Saturday 31 March 2018

ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

मुंबई, दि. 31 : ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी अधिकारी किंवा व्यक्तीविरुध्द विना चौकशी गुन्हा दाखल करता येणार नाही. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत शासनातर्फे अनु.जाती/जमाती आयोगामार्फत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात क्रिमिनल अपील नं.416 ऑफ 2018 डॉ.सुभाष महाजन विरुध्द महाराष्ट्र शासन या प्रकरणासंदर्भात दि.20 मार्च2018 च्या निर्णयाच्या अनुषंगाने ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अधिकारी किंवा व्यक्तीविरुध्द विना चौकशी गुन्हा दाखल करता येणार नाही. तसेच गुन्हा दाखल करण्याआधी कर्मचाऱ्याच्या बाबतीत नियुक्ती प्राधिकरण व साधारण व्यक्तीबाबत पोलीस अधिक्षकाकडून प्राथमिक चौकशी झाल्यावरच पुढील कार्यवाही करण्यात येईलअशा निर्णयाच्या पार्श्वभूमीवर दि.23 मार्च2018 रोजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली व महाराष्ट्र पोलीस दलाच्या नागरी हक्क संरक्षण विभागगृह विभागविधी व न्याय विभागअनु.जाती/जमाती आयोग यांच्याकडून अभिप्राय प्राप्त केल्यानुसार सदर प्रकरणा संदर्भात पुर्ननिर्रीक्षण याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनातर्फे पुर्ननिरीक्षण याचिका दाखल करून शासनातर्फे ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया सक्षम बाजू मांडतील तसेच इतर विधीतज्ज्ञांचा सल्ला घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ एका प्रकरणावरून संसदेत पारित करण्यात आलेल्या संपूर्ण कायद्याचे निकष बदलल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठ (Constitutional Bench)कडे सदर प्रकरण वर्ग करण्यासंदर्भात व सर्व अनुसूचित जाती व जमातीच्या बांधवांना कायद्याचे संरक्षण कायम राहण्याच्या दृष्टीकोनातून न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्याकरीता सक्षमपणे संपूर्ण पुराव्यासहीत शासन बाजू मांडणार आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्या समवेत चर्चा करून पुढील रुपरेषा ठरविणार असल्याचेही श्री.बडोले यांनी सांगितले.
००००

आंतरजातीय विवाहासाठी होणार स्वतंत्र कायदा

मुंबईदि. 31 : आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांना संरक्षण मिळावे, जातीय सलोखा राखण्यासाठी महिलांना संरक्षण मिळावे, सामाजिक बहिष्कार, अवहेलना यापासून सुरक्षितता मिळावी. या उद्देशाने आंतरजातीय विवाहासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार असून यासाठी अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी. एस. थुल यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने मसुदा समिती गठीत केली आहे.
यामध्ये विधी व न्याय विभागाचे सहसचिव अविनाश बनकरसामाजिक संस्थेचे प्रतिनिधी ॲड. केवल उकेसहयोगी प्रा. डॉ. संदेश वाघकास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळेश्रीमती राही भिडे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.
या समितीने तीन महिन्यांत आपला अहवाल शासनास सादर करावयाचा आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 21 मार्च रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. 201803211737006922 असा आहे.
000

Heat wave

Heat wave  likely to occur in the Districts of Akola ,Amravati,Buldhana Washim and Yavatmal during next three days.


Issued By : 

Regional Weather Forecasting Centre 
Regional Meteorological Centre 
India Meteorological Department 
DBAI Airport, Sonegaon 
Nagpur - 440005 

Tel.# : 91-712-2282157, 2288544 

प्रतिकूल परिस्थितीत पोलिस करीत असलेले काम स्तुत्य - नितीन गडकरी


                     नागरी कृती कार्यक्रम 2017-18 चा समारोप थाटात        
                                                                                                   गडचिरोली,दि.31:-  दुर्गम भागातील नागरिकांना, युवकाना त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी  कौशल्य विकासाचे धडे देऊन स्वयंमपूर्ण करण्याचा मोलाचे काम  नागरी कृती कार्यक्रम  2017-18 अत्यंत स्तुत्य असा आहे. तसेच येथील पोलिस दलाने नागरिकांना उपजिविका साधन उपलब्ध करुन देऊन जनतेत विश्वास निर्माण केला, याचा सकारात्मक परिणाम नक्षलवाद संपविण्यात होत आहे. पोलिसांची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असल्याचे  प्रतिपादन केंद्रीय परिवहन, जहाज बांधणी, जलसंधारण व गंगाशुध्दीकरण खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. 

