Saturday 31 October 2020

विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आदिकवी महर्षी वाल्मिकी, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

 

    




       
नागपूर, दि.31: विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज आदिकवी महर्षी वाल्मिकी तसेच लोहपुरुष माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रध्दांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

            उपआयुक्त चंद्रभान पराते यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंती दिवस हा देशभर राष्ट्रीय एकता दिवसम्हणून साजरा करण्यात येतो.  यावेळी श्री. पराते यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ दिली. तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांचा पुण्यतिथी दिवस हा राष्ट्रीय संकल्प दिवसम्हणून साजरा करण्यात येतो.

            तहसिलदार अरविंद सेलोकर, नायब तहसिलदार संदीप तडसे तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

                                       जिल्हाधिकारीकार्यालय
           
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन सभागृहात आज आदिकवी महर्षी वाल्मिकी तसेच लोहपुरुष माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रध्दांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

            जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी श्री. ठाकरे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ दिली.

            निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातळे तसेच जिल्हाधिकारी  कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

*****

 

नव्या तंत्रज्ञानाने न्यायदानाची प्रक्रिया अधिक समतोल व सुलभ होईल- सरन्यायाधीश शरद बोबडे



 


                                

नागपूर उच्च न्यायालयातील न्याय कौशल केंद्राचे (ई-रिसोर्स सेंटर) उद्घाटन 

            नागपूर, दि. 31: सामान्य नागरिकाला जलद न्यायासाठी न्यायकौशलची (ई-रिसोर्स सेन्टर) भूमिका महत्वाची ठरणार आहे. नव्या तंत्रज्ञानाने न्यायदानाची प्रक्रिया अधिक समतोल व सुलभ होईल. यासाठी न्यायप्रक्रियेत ई-फायलिंग सारख्या प्रक्रियेला गती देवून कायद्याचे राज्य अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचे  प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश  शरद बोबडे यांनी आज उच्च न्यायालयात केले.

            उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अद्ययावत न्याय कौशल केंद्राचे (ई-रिसोर्स सेन्टर) उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते आज झाले. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भू्‌षण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्यायमूर्ती सुनिल शुक्रे, न्यायमूर्ती ए.ए.सयद, न्यायमूर्ती नितीन जामदार उपस्थित  होते.

            कोरोना संसर्ग काळात सर्वोच्च न्यायालयाचे काम हे  व्हिडीयो कॉन्फरन्सव्दारे करण्यात आले. काही राज्यात तर मोबाईल व्हॅनद्वारेही काम करण्यात आले. तंत्रज्ञानावर आधारीत ई-कोर्ट प्रणालीव्दारे वेळ, श्रम, पैसे यांची बचत होईल, मात्र यासाठी तंत्रज्ञानाची सहज व समानतेने उपलब्धता असावी अशी अपेक्षाही सरन्यायाधीशांनी व्यक्त केली.

            नागपूर हे देशाच्या मध्यस्थानी असून  येथून सुरू झालेली न्यायकौशल सारखी केंद्र देशभरात कार्यरत व्हावी. न्याय व्यवस्थेवरील कामाचा ताण ई-रिसोर्स सेन्टरच्या माध्यमातून कमी  होण्यास मदत होईल. कृत्रिम बुध्दीमत्तेच्या न्यायदानातील वापराने न्यायप्रणाली अधिक वेगवान व सुलभ होईल असेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. ते म्हणाले, मोटार व्हेईकल ॲक्ट, समन्स बजावणे ही कमी प्राथमिकतेची कामे देखील  एका क्लिकवर मोबाईलव्दारे तात्काळ होवू शकतात. त्यामुळे प्राथमिकतेच्या नावाखाली न्यायदानाला विलंब लागणे बंद होईल. 20 हजार पानांच्या एखाद्या खटल्यातील  पूरक माहिती शोधण्याचे कार्य ई-फायलींगमुळे काही सेंकदात शक्य होईल. न्याय कौशल हे केवळ वकील, तक्रारकर्ते यांच्यासाठीही वरदान नसून मध्यस्थीसाठी देखील या व्यासपीठाची उपयुक्तता  असल्याचे त्यांनी सांगीतले. यामुळे समतोल व सुलभ न्यायदान वाढेल याचा सर्वाधिक फायदा शेतकरी, कष्टकरी, महीला व तळागाळातील घटकांना होईल. यावेळी 54 केसेस न्यायकौशलच्या माध्यमातून दाखल झाल्याची माहिती सरन्यायाधिशांनी दिली. तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना  मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार यांनी न्यायकौशल केंद्र सुरू करण्यामागील भूमिका स्पष्ट केली.

