व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व ग्लोबल अलायन्स फॉर इंटरप्रोन्यूरशिप (गेम) द्वारे श्री. फडणवीस यांच्या हस्ते “महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन”च्या पहिल्या टप्प्याचे आज दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहातून कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, गेमचे सह-अध्यक्ष आणि संस्थापक रवी व्यंकटेश, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह नागपूर, ठाणे, अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर आणि जळगावचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुक्ष्म-लघु-मध्यम उद्योगामध्ये अधिक भांडवल व कौशल्य आणले आहे. यालाच पूरक व्यवस्था महाराष्ट्रात तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन सुरु करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात हा कार्यक्रम नागपूरसह, ठाणे, अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर आणि जळगाव या 6 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. 2024 अखेरिस राज्यातील 50 टक्के जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्येही हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. उद्योगाचे ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशनच्या माध्यमातून उद्योजक घडतील, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्मिती होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. राज्याचे तसेच देशाचे सुक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्र बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंगलप्रभात लोढा म्हणाले, राज्याच्या जलद आणि शाश्वत विकासासाठी"महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन" हे महत्वाची भूमिका बजावेल. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये "महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन" (एमएसईएम) लागू करण्यासाठी ग्लोबल अलायन्स फॉर आंत्रप्रेन्योरशिप [गेम] सोबत आज झालेल्या सामंजस्य कराराबद्दल आम्ही गेमचे आभार मानतो. वाढती विजेची मागणी लक्षात घेता आणि विजेचा तुटवडा कमी करण्यासाठी सौर ऊर्जेसारखे उपक्रम गेम च्या माध्यमातून गावागावात राबवू आणि सोलर हॅण्डपंप बसविण्यास यामुळे मदत होईल असेही ते म्हणाले. रवी व्यंकटेशन म्हणाले, कोणत्याही राज्याच्या विकासात छोटे उद्योग महत्वाची भूमिका बजावतात.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील गेमच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या उपक्रमांचे कौतुक केले आहे.आम्ही देशात महाराष्ट्र,राजस्थान आणि मध्यप्रदेश मध्ये काम करत आहोत.महाराष्ट्रातही टप्प्याटप्याने हा उपक्रम राबविण्यात येईल. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद शिंदे यांनी आभार मानले. नागपूर येथील उपमुख्यमंत्री कार्यालयातून कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग नागपूरच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज आणि गेमच्या (नागपूर) समन्वयक स्नेहा मगर उपस्थित होत्या. 0000
नागपूर, दि. 17 : नितीन गडकरी यांच्या बहुविध क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांना देशाने स्विकारले आहे. गडकरी हे इन्होवेटर असून संपूर्ण जगात पायाभूत सुविधासह रस्ते विकासाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना रोडकरी म्हणूनही ओळखले जाते. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा या क्षेत्रात राबविलेल्या अनेक अभिनव कल्पनांमुळे त्यांना संपूर्ण देशाने स्विकारले आहे. ‘गडकरी’ या चित्रपटामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक कंगोरे नवीन पिढीपर्यंत पोहचतील तसेच त्यांच्या कार्यामुळे प्रेरणा मिळेल. असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या बायोपिकच्या टिझरचे प्रकाशन श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी माजी खासदार दत्ता मेघे, आमदार कृष्णा खोपडे, प्रविण दटके, विकास कुंभारे, भारतीय क्रिकेट संघातील आघाडिचा गोलंदाज उमेश यादव तसेच चित्रपटाचे निर्माते अभिजीत मुजुमदार उपस्थित होते. नितीन गडकरी यांच्यावरील बायोपीकचे प्रकाशन प्रसंगी मुख्य भूमिकेत असलेले राहुल चोप्रा व चित्रपटातील सहकलाकार आदींची उपस्थिती लक्षवेधक ठरली. प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिपप्रज्वलीत करुन टिझरचे प्रकाशन केले. हा चित्रपट दिनांक 27 ऑक्टोंबर पासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शीत होणार आहे. गडकरी यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे तीन तासात दाखविण्याचे कठीण काम या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी लिलया पार पाडले आहे. चित्रपट प्रदर्शीत झाल्यानंतर त्यांच्या कार्याच्या आढावा घेणारा गडकरी-2 हा चित्रपट सुद्धा प्रदर्शीत करण्याची जबाबदारी दिग्दर्शकावर राहणार आहे असे मत श्री. फडणवीस यांनी व्यक्त केले. गडकरींमधील कामाचा झपाटा आणि ते पूर्ण करण्यासाठी असलेली क्षमता प्रत्येकाने आत्मसाद करावी असे सांगतांना श्री. फडणवीस म्हणाले की, गडकरी हे प्रसिद्ध अभिनेता राज कपूर सारखे आहेत. ते छोटे स्वप्न कधी पाहत नाहीत आणि हाती घेतलेले प्रत्येक काम देहभान हरपून पूर्ण करतात आणि त्याशिवाय थांबत नाहीत. मुंबई-पुणे एक्प्रेस हायवे पूर्ण करण्याचे त्यांचे कार्य जगा समोर आदर्श म्हणून बघितले जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती होत असतांनाच पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा रोड मॅप तयार करण्याची जबाबदारी श्री. गडकरी यांच्यावर सोपविल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. प्रसिद्ध क्रिकेटपटू उमेश यादव यांनी जगात फिरतांना रस्त्याचे महत्व लक्षात येते याच पद्धतीने देशातील रस्ते तयार करण्याचे काम श्री. गडकरी यांनी केले आहे. नागपुरातील विकासा संदर्भात बोलतांना ते म्हणाले की, मेट्रो रेल्वेचा डबल डेक्कर पूल हा बांधकाम क्षेत्रातील महिलाचा दगड ठरला असून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी या कामाचे विशेष कौतुक केल्याचे उमेश यादव यांनी अधोरेखित केले. यावेळी आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे यांनी श्री गडकरी यांच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलू आपल्या भाषणातून उलगडले. गडकरी या चित्रपटाचे निर्माते अभिजीत मुजुमदार निर्मिती प्रमुख अक्षय देशमुख तसेच अनुराग भुसारी, मिहीर फाटे, अक्षय पाटील यांनी स्वागत केले. 00000