      राखीव  केंद्रीय  पोलिस दल  तथा गडचिरोली पोलिस यांनी  सयुक्तपणे राबविलेल्या सिवीक एक्शन प्रोग्राम 2017-18 च्या,     पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणातील भव्य शामियानात आयोजित  समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
        यावेळी पालकमंत्री राजे अंब्रीशराव  आत्राम, खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, क्रिष्णा गजबे, अतिरिक्त पोलिस महासंचालक कन्नकरत्नम,  केंद्रीय पोलिस दलाचे पोलिस उप महानिरीक्षक राजकुमार, नगराध्यक्ष योगिता पिपरे,  शालु दंडवते व्यासपिठावर प्रामुख्याने उपस्थीत होते.
          पुढे बोलतांना गडकरी म्हणाजे की,  राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा अत्यंत श्रीमंत आहे, मात्र येथील नागरिक गरिबीचे जीवन जगत आहेत. त्यांना योग्य मार्गदशन, दळणवळणाच्या सोयी,  शेतीशी पुरक लघु उद्योगाची जाणीव करुन देणे आपले कर्तव्य आहे.  याची दखल घेऊन प्रतिकुल परिस्थीतीत  नागरिकांच्या संरक्षणा सोबतच  त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी पोलिस विभागाने  हा उपक्रम राबवून येथील  जनतेच्या मनात शासन, प्रशानाच्या बाबतीत  विश्वास निर्माण केला आहे.
         याप्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आपल्या विभागानी राबविलेल्या उपक्रमांची माहिती देऊन  डाव्या विचारसरणीला प्रतिबंध घालण्याचा  जवानानी आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे त्यानी सांगितले.
       सिवीक एक्शन प्रोग्राम  2017-18  अंतर्गत युवकांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, संगणक चालविण्याचे प्रशिक्षण, कोसाउत्पादनाचे प्रशिक्षण दिले. त्याबाबतचे प्रमाणपत्र गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी महिला आर्थीक विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या बचत गटाना  शिलाई मशिनचे वितरण करण्यात आले.
                                                                 *****

विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणाकडे कल वाढवावा - नितीन गडकरी




