Friday 31 July 2020

कोविड-19 ची मृत्यू संख्या कमी करण्यावर भर -पालकमंत्री डॉ. नितीन राऊत







* लॉकडाऊन हा पर्याय नाही
    * स्मार्ट अक्शन प्लान तयार करा
* मेडिकलला मनुष्यबळ देणार
        नागपूर, दि. 31 : जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून कोविड-19ची साथ आटोक्यात आणण्यासाठी स्मार्ट अक्शन प्लान तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिल्या. शहरी व ग्रामीण भागात वाढलेली मृत्यू संख्या कमी करण्यावर भर देण्यात यावा असे सांगून डॉ. राऊत म्हणाले की, लॉकडाऊन हा पर्याय नसून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. 
            विभागीय आयुक्त कार्यालयात आज कोरोना आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला, माहिती संचालक हेमराज बागुल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर व डॉ. दीपक सेलोकर यावेळी उपस्थित होते. 
            रूग्णांची संख्या वाढत असल्याने अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. विशेषतः चतुर्थ श्रेणी कर्मचारी व सफाई कामगार मोठ्या प्रमाणात लागणार आहेत, असे डॉ. मित्रा यांनी सांगितले. या साथीच्या काळासाठी खासगी एजन्सीमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, असे पालकमंत्री म्हणाले. मात्र संबंधित एजन्सीकडे स्वच्छतेसाठी लागणारी साधनसामुग्री असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
            वैद्यकीय उपचारासाठी मेडिकलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. कोरोना विरुद्धच्या लढ्यात काही स्वयंसेवी संस्था स्वयंप्रेरणेने प्रशासनासोबत काम करण्यास तयार असून आजच्या बैठकीत याबाबत सादरीकरण करण्यात आले. फूड सोल्जर, कॉलसेंटर, पॅरामेडिकल व हेल्प डेस्क अशा स्वरूपाचा काम करण्याचा आराखडा स्वयंसेवी संस्थेने सादर केला. याला जोड म्हणून महावितरणकडे असलेल्या ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर कोरोना जनजागृती संदेश पाठविण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी केली. जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मदत घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. स्वयंसेवी संस्था व पोलीस विभाग समन्वयाने  याविषयी आराखडा देतील असे ते म्हणाले.
            या बैठकीनंतर विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत पालकमंत्र्यांची चर्चा झाली. उद्योग व्यवसाय नुकतेच रुळावर आले असून आता अर्थ चक्राला गती देण्याची वेळ असल्याचे पालकमंत्री म्हणाले. लॉकडाऊन हा पर्याय नसून प्रशासन मृत्यू संख्या कमी करणे व जनजागृती या विषयी काम करणार आहे. मात्र नागरिकांनी स्वयं शिस्त पाळावी हा आग्रह कायम राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले. लॉकडाऊन विषयी सोशल माध्यमात येणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले.
000