Wednesday 11 October 2023

झोपडपट्टी वासियांना येत्या डिसेंबर पर्यंत पट्टेवाटप करा - देवेंद्र फडणवीस

अनधिकृत भुखंडधारकांना नियमितीकरणासाठी विशेष मोहीम 18 भुखंडधारकांना नियमितीकरण पत्र 360 झोपडपट्टी धारकांना पट्टेवाटप
नागपूर, दि.9 : शहरातील झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टेपाटप येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. श्री फडणवीस यांच्या हस्ते देवगिरी शासकीय निवासस्थानी अनधिकृत भुखंडाचे नियमितीकरण पत्र व झोपडपट्टी वासियांना पट्टे वाटप करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते आज 18 भुखंडाचे नियमितीकरणपत्र व 11 झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरुपात पट्टे वाटप करण्यात आले. यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी उपस्थित होते. नागपूर शहरातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी मालकीच्या जागेवरील झोपडपट्टीतील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमीत क्षेत्र नियमानुकुल करुन त्यांना स्थायी पट्टे वाटप करण्यासाठी महानगरपालिका, सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागातर्फे संयुक्त मोहीम राबवून पट्टे वाटपाच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या. महानगरपालिका क्षेत्रात 426 झोपडपट्टया असून त्यापैकी 298 घोषित तर 128 अघोषित आहेत. सुधार प्रन्यास तर्फे 360 झोपडपट्टी वासियांना घरकुल पट्टे वाटपाचे काम प्राधान्याने पूर्ण केले आहे. मिश्र जागेवर असलेल्या 200 झोपडपट्यांचे सर्वेक्षण शासनाच्या भूमापन विभागाने स्थानिक मोजणी करुन तत्काळ संबंधित विभागांना अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. झोपडपट्टी धारकांकडील जागेबद्दलचे सर्वेक्षण महापालिकेकडून करण्यात येत असून त्यापैकी 281 झोपडपट्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 60 झोपडपट्यांचे सर्वेक्षण सुरु असून सुधार प्रन्यासच्या जागेवर 85 झोपडपट्या आहेत. तसेच, नझूल व महसूल जागेवर 72 झोपडपट्टयांपैकी 61 झोपडपट्ट्यांमध्ये 16 हजार 65 अतिक्रमणधारक आहेत. विशेष मोहिमेद्वारे ‘घरपोच नियमितीकरण पत्र’ अनधिकृत भुखंडाचे नियमितीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुधार प्रन्यासला दिल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 200 अनधिकृत भूखंडधारकांना नियमितीकरण पत्र पोस्टाव्दारे घरपोच पाठविण्यात येणार आहे. आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 18 भूखंडधारकांना नियमितीकरण पत्र देण्यात आले. नियमितीकरणासाठी सुधार प्रन्यास तर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र गुंठेवारी सुधारित अधिनियमानुसार 1 हजार 200 भूखंडाचे नियमितीकरण पत्र सुधार प्रन्यास तर्फे घरपोच वितरीत करण्यात येत असल्याची माहिती सभापती मनोजकुमार सुर्यवंशी यांनी यावेळी दिली. 000000