गडचिरोलीच्या विकासासाठी तरूणांच्या हाती रोजगार आवश्यक
गोंडवाना विद्यापीठाचा 5 वा पदवीदान समारंभ उत्साहात
गडचिरोली, दि.31 - निसर्ग संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी तरूणांच्या हाती रोजगार असणे आवश्यक आहे. त्याकरीता गोंडवाना विद्यापीठाने व्यवसायभिमुख शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. 
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतर्फे विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या विद्यापीठाच्या पाचव्या दिक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मंचावर राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, प्रभारी कुलसचिव डॉ. ईश्वर माहुर्ले प्रामुख्याने उपस्थित होते.
            गडचिरोली जिल्हा हा निसर्ग संपन्न असलेला श्रीमंत जिल्हा आहे. मात्र बेरोजगारी, गरिबी यासह विकासात्मक मागासलेपण या प्रमुख समस्या या ठिकाणी आहे, असे सांगून गडकरी म्हणाले, या जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही जिल्ह्याचा विकास हा शिक्षण, उद्योग व शेतीच्या विकासावर अवलंबून असतो. शिक्षण हा विकासाचा महत्वाचा गाभा असून त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यापीठाची आहे. तरूणांच्या हाती केवळ पदव्या आल्याने कुठल्याही जिल्ह्याचा विकास होत नाही, तर त्या पदव्या प्राप्त केल्यानंतर मिळालेल्या शिक्षणाचा समाज व जिल्ह्याच्या विकासासाठी कसा उपयोग होतो, यावर अवलंबून आहे. उच्च शिक्षणाची पदवी प्राप्त करूनही अनेक तरूण बेरोजगार आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना व्यवसायभिख शिक्षण देण्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे.
            गडचिरोली जिल्ह्यात रोजगार वाढविण्यासाठी शेतीच्या विकासाबरोबरच उद्योग येणेही आवश्यक आहे. उद्योग आणण्याकरीता सरकार प्रयत्नशील असून त्याकरीता गडचिरोलीतील नागरिकांनी डाव्या विचारसरणीला थारा न देता विकासात्मक विचारांना साथ देण्याची आवश्यकता आहे. हा विकास करतांना जिल्ह्यातील जल, जंगल व जमीन यांचा समतोल साधण्याची गरज आहे.
            वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी हा क्षण आयुष्याला दिशा देणारा आहे. विद्यार्थ्यांनी या शिक्षणाचा उपयोग आपल्या आयुष्यात करावा. गडचिरोलीच्या विकासासाठी शासन कटीबध्द असून विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. गडचिरोलीला विशेष निधी दिला जात असून भविष्यात देशातील उत्तम जिल्हा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तरूणपिढी घडविण्याची जबाबदारी विद्यापीठावर असल्यामुळे विद्यापीठाने पारंपारीक शिक्षण पध्दती सोडून नाविण्यपुर्णता व संशोधनात्मक शिक्षणपध्दतीकडे वळण्याची वेळ आता आली आहे, असेही ते म्हणाले.
            गडचिरोलीच्या विकासासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन संशोधन करणा-या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध कल्पना कागदावर प्रत्यक्ष उतरवून राज्य शासनापर्यंत पोहचवाव्या. त्यावर शासन निश्चितच सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन  त्यांनी यावेळी दिले. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील तरूण विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत. येत्या काळात या जिल्ह्यांची विकासात्मक ओळख देशात निर्माण होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.     
            कुलगुरू कल्याणकर म्हणाले, हे विद्यापीठ संशोधक विद्यार्थ्यांची ऑन लाईन परीक्षा घेणारे पहिले विद्यापीठ ठरले आहे. केवळ सहा वर्षाच्या अल्पावधीत विद्यापीठात विविध शाखांमधून ३७ विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी प्राप्त केली आहे. विद्यापीठाने शैक्षणिक दर्जाबाबत जागरूकता बाळगून माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या विद्यापीठात ५ पदव्युत्तर शैक्षणिक विभागांमध्ये एकूण १८ सहायक प्राध्यपकांची नियुक्ती झाली असून १० सहयोगी प्राध्यापक ५ प्राध्यापक यांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. एकूण २२ पदव्युत्तर शिक्षण विभागांसाठीचे प्रस्ताव शासनाला सादर केले गेले आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
            गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीत सुरू व्हावे, यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्यपुर्ण प्रयत्न केले. त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी या विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर हा आजचा पाचवा दिक्षांत समारंभ आहे.
            गोंडवाना विद्यापीठाच्या विकासाकडे सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने लक्ष दिले आहे. त्यांच्याच प्रयत्नातून विद्यापीठास स्वतःची अशी जागा आरमोरी रोडवर आता मिळणार आहे. याचा पाठपुरावा मुनगंटीवार यांनी सातत्याने केला. इतकेच नव्हे तर या जागेच्या खरेदीसाठी प्रशासनास ८९ कोटी रूपयांचा निधी देखील त्यांनी प्रदान केला आहे. 
               यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आचार्य पदवी, विविध विषयात प्रथम स्थान मिळविणा-या विद्यार्थ्यांना सुर्वण पदकासह विविध पदक व गुणवत्ता प्रमाणपत्र बहाल करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात राज्यमंत्री राजे अम्बरीशराव  आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे यांच्यासह विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन प्रा. नरेंद्र आरेकार व प्रा. शिल्पा आठवले यांनी केले.
                                     ******