            स्वागतपर संबोधनामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी ई - सेवांबाबत सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आग्रही मागणीची आठवण करून दिली.

            मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी राज्यात ई-प्रणालीच्या वापराचे जाळे बळकट होत असल्याचे सांगीतले. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी  ई-न्यायदान  येणा-या काळामध्ये दीर्घकालीन व्यवस्था ठरणार आहे. यामुळे काटोलसारख्या तालुकास्तरावरूनही देशातील कोणत्याही न्यायालयाशी संपर्क साधणे शक्य झाले.  ही आनंदाची बाब असल्याचे म्हटले. 

            ई-न्यायप्रणालीचे प्रमुख न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड यांनी संपूर्ण भारतात न्यायव्यवस्थेमध्ये वापरण्यात येत असलेल्या ई-प्रणालीची सद्यस्थिती सादरीकरणातून मांडली. ते नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते.

            कोविड  सुरक्षासंकेतानुसार मोजक्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, मुबंई उच्च न्यायालयाचे  माजी मुख्य  न्यायमुर्ती  भूषण धर्माधिकारी यासह विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  

            सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभिंयता जर्नादन भानुसे,  अभियंता राजेंद्र बारई,  अंभीयता चंद्रशेखर गिरी, दिनेश माने, राजेंद्र बर्वे व  विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता मनिष पाटील यासह मीडिया वेव्हजचे अजय राजकारणे यांचा  यावेळी डिजीटल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचलन ॲङ राधीका बजाज, न्यायाधीश शर्वरी जोशी तर आभार न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

*****

 

Thursday 29 October 2020

 


प्लाज्मा दान करावंच !

                   -रविंद्र ठाकरे

* प्लाज्मामुळे 58 कोरोना रुग्णांना लाभ

* जिल्हाधिकाऱ्यांनी केले प्लाज्मा दान

 

       नागपूर, दि. 29 : प्लाज्मा देणेही रक्तदानासारखीच प्रक्रिया आहे. कोरोनामधून मुक्त झालेल्यांनी दान केलेला प्लाज्मा अत्यवस्थ वा गंभीर कोरोना रुग्णांना दिल्या जातो. कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाज्मा दान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

            मागील महिन्यात कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर उपचारानंतर आता पूर्ण बरा झालो आहे. यादरम्यान शरीरात कोरोना विषाणूचा प्रतिकार करणारे प्रतिजैविके (ॲन्टिबॉडीज) तयार झाले. रक्तातील प्लाज्मा वेगळे करुन अन्य गंभीर कोविड रुग्णाला दिल्यास कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मदत करतात. त्यामुळे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जावून प्लाज्मा दान केला आहे. कोविडमधून बरे झालेल्या प्रत्येकाने प्लाज्मा दान करावे, असे रविंद्र ठाकरे यांनी  आवाहन केले आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्लाज्मा बँक प्लाटिना प्रोजेक्ट अंतर्गत ॲन्टिबॉडीज पॉझिटिव्ह झाल्यानंतर साधारणत: 28 दिवसानंतर प्लाज्मा दान करता येते. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 72 दात्यांनी प्लाज्मा दान केला आहे. यामुळे 58 अतिगंभीर कोरोना रुग्णांना प्लाज्मा देण्यात आला आहे.