‘परवडणारी घरे’ प्रकल्पांना सर्वतोपरी मदत - महसूल मंत्री विखे-पाटील होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचा समारोप

नागपूर दि. 8 : सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील योजनेचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘परवडणारी घरे’ यासारखे प्रकल्प प्राधान्याने राबविणे आवश्यक असून त्यासाठी प्राधान्य, सवलत व सर्वतोपरी मदत करण्यास शासन तत्पर राहील, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल- (नरेडको) यांच्यावतीने रेशीमबाग मैदानावर आयोजित तीन दिवसीय होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचा समारोप मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार अभिजीत वंजारी, नरेडको अध्यक्ष घनश्याम ढोकणे, उपाध्यक्ष ब्रिजमोहन तिवारी, सचिव बादल माटे, कोषाध्यक्ष कुणाल पडोळे, सदस्य प्रियशील माटे, माजी आमदार सुधाकर कोहळे आदी यावेळी मंचावर उपस्थित होते. शहरी व ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, नोकरदार, लहान व्यावसायिक व कामगार वर्गाचा विचार करून त्यांच्यासाठी ‘परवडणारी घरे’ बांधण्याकरिता नरेडकोने पुढाकार घ्यावा. तसेच प्रत्येक शहराच्या विकासासाठी पुढाकार घेऊन वेगवेगळे मास्टर प्लॅन तयार करण्याचे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. आमदार अभिजीत वंजारी यांनी नागपूरच्या विकासात नरेडकोने योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची माहिती ढोकणे यांनी प्रास्ताविकेतून दिली तर उपस्थितांचे आभार श्री तिवारी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी होमटाऊन प्रॉपर्टी एक्सपो मध्ये सहभाग नोंदवणाऱ्या विविध संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रॉपर्टी एक्स्पोत सहभागी संस्था, प्रदर्शनी बघण्यासाठी येणारे नागरिक उपस्थित होते. 00000