“दिलखुलास”मध्ये महाऑनलाईनचे मुख्य परिचालन अधिकारी प्रसाद कोलते


मुंबई, दि.31: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात महाऑनलाईन सेवा या वेबसाईटच्या कामकाजा विषयी महाऑनलाईनचे मुख्य परिचालन अधिकारी प्रसाद कोलते यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत सोमवार दि.2, मंगळवार दि. 3 आणि बुधवार दि.4 एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनी वरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका पुनम चांदोरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्र शासन आणि टाटा कन्सल्टंसी सर्विसेस यांचा संयुक्त उपक्रम असणा-या महाऑनलाईनची स्थापना,नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा,महाऑनलाईनद्वारे राबविण्यात येणारे विविध उपक्रम,प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीस करण्यात आलेली मदत, महाऑनलाईनला मिळालेले पुरस्कार आणि डिजिटल लॉकर आदी विषयाची माहिती श्री. कोलते यांनी दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.
००००

मराठी भाषा निम्नस्तर परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार होणार


मुंबई दि. 31 :राजपत्रित अधिकारी आणि अजरापत्रित कर्मचाऱ्यांची जून आणि ऑगस्ट 2018 मधील मराठी भाषा निम्नस्तर परीक्षा (प्रश्नपत्रिका क्रंमाक 1) नवीन अभ्यासक्रमावर म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधक मंडळ, पुणे यांचे इयत्ता 9 वी चे मराठी अक्षरभारती या पुस्तकावर आधारीत घेण्यात येणार आहे. मराठी भाषा उच्चस्तर परीक्षेच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या अमराठी भाषिक अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा दि. 24 जून 2018 रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांना विहित नमुन्यात आपले अर्ज विभाग प्रमुख /कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत संबंधित विभागीय कार्यालयांकडे दि. 10 मे  2018 पर्यंत करता येणार आहे.अमराठी भाषिक राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी एतदर्थ मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी पुढील मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा दि. 5 ऑगस्ट 2018 रोजी मुंबई केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आपली आवेदपत्रे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत दि. 16 जून 2018 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षेसाठी विभागीय कार्यालय तसेच भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, डॉ.आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय इमारत, वांद्रे (पूर्व), मुंबई-400 051. दूरध्वनी क्र.022- 26552184 आणि 022- 26417265 येथे संपर्क करावा. मुंबई व कोकण विभागातील अर्ज विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, कोकण भवन, 3 रा मजला, नवी मुंबई-400614, दूरध्वनी क्र.022-27573542 येथे पाठविता येतील. पुणे व नाशिक विभागात राहणाऱ्यांना या परीक्षेसाठीचे अर्ज  विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, 2 रा मजला, पुणे-411001, दूरध्वनी क्र. 020-26121709 येथे करता येईल. तर नागपूर व अमरावती विभागात राहणारे विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001, दूरध्वनी क्र. 0712-2564956 येथे तर औरंगाबाद विभागासाठी विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद-431001, दूरध्वनी क्र. 0240-2361372 येथे अर्ज करता येतील.
परीक्षेसंबंधात अधिक माहिती आवश्यक असल्यास उपरोक्त संबंधित विभागीय सहायक भाषा संचालक यांच्याशी किंवा भाषा संचालक यांच्याशी दूरध्वनी क्र. 022- 26552184 वर संपर्क साधावा असे आवाहन भाषा संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे केले आहे.
000

हौशी हिंदी नाटय स्पर्धेच्या पारितोषिकांमध्ये वाढ

मुंबई दि. 31: हौशी हिंदी नाट्यस्पर्धेला गेल्या काही वर्षात चांगला प्रतिसाद मिळत आहे.सध्या हौशी हिंदी नाट्यस्पर्धा एकाच केंद्रावर घेण्यात येत असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थांचा सहभाग विचारात घेता पारितोषिकांची संख्याक कमी होती. त्यामुळे आता हौशी हिंदी नाट्य स्पर्धेच्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली असून 57 व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्य नाट्य महोत्सवाअंतर्गत हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, बालनाटय आणि मराठी व्यावसायिक नाटय स्पर्धेतील पारितोषिकांच्या रकमेत वाढ आणि सादरीकरणासाठी येणारा खर्च आणि दैनिक भत्ता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आता राज्य नाट्य महोत्सव अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या हौशी हिंदी नाट्य स्पर्धेतील पारितोषिकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
उत्कृष्ट नाटक यामध्ये आता चौथे आणि पाचवे पारितोषिक दिले जाणार असून पारितोषिकाची रक्कम अनुक्रमे 30 हजार रुपये आणि 20 हजार रुपये असेल. दिग्दर्शन, नाट्यलेखन, प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा यामध्ये सुध्दा आता तिसरे पारितोषिक दिले जाणार असून यामध्ये दिग्दर्शनासाठी 20 हजार रुपयांचे पारितोषिक तर नाट्यलेखनासाठी 10 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. प्रकाशयोजना, नेपथ्य आणि रंगभूषा यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. अभिनयासाठी रौप्यपदक दिले जाणार असून यामध्ये 3 पुरुष आणि 3 महिला याचाच अर्थ 6 कलाकारांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय अभिनयासाठी एकूण 5 पुरुष आणि 5 महिला अशा 10 जणांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
0000