Wednesday 29 July 2020

इयत्ता बारावी परीक्षेच्या गुणपत्रिका, अभिलेख व इतर साहित्याचे वाटप





नागपूर, दि. 29:  फेब्रूवारी / मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या उच्च माध्यमिक परीक्षेच्या  गुणपत्रिका, अभिलेख व इतर साहित्य वितरण मंडळातर्फे जिल्हा, तालुका व दिनांकनिहाय करण्यात येणार आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू असल्यामुळे मंडळातर्फे ही व्यवस्था करण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना सोयीचे व्हावे, यासाठी दिनांक, जिल्हा, तालुका संकलन केंद्रावरुन  पुढीलप्रमाणे वितरण करण्यात येणार आहे. सर्व संबंधित महाविद्यालयातील प्रतिनिधींनी पुढीलप्रमाणे दिलेल्या नियोजनानुसार गुणपत्रिका, अभिलेख व इतर साहित्य स्वीकारावे, असे आवाहन  विभागीय मंडळाचे सचिव रविकांत देशपांडे यांनी केले आहे.
अ.     क्र.
वाटप/संकलन केंद्राचे नांव
कामाचे स्वरुप
1.
लाल बहादुर शास्त्री क.महा., भंडारा
दूरध्वनी क्र. 07184/252410
निकाल गुणपत्रिका, अभिलेख व इतर साहित्य वाटप (दि. 31/07/2020)(पवनी, लाखांदूर, तुमसर - 10.00 ते 02.00)
(भंडारा, लाखनी, मोहाडी - 02.00 ते 05.00)
2.
नंदलाल पाटील कापगते विद्यालय, साकोली, जि. भंडारा
दूरध्वनी क्र.9421811336
निकाल गुणपत्रिका, अभिलेख व इतर साहित्य वाटप (दि. 31/07/2020)
(देवरी, मोरगाव अर्जुनी - 10.00 ते 02.00)
(साकोली, सडक अर्जुनी - 02.00 ते 05.00)
3.
गुजराती नॅशनल क. महा., गोंदिया
दूरध्वनी क्र. 07182/252337
निकाल गुणपत्रिका, अभिलेख व इतर साहित्य वाटप (दि. 31/07/2020)(सालेकसा, आमगाव, तिरोडा - 10.00 ते 02.00)
(गोंदिया, गोरेगाव - 02.00 ते 05.00)
4.
जि.प. ज्युबिली क. महा., चंद्रपूर
दूरध्वनी क्र. 07172/252988
निकाल गुणपत्रिका, अभिलेख व इतर साहित्य वाटप (दि. 31/07/2020)(जिवती, मूल, सावली, कोरपना, वरोरा, गोंडपिपरी - 10.00 ते 02.00)(बल्लारशाह, भद्रावती, पोंभूर्णा, राजूरा, चंद्रपूर -02.00 ते 05.00)
5.
जनता विद्यालय व क. महा., नागभिड, जि. चंद्रपूर
दूरध्वनी क्र. 9923719803
निकाल गुणपत्रिका, अभिलेख व इतर साहित्य वाटप (दि. 31/07/2020)
(नागभीड, सिंदेवाही, चिमूर, ब्रम्हपूरी - 10.00 ते 05.00)
6.
न्यू इंग्लीश क. महा., वर्धा
दूरध्वनी क्र. 07152/243204
निकाल गुणपत्रिका, अभिलेख व इतर साहित्य वाटप (दि. 31/07/2020)(आष्टी, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, कारंजा घा. 10.00 ते 02.00)(वर्धा, सेलू, देवळी - 02.00 ते 05.00)
7.
शिवाजी हायस्कूल, गोकुल नगर, गडचिरोली
दूरध्वनी क्र. 9423321234
निकाल गुणपत्रिका, अभिलेख व इतर साहित्य वाटप (दि. 31/07/2020)(धानोरा, चामोर्शी, गडचिरोली  - 10.00 ते 05.00)
8.
धर्मराव विद्यालय आलापल्ली, जि. गडचिरोलीदूरध्वनी क्र. 9421878191, 9421735087
निकाल गुणपत्रिका, अभिलेख व इतर साहित्य वाटप (दि. 31/07/2020)
(अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा -10.00 ते 05.00)
9.
हितकारीणी विद्यालय, आरमोरी,
जि. गडचिरोली
दूरध्वनी क्र. 9421818343
निकाल गुणपत्रिका, अभिलेख व इतर साहित्य वाटप (दि. 31/07/2020)(आरमोरी, देसाईगंज, कोरची, कुरखेडा - 10.00 ते 05.00)
10.
नागपूर विभागीय मंडळ,
नागपूर (शहर)
दूरध्वनी क्र. 0712/2553360
निकाल गुणपत्रिका, अभिलेख व इतर साहित्य वाटप (दि. 31/07/2020)(06.01.001 ते 06.01.125 - 10.00 ते 02.00)
(06.01.126 ते 06.01.232 - 02.00 ते 05.00)
नागपूर (ग्रामीण)
निकाल गुणपत्रिका, अभिलेख व इतर साहित्य वाटप (दि. 30/07/2020)(नरखेड, काटोल, रामटेक, पारशिवनी, भिवापूर, उमरेड, कुही - 10.00 ते 02.00)(नागपूर ग्रामीण, हिंगणा, कळमेश्वर, कामठी, मौदा, सावनेर - 02.00 ते 05.00)

गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करा


प्र. प. क्र. 481                                                                दिनांक: 29 जुलै 2020


नागपूर, दि. 29 :  इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर यापूर्वी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती प्राप्त करुन घेण्यासाठी विद्यार्थी यापूर्वी स्वत: मंडळाकडे जाऊन अर्ज सादर करीत होते. परंतु सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना  विभागीय मंडळामध्ये जाणे गैरसोयीचे आहे.  तसेच  या अनुषंगाने मंडळामध्ये गर्दी टाळणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांना यावेळी गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती ऑनलाईन अर्ज सादर करुन मिळतील.
                  ऑनलाईन प्रक्रिया उद्या दिनांक 30 जुलैपासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तपत्रिकेच्या छायांकित प्रती व पुनर्मूल्यांकन यासाठी अर्ज करण्यासाठी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी  साठी http://http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावे. यासाठी भरावयाचे विहित शुल्क, अटी, शर्ती व सूचना मंडळाच्या http://http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या प्रक्रियेसाठी विहित शुल्क Debit Card, Credit Card, UPI, Net Banking याद्वारेच ऑनलाईन भरावयाचे आहे.
                  मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
*****

Monday 27 July 2020

शेतकऱ्यांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा पालकमंत्री सुनील केदार यांचे बँक अधिकाऱ्यांना निर्देश