‘ई-नझूल प्रणाली’ वापरकर्त्यांसाठी अधिक सुलभ व्हावी – विभागीय आयुक्त

नागपूर जिल्हा नझूल कार्यालयाचे सादरीकरण नझूल संदर्भात माहिती एका क्लिकवर नागपूर दि. 9 : शहरातील नझूलच्या जमीनी, जागा तसेच त्यांच्या वापरासंदर्भातील एकत्रित माहिती ई-नझूल प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे. ही प्रणाली वापरकर्त्यांना सहज वापरता येईल व पाहता येईल, अशी तयार करा, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे दिल्या. नागपूर जिल्हा नझूल कार्यालयाच्यावतीने ‘ई-नझूल प्रणाली’ तयार करण्यात येत आहे. या प्रणालीचे सादरीकरण श्रीमती बिदरी यांच्या दालनात करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महसूल उपायुक्त राजलक्ष्मी शहा, तहसिलदार नझूल सिमा गजभिये आदी यावेळी उपस्थित होते. नागपूर शहरात जवळपास 10 हजार 700 ठिकाणी नझुलची जमीन आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नझूल जमीनीवरील अनुदानीत करण्यात आलेल्या भाडे पट्ट्यांचे नुतनीकरण, हस्तांतरण, तारण, नाव समाविष्ठीकरण आदी कार्यवाही करण्यात येते. ही सर्व कार्यपद्धती पारदर्शी आणि सुलभ व्हावी यासाठी विशिष्ट सॉफ्टवेयरचा उपयोग करुन तयार करण्यात आलेल्या ई-नझूल प्रणालीचे सादरीकरण जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी केले.नझूल जागेबाबत अर्जदाराला स्वत:चे प्रतिज्ञापत्र अपलोड करता यावे यासाठी सोपी पद्धत अवलंबावी, अशी सूचना श्रीमती बिदरी यांनी केली. संबंधित नझूल जागेचे छायाचित्र अपलोड करणे, त्या जागेचा खसरा क्रमांक, नझूल भुखंड क्रमांक, बांधकाम परवानगी, तारण परवानगी आदींची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि त्यासाठी वाचण्यायोग्य फॉन्ट व फॉन्ट साईज वापरावा अशी सूचनाही त्यांनी केली. या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या काही संज्ञा व त्यांची नावे अधिक सोपी करण्यासंदर्भात सूचना देत या संज्ञांचा अर्थ संबंधित ई-प्रणालीतच दिल्यास अर्जदाराला या प्रणालीचा वापर करणे अधिक सुलभ होईल आणि प्रशासनावरील तानही कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. ई-नझूल प्रणालीच्या संकल्पनेचे व ही प्रणाली प्रत्यक्ष विकसीत करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ही सेवा अधिकाधिक युजरफ्रेंडली बनवून लवकरच ती जनतेसाठी उपलब्ध करुन देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. या सुचनांची तातडीने अंमलबजावणी करुन ही सेवा लवकरच जनतेला उपलब्ध करुन देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले. 0000

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विभागातील कर्मचाऱ्यांप्रती सहृदयता  पोलीस कर्मचाऱ्याचा साजरा केला वाढदिवस

नागपूर, दि.9 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी शासकीय निवासस्थानी कर्तव्यावर असणाऱ्या दोन पोलीस अंमलदारांचा वाढदिवस असल्याचे कळतात कामाच्या व्यस्ततेतूनही श्री. फडणवीस यांनी या दोन्ही अंमलदारांना शुभेच्छा दिल्या व केक भरवला. हा सर्व अनुभव घेणारे दोन पोलीस अंमलदार आणि त्यांचे सर्व वरिष्ठ हा अनपेक्षित आनंद डोळ्यात भरून घेताना आपल्या विभागाचे प्रमुख तथा राज्याचे गृहमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करतात हे पाहून सुखावले. सदर पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार धिरज पंचभावे आणि अरविंद गेडेकर यांचा आज वाढदिवस असल्याची माहिती गृहमंत्र्यांच्या कानावर पडली आणि त्यांनी या दोन्ही अंमलदारांना आपल्या दालनात बोलवून घेतले. या दोघांना शुभेच्छा दिल्या ,त्यांना केकही भरवला, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. हा अनपेक्षित आणि प्रेमळ हृद्यप्रसंगाचे साक्षी होणारे दोन्ही अंमलदार आयुष्यातला सर्वात मोठा वाढदिवस साजरा झाल्याचे समाधान व्यक्त करत आहेत. झोन क्र. २ चे पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि सदर पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय मेंढे आणि बंदोबस्तावर असणारे सर्व पोलीस कर्मचारी यांच्या सोबत श्री. फडणवीस यांनी छायाचित्रही काढले. या प्रसंगातून श्री. फडणवीस हे आपल्या विभागाच्या शेवटच्या घटकाप्रती प्रेम भाव बाळगतात आणि त्यांची काळजी घेतात हेच दिसून आले. ०००००