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विधानभवनात आदराजंली




मुंबई दि.31 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधानभवनातीलत्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
याप्रसंगी विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव रविंद्र जगदाळे, सुनिल झोरे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुनआदरांजली वाहिली.
0 0 0

Friday 30 March 2018

शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पुरविणार - कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर





पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्काराचे वितरण

जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या शासनाचा प्रयत्न असून जैन इरिगेशन सारख्या संस्था या क्षेत्रात पुढे आल्यास शासनातर्फे त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे केले.


जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. तर्फे अखिल भारतीय पातळीवर कृषि क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या पद्मश्री  डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते वडनेर भैरव (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील प्रगतीशील तरुण शेतकरी अविनाश मनोहर पाटोळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  
कार्यक्रमाला  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला पाटील, महापौर ललित कोल्हे, खासदार रक्षा खडसे,आमदार सर्वश्री. चंदूलाल पटेल, एकनाथराव खडसे, डॉ. सतीश पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे,किशोर पाटील, शिरीष चौधरी, उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, कवी ना. धों. महानोर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, गुणवंत सरोदे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनिल जैन आदी उपस्थित होते.
श्री. फुंडकर म्हणाले, पुरस्कारप्राप्त शेतकरी श्री.पाटोळे यांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन उत्पादनात वाढ केली. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो त्या डॉ. अप्पासाहेब पवार यांनी राज्यातील कृषी क्षेत्रात भरीव काम केले असून शेतकऱ्यांना नवी दिशा दिली आहे. शेताकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे असेच कार्य जैन इरिगेशन मार्फत करण्यात येत असून शेतीशी निगडीत विविध क्षेत्रात या संस्थेचे कार्य उपयुक्त असे आहे. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अशा संस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्री. लोणीकर म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीचे उत्पन्न वाढले आहे. मात्र, विपणनात शेतकरी मागे आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात फक्त शेतकऱ्यांची औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून या औद्योगिक वसाहतीत शेतमालावर प्रक्रिया करुन तो बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. हुशार तरुणांनी आता शेती कसण्यासाठी पुढे येत नवतंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबर विक्री कलाही आत्मसात केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
श्री. पवार म्हणाले, चांदवडसारख्या अवर्षण प्रवण तालुक्यात आधुनिक पद्धतीने शेती करीत अविनाश पाटोळे यांनी यश मिळविले आहे. डॉ. अप्पासाहेब पवार यांना अशाच प्रकारची नवीन पिढी अपेक्षित होती. कापसावरील बोंडअळी, गव्हावरील तांबेरा, केळीवरील करपा रोग अशा कृषीविषयक प्रश्नांकडे शेतीतज्ज्ञ व संशोधकांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. शेतमालाची किंमत वाढली, तर महागाई वाढते हा विचार आता बदलण्याची गरज आहे. तसेच शेतीत आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रातील नवनवीन बदल व संशोधनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली, तर शेतीत बदल घडून येतील, असे त्यांनी सांगितले. त्यांनी भवरलाल जैन व अप्पासाहेब पवार यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
सत्काराला उत्तर देताना श्री. पाटोळे म्हणाले की, सुरुवातीला वडिलांना मदत म्हणून शेतीस सुरुवात केली. त्यानंतर शेतीत आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने यश मिळाल्याचे सांगितले. संकटातून मार्ग काढतांना वडील मनोहर पाटोळे यांच्यासह कुटुंबीयांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार दर दोन वर्षांनी दिला जातो. या पुरस्काराचे यंदा 14 वे वर्षआहे. सन्मानचिन्ह,दोन लाख रुपये व पुरस्कारार्थींचा सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र  अशा पाच महसूल विभागातून शेतकऱ्याची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. यावर्षी उत्तर महाराष्ट्रातून ही निवड करण्यात आलेली आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एस. मगर व निवड समितीच्या सदस्यांनी 50 शेतकऱ्यांमधून श्री. पाटोळे यांची निवड केली आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल जैन यांनी केले. ज्योती अंबेकर यांनी सूत्रसंचालन केले.  तर अशोक जैन यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*****