            कोरोनामधील गंभीर रुग्णांसाठी  प्लाज्मा दान करण्याची ईच्छा व्यक्त केल्यानंतर ॲन्टिबॉडीजच्या तपासणीनंतर जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी आज ब्लड बँकेत जावून  प्लाज्मा दान केले. यामध्ये दोन बॅगमध्ये  प्रत्येकी 215 एमएल याप्रमाणे 430 एमएल प्लाज्मा दान केले. यावेळी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, डॉ. अविनाश गावंडे, प्लाज्मा बँक प्लाटिना प्रोजेक्टचे राज्याचे नोडल अधिकारी डॉ. मोहमद फझल तसेच ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. संजय पराते यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून राज्यात प्रोजेक्ट प्लॅटिना हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यात 21 प्लाज्मा बँक आहेत.आतापर्यंत राज्यात 1 हजार 480 प्लाज्मा बॅग संकलित झाल्या असून त्यापैकी 690 बॅग कोरोनाग्रस्त गंभीर आजारातील रुग्णांना देण्यात आल्या आहेत.

            प्लाज्मा दान करणे हे सध्याच्या परिस्थितीत खूप महत्त्वाचे व आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनामधून मुक्त झालेल्यांनी प्लाज्मा अवश्य करावे. प्लाज्मा दिल्यामुळे  गंभीर आजार असलेल्यांचा जीव वाचविण्यात आपला हातभार ठरु शकतो.  प्लाज्मा देणेही रक्तदानासारखीच प्रक्रिया आहे. रक्तदानानंतर रक्ताचे शुद्धीकरण होवून प्लाज्मा वेगळा केला जातो.  रक्तातील उर्वरित आपल्या शरीरात सोडले जातात. हे एकाचवेळी होत असून अवघ्या दीड तासाच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होते. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे. त्यामुळे कोविडमधून मुक्त झालेल्यांनी प्लाज्मा दान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

*****

 भविष्य निर्वाह निधीचे वर्ष 2019-20 चे वार्षिक विवरणपत्र सेवार्थ प्रणालीवर  

नागपूर, दि. 29:- नागपूर भविष्य निर्वाह निधी लेख्याचे वर्ष 2019-20 साठी वार्षिक विवरण महालेखाकार नागपूर-2 च्या संकेतस्थळ तथा सेवार्थ  पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. हे विवरणपत्र कर्मचारी ऑनलाईन पाहू शकणार आहेत, असे वरिष्ठ उपमहालेखाकार यांनी कळविले आहे.

   विदर्भ आणि मराठवाडा विभागात कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी लेखा महालेखाकार-2 नागपूर कार्यालयामध्ये ठेवले जातात. त्यामुळे कर्मचा-यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लेख्यांचे वार्षिक विवरण महालेखाकार नागपूर-2 च्या <HTTP:// agmaha.cag.gov.in/GPFNagv1.asp या संकेतस्थळावर पाहू शकतात.

शासनाच्या 17 मे 2019 च्या अधिसूचनेनुसार सर्व कर्मचाऱ्यांनी मोबाईल क्रमांक या कार्यालयाच्या gpfmobileregister@gmail.com  या ई-मेल पत्यावर पाठवावा किंवा 9423441755 या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून नोंदणीकृत करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आपले नाव व जन्म तारीख भविष्य निर्वाह निधी विवरण पत्र तसेच सेवार्थ प्रणालीमध्ये तपासून घ्यावे, तफावत असल्यास आपले नाव व जन्म तारीख सेवार्थ प्रणालीमध्ये सुधारित करुन संबंधित आहरण व संवितरण अधिका-यामार्फत नाव व जन्म तारीख या कार्यालयाच्या अभिलेख्यामध्ये पडताळणी करुन घ्यावी. नाव, जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ आयडी सह gpftakrarngp@gmail.com वर ईमेल पाठवावा किंवा फॅक्स क्रमांक 0712-2560484 वर सूचित करण्याचे सूचित करण्यात आले आहे.   

*****
    

Tuesday 27 October 2020

                                    शालांत प्रमाणपत्र परीक्षा नोव्हें- डिसेंबरमध्ये

 नागपुर, दि. 27:- शालांत प्रमाणपत्र परीक्षा नोव्हेंबर - डिसेंबर 2020 च्या परीक्षेला बसणाऱ्या विज्ञान व तंत्रज्ञान, पूर्व व्यावसायिक विषयांची प्रात्यक्षिक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विषय योजनेतील कार्यानुभव विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत.