     
            नागपूर, दि. 27 :  जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी  लवकर पेरणी  झाली आहे.  मात्र अद्यापही जिल्ह्यातील बँकांनी शेतक-यांना पीककर्ज वाटप पूर्ण केले नसूनत्‍यांना ते तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी बँकांच्या वरिष्ठ अधिका-यांना दिलेत.
       विभागीय आयुक्त कार्यालयात वर्धा जिल्ह्यातील शेतक-यांच्या पीककर्ज व पीकविमा आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमारजिल्हाधिकारी विवेक भिमनवारजिल्हा उपनिबंधक गौतम वालदे व विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  
            आतापर्यंत दिलेल्या उद्द्ष्टिानुसार बँकांनी शेतक-यांना पीककर्ज वाटप केले नसल्यामुळे पालकमंत्री केदार यांनी नाराजी व्यक्त करतपीककर्ज वाटपाची प्रक्रिया गतिमान करण्याचे सांगूनप्रलंबित अर्जांवर तात्काळ कार्यवाही करुन जास्तीत-जास्त पात्र शेतक-यांना पीककर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या. तसेच पीककर्जासाठी अपात्र ठरलेल्या शेतक-यांच्या शाखानिहाय याद्या तात्काळ उपलब्ध करुन देत त्याची कारणे स्पष्ट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
            प्रधानमंत्री पीकविमा काढण्यासाठी  शेतक-यांचे प्रबोधन करावे. येत्या सोमवारी पीककर्ज आणि पीकविम्याचा आढावा जाणार आहे. जिल्ह्यात अचानक नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास पिकांचे प्रचंड नुकसान होईल. परिणामी पुन्हा राज्य शासनालाच शेतक-यांना मदत करावी लागेल. त्यामुळे बँकांनी 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा काढण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश दिले.  
            शेतकऱ्यांना पीककर्ज व पीकविमा काढण्यासाठी ग्रामीण भागात तहसीलदारमंडळ अधिकारीतलाठी आणि सखी यांची नोडल एजन्सी नेमली असून बँकांनी त्यांच्यासोबत समन्वय साधत लक्ष्य पूर्ण करावे. तसेच बँकांनी पात्र व अपात्र शेतक-यांची यादीही देण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत जिल्ह्यातील एकाही बँकेने पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
       शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपामध्ये अडचणी येत असल्यास बँक अधिका-यांनी थेट जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्याशी संपर्क साधण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केदार यांनी दिले. गतवर्षी जिल्ह्यातील 38 हजार शेतक-यांनी पीकविमा काढला होता. यावर्षी तो ऐच्छिक असल्यामुळे आतापर्यंत फक्त तीन हजार शेतकऱ्यांीच विमा काढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांशी संपर्क साधून  त्यांना पीकविमा काढण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना श्री. केदार यांनी केल्या.   
*****  

मंत्री विजय वडेट्टीवार यांचा विद्यार्थ्यांना दिलासा शिष्यवृत्ती कारणाखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश-मंत्री वडेट्टीवार रद्द होणार नाही


                                                                                                -

विविध शैक्षणिक संस्थाना शासनाकडून देय असलेल्या शिष्यवृत्ती 
न मिळाल्याच्या कारणाखाली विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करू नये
वडेट्टीवार यांचा शैक्षणिक संस्थाना आदेश

        नागपूर, दि. 27 : कोविड  विषाणूच्या संसर्गामुळे उदभवलेल्या  परिस्थितीत राज्यातील  विजाभजविमाप्रइमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्याची सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील किंवा तत्पूर्वीची शैक्षणिक संस्थांना देय असलेली शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त आहे या सबबीखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये त्याचप्रमाणे विद्यार्थ्याना आवश्यक असलेले सर्व दाखलेप्रमाणपत्रव आवश्यक दस्तावेज त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे असे आदेश मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून मॅट्रीकोत्तर शिक्षण देणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थाना देण्यात आले आहे.
            मंत्री वडेट्टीवार यांनी याबाबतचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करावा अशा सूचना संबंधित विभागाला दिले त्यानुसार इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
            मार्च 2020 पासून जगासह राज्यात कोविड-19 या विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यातील उद्योगधंदे तसेच राज्याच्या महसुलात भर टाकणारे उत्पनाचे स्रोत ठप्प झाल्यामुळे राज्याच्या महसुलात कमालीची घट झाली आहे. या पार्शवभूमीवर  विजाभजविमाप्र, इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्याची सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक संस्थाना  देय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करणे  शासनाला शक्य झाले नाही.
            विद्यार्थ्याची अनुज्ञेय शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त असल्याच्या सबबीखाली काही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करत  आहे  तसेच विद्यार्थ्याना शैक्षणिक संस्था सोडल्याचा दाखला देण्याचे नाकारत आहे. ही बाब मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आली तेव्हा तातडीने त्यांनी  शिष्यवृत्ती  अप्राप्त असल्याच्या कारणाखाली विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द न करण्याचे आदेश मॅट्रीकोत्तर शिक्षण देणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थाना  दिले आहेत. याबाबत आज  इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे.         
*****