वीजनिर्मिती प्रकल्प राज्याच्या विकासासाठी उपयुक्त - चंद्रकांत पाटील




            जळगाव दि. 30 :- नव्याने उभारण्यात येणारा 660 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प राज्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
            भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या ६६० मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पाचे तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या २२० केव्ही उपकेंद्र केकतनिंभोरा, ता. जामनेर, २२० केव्ही उपकेंद्र विरोदा, ता. यावल, १३२ केव्ही उपकेंद्र कोठली, ता. भडगाव, १३२ केव्ही उपकेंद्र कर्की (पुर्नाड), ता. मुक्ताईनगर येथील उपकेंद्र आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या आठ उपकेंद्राचे भुमीपूजन महसूलमंत्री श्री. पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदामंत्री गिरीश महाजन होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वला पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार एकनाथ खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार शिरीष चौधरी, आमदार किशोर पाटील, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महानिर्मितीचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार आदी उपस्थित होते.
            श्री. पाटील म्हणाले , पाणी, वीज आणि रस्ते या पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत आहे. अशा सुविधांच्या विकासामुळे राज्याचे दरडोई उत्पन्न वाढते आहे. राज्यात सहा लाखाहून अधिक जीएसटी नोंदणी झाली आहे. या सुविधांवर खर्च केल्याने विविध गावांमध्ये विकास होवून राज्याच्या उत्पन्नात वाढ होईल आणि जनता समृद्ध होईल.  विकासाच्या माध्यमातून सुख-समृद्धी, आनंद आणि सुरक्षितता देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
            जिल्ह्यात सौरऊर्जेच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी पाड्यावर वीज पोहोचाविण्याचे प्रयत्न करण्यात येत असून त्यामुळे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. विविध प्रकल्पांमुळे विकासाला गती मिळत असते, त्यामुळे असे प्रकल्प उभारण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नदेखील सोडविण्यात येतील, असेही श्री. पाटील म्हणाले.
            जलसंपदामंत्री श्री. महाजन म्हणाले की, वीजनिर्मिती प्रकल्पामुळे वीजेची समस्या दूर करण्याबरोबरच रोजगार निर्मितीसाठी चालना मिळेल. प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या एकूणच विकासाला चालना मिळेल. प्रकल्पाचेकामकरतांनाअनेकांनारोजगारमिळावाअशीअपेक्षात्यांनीव्यक्तकेली. शासनाने वीजेचे उत्तम नियोजन केल्याने राज्यात वीजपुरवठा चांगल्याप्रकारे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, जिल्ह्यात सिंचनाच्या माध्यमातून शेती आणि शेतकरी समृद्ध करण्यासाठी वरणगाव सिंचन योजनेअंतर्गत जलवितरणाच्या कामाला गती देण्यात येत आहे. बोदवड सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. शेळगाव येथे वर्षभरात पाणी थांबवण्याचे प्रयत्न आहेत. वीज आणि पाणी मिळाल्यास शेतकरी समृद्ध होणार असल्याने शासन त्या दिशेने प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
            ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, केंद्राच्या सुचनेनुसार 25 वर्षापेक्षा जुने प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बंद करण्यात येणार असून पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. भुसावळ येथे उभारण्यात येणारा नवा प्रकल्प याच प्रकारचा आहे. जुन्यादराप्रमाणे काम होणार असल्याने 900 कोटी रुपयांची बचत होणार आहे. प्रकल्प उभारतांना प्रकल्पग्रस्तांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. सीएसआरच्या माध्यमातून या भागाच्या विकासाला सहकार्य करण्यात येईल. तसेच 42 महिन्यात प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