18 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा, तंत्र व पूर्व व्यावसायिक विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा, नवीन पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे.

      तसेच 7 ते 12 डिसेंबरदरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण, कार्यानुभवाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा होणार असली तरीही विद्यार्थी संख्येनुसार केंद्रांनी त्यांच्या स्तरावरुन आयोजित करावी, तसेच परीक्षार्थींना वेळोवेळी परीक्षेबाबतची माहिती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच परीक्षेशी संबंधित पत्रव्यवहार हा विनाविलंब करावा. पत्रव्यवहार व साहित्य पाठविण्यास विलंब झाल्यास विलंब शुल्क भरावे लागेल, अशा सूचना त्यांनी सर्व माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य निर्धारित दिनांकास मंडळ कार्यालयात जमा करण्याचे मुख्याध्यापकांना निर्देश विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहेत.  

 

नागपूर विभागातील प्रवेशपत्रांची संकलन केंद्रे

  नोव्हेंबर व डिसेंबर 2020 या कालावधीत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा 18 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र प्रात्यक्षिक परीक्षा या विषय गटातील लघुलेखन 18 नोव्हेंबर 2020 आणि 19 नोव्हेंबर या तारखेला आयोजित करण्यात येणार आहे.

लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय भंडारा, नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली, जिल्हा परिषद ज्युबिली कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नागभिड जिल्हा चंद्रपूर, नागपूर विभागीय मंडळ कार्यालय नागपूर, न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय वर्धा, शिवाजी विज्ञान महाविद्यालय गडचिरोली, धर्मराव विद्यालय आलापल्ली, हितकारणी विद्यालय आरमोरी आणि गुजराती नॅशनल कनिष्ठ महाविद्यालय  गोंदिया अशी प्रवेशपत्र संकलन केंद्र  आहेत.   

 परीक्षेचा कालावधी कमी असल्याने यावेळी प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा ऑऊट ऑफ टर्न ने आयोजित करता येणार नाही, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.   

00000

Monday 26 October 2020

 कोविडमुक्त झालेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचारांची सुविधा

                                                                                                -रविंद्र ठाकरे

 दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विभाग कार्यरत

 

      





    नागपूर, दि. 26 : कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असला तरी जिल्ह्यात या आजारातून ची बाधा होवून बऱ्या झालेल्या  रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या रुग्णांच्या आरोग्यविषयक तक्रारीचे निराकरण व त्यावरील उपचारासाठी दत्ता मेघे आयुर्वेदीक कॉलेज येथे सुरु झालेली ‘कोविड पश्चात पुनर्वसन बाह्यरुग्ण विभाग’ नागरिकांना सहाय्यभूत  ठरुन दिलासादायक ठरणार आहे. नागरिकांनी या वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी   ठाकरे यांनी आज येथे केले.

                वानाडोंगरी येथील दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी येथे उभारण्यात आलेल्या ‘कोविड पश्चात पुनर्वसन बाह्यरुग्ण विभागा’चे उद्घाटन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. दत्ता मेघे मेडिकल कॉलेज व शालिनीताई मेघे रुग्णालय व अनुसंधान केंद्रांचे कुलगुरु डॉ.दिलीप गोडे, दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीचे प्राचार्य सचिन चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.आर.सिंग यावेळी उपस्थित होते.                

श्री. ठाकरे म्हणाले, कोविड -19 मुळे आज सर्वांची जीवनशैली बदलली आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना बऱ्याचदा आरोग्य तक्रारी भेडसावतात. दीर्घकालीन खोकला, प्रचंड अशक्तपणा व यातून येणारे नैराश्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत या रुग्णांच्या आरोग्य तक्रारींवर उपचार व नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन, मानसिक रोग तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ या सर्वांचे एका छताखाली मार्गदर्शन रुग्णांना येथे मिळणार आहे. अतिदक्षता कक्षात राहिलेल्या रुग्णांना बरे झाल्यानंतर देखील अनेक शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागते. कोविड पश्चात करावयाचे उपचार यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहे. त्यानुसार येथे रुग्णांवर उपचार केले जातील. सामाजिक स्वास्थ्य कायम राखण्यास यामुळे नक्कीच मदत होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