            ते पुढे म्हणाले, केकत निंभोरा हे देशातील सर्वात आधुनिक उपकेंद्र राहील. जिल्ह्यात विद्युत विकासाची एकूण 5 हजार कोटींची कामे हाती घेण्यात आली असून येत्या दिड वर्षात करण्यात येणाऱ्या महावितरणची 321 कोटींची आणि महापारेषणच्या 250 कोटींच्या कामांचा यात समावेश आहे.
            शेतकऱ्यांना दिवसा वीज देता यावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून 31 केव्ही वीज उपकेंद्रावर सौर ऊर्जाप्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या वीज प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नळयोजना आणि पथदिव्यांनादेखील वीज जोडणी देण्यात येणार असल्याने ग्रामपंचायतीनी जागा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना थकीत वीज बिलापोटी दंड व्याज माफ करण्यात येणार असून बिलाची मुळ रक्कम शेतकऱ्यांनी भरावी, असे आवाहन त्यांनी केले.
             व्यवस्थापकीय संचालक श्रीमाळी यांनी प्रास्ताविकात भुमीपूजन करण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यूतनिर्मिती वितरणव्यवस्था अधिक मजबूत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राची स्थापित क्षमता १२१० मेगावॅट आहे. ६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन वीज प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर भुसावळ वीज केंद्राची स्थापित क्षमता १८७० मेगावॅटएवढी होईल. ६६० मेगावॅट क्षमतेचा हा वीज प्रकल्प एकूण ११४ हेक्टर जमिनीवर साकारणार असून प्रकल्पाची किंमत सुमारे ४५४८ कोटी रुपये आहे. अत्याधुनिक असा हा प्रकल्प सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित आहे.
            महावितरणद्वारे उभारण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती अंतर्गत दहिवद ता. अमळनेर, तालखेडा (भोटा) ता. मुक्ताईनगर बक्षिपुरता. रावेर या X ५एम.व्ही. क्षमतेच्या ३३/११ के.व्ही.  उपकेंद्रांमुळे परिसरातील 30 गावांतील 21 हजार 803 लोकांना लाभ मिळणार आहे. या उपकेंद्रांच्या कामांसाठी 6 कोटी 48 लाख निधी उपलब्ध आहे. पंडित दीनदयाल योजनेतून 7 हजार बिपीएल कुटुंबाना मोफत वीजजोडणी देण्यात येणार आहे.
            एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत सावदा, रावेर, फैजपूर, अमळनेर, भडगांव (वडदे) या X ५एम.व्ही. क्षमतेच्या ३३/११ के.व्ही.  उपकेंद्रांमुळे शहरासह परिसरातील औद्योगिक संलग्न शेतीक्षेत्रातील 33 हजार  760 लोकांना याचा लाभ मिळणार आहे. या उपकेंद्रांच्या कामांसाठी 11 कोटी 85 लाख निधी उपलब्ध आहे.
            महापारेषणच्या नाशिक परिमंडळमार्फत उभारण्यात येणाऱ्या चार उपकेंद्र उभारणीनंतर जळगाव जिल्ह्यातील जामनेर, यावल, मुक्ताईनगर, भडगाव तालुक्यातील अतिउच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे सक्षम होऊन, उच्चदाबाने अखंडित विद्युत पुरवठा होण्यास मदत होईल तसेच औद्योगिक, कृषी घरगुती वीज ग्राहकांना योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठा होउ जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळेल. जामनेर, यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर, भडगाव, पाचोराव चाळीसगाव या तालुक्यांसह परिसरातील सुमारे 400 गावांना लाभ होईल. घरगुती, कृषी, औद्योगिक व्यावसायिक सुमारे 3 लाख विद्युत ग्राहकांना याचा फायदा होईल.  
            महानिर्मितीच्या १००० मेगावाट ६६० मेगावाट विजेच्या निष्कासनाकरिता २२० केव्ही. उपकेंद्र विरोदा २२० केव्ही उपकेंद्र केकतनिंभोरा हे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेमुळे८०० एम. व्ही. . रोहित्रक्षमता वाढ, ६८.०५ कि.मी. अति उच्चदाब वाहिनीचे पारेषण जाळे विकसित होईल. हे चार प्रकल्प पुढील दोन वर्षात कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.