                प्रास्ताविकेत श्री. गोडे म्हणाले, कोविडची बाधा होवून गेलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी चेस्ट स्पेशालिस्ट, जनरल फिजिशियन, आहारतज्ज्ञ, मानसिक रोग तज्ज्ञांची सेवा येथे घेण्यात आली आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार यादिवशी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत येथे रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. बरेचदा कोरोना विषाणूने बाधित झाल्यानंतर खोकला, धाप लागणे, थकवा, छातीत दुखणे, स्नायूंमध्ये वेदना, वजन कमी होणे, बहिरेपणा, अर्धांगवायूचा झटका, हृदयविकाराचा त्रास आदी शारीरिक तक्रारी उद् भवतात. तसेच निराशाजनक वाटणे, झोपण्याचा त्रास, अस्वस्थता अशी लक्षणे जाणवल्यास तात्काळ मनोचिकित्सकाचे उपचार मिळणे गरजेचे आहे. येथे रुग्णांना या  सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. याचा रुग्णांना नक्कीच लाभ होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

                डॉ. अजय लांजेवार, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रागिणी पाटील, जनरल फिजिशियन डॉ. विनायक शेगोकर तसेच दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी येथील डॉक्टर्स, परिचारिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

******

 दिव्यांग संशोधन समिती व राज्य सल्लागार मंडळ पुनर्गठनासाठी 28 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

 

            नागपूरदि.26 :  दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार दिव्यांगाबाबतचे राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग संशोधन समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. त्यासाठी दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत नामवंत व तज्ञ व्यक्तीदिव्यांग व्यक्ती व दिव्यांगाच्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांच्या नियुक्तीसाठी 28 ऑक्टोबरर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी अनिल किटे यांनी केले आहे.

राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग संशोधन समितीवर नियुक्तीकरीता प्रस्ताव सदस्यांची नावेपत्ताभ्रमणध्वनी क्रमांक तसेच संक्षिप्त थोडक्यात वैयक्तिक माहिती व उल्लेखनीय कामगिरीची माहितीसह तीन प्रतीमध्ये जिल्हा समाजकल्याण विभागजिल्हा परिषदनागपूर कार्यालयात स्वीकारण्यात येतील.

******

 सतर्क भारत समृध्द भारत’ अंतर्गत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह

 नागपूरदि.26 : भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्यासाठी सतर्क भारत-समृध्द भारत ही संकल्पना घेवून जिल्ह्यात 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह पाळण्यात येणार आहेअशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांनी दिली.

         केन्द्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहेत्या अनुषंगाने राज्य शासनाचे सर्व विभाग  त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख कार्यालयप्रमुखराज्य शासनाचे अंगीकृत उपक्रमसहकारी संस्थास्वायत्त संस्थामार्फत सप्ताहाचे आयोजन कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्याने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकान्वये सामाजिक अंतरमास्क वापरणे इत्यादी अटीचे पालन करून कार्यक्रम पार करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

त्यानुसार सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखराज्य शासनाचे अंगीकृत उपक्रमसहकारी संस्था स्वायत्त संस्थामार्फत २७ ऑक्टोबर रोजी ११ वाजता सर्व शासकीय कार्यालयामध्ये भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेण्यात येणार आहेशपथ घेतल्यानंतर राज्यपाल  मुख्यमंत्री महोदयांनी सप्ताहनिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येईल.

भ्रष्टाचाराविरुध्दच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेजनजागृतीनागरिकांना लाचेच्या तक्रारी देण्याविषयी आवाहन करणेभ्रष्टाचाराविरूध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपध्दती विषयीची माहिती पत्रकांचे वाटप करणेजिल्हयातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावरत्याचप्रमाणे मोक्याच्या विविध दर्शनी भागामध्ये स्टिकर  बॅनर्स लावले जाणार आहेतयाबरोबरच स्वयंसेवी संस्थाअशासकीय संघटनानागरिकांना दक्षता जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

*******