Sunday 31 March 2019

मंगळवारपासून मतदानासाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्रांची सज्जता








विधानसभानिहाय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला प्रत्यक्ष आढावा

नागपूरदि.31 :  विधानसभा संघनिहाय मतदानासाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम मशिन तसेच व्हीव्हीपॅट यंत्र ठेवण्यासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुमची सुरक्षितता तसेच मतदानासाठी मतपत्रिका लावून यंत्र सज्ज ठेवण्यासाठी राजकीय पक्षांच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आवश्यक तयारी करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिलेत.
 लोकसभेसाठी नागपूर व रामटेक मतदारसंघात घेण्यात येणाऱ्या मतदानाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. अश्विन मुदगल यांनी विधानसभा मतदार संघनिहाय तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुमसह मतदानासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राचे वाटप तसेच मतदानानंतर स्विकारण्यासाठी करावयाच्या व्यवस्थेची पाहणी करुन कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक सूचना केल्यात.

उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघासाठी उर्सूला गर्ल्स हायस्कूल येथे मतदान संदर्भातील संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असून स्ट्राँग रुममध्ये विशेष सुरक्षेत मतदान यंत्र ठेवण्यात आले आहेत. मतदानासाठी नियुक्त करण्यात  आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून बचत भवन येथे झोनल अधिकारी व सहाय्यक झोनल अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येत  आहे. उत्तर, पश्चिम व पूर्व विधानसभा मतदार संघात राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमोर मतदार यंत्र सज्ज ठेवण्याच्या प्रक्रियेला दिनांक 2 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. मतदान यंत्रावर उमेदवारांचे छायाचित्र असलेली मतपत्रिका राहणार असून व्हीव्हीपॅटवर सुद्धा त्यानुसार माहिती अपलोड करण्याला सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया 4 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येत तसेच इतर तीन मतदारसंघात दिनांक 5 एप्रिल ते 7 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करुन मतदानासाठी मतदान यंत्र सज्ज राहणार आहे. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमोरच सज्ज असलेल्या मतदान यंत्रांपैकी मॉक पोल घेऊन मतदान प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असल्याची खात्री  करुन देण्यात येणार आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रासह आवश्यक सर्व फॉर्मसह माहिती उपलब्ध करुन देण्यात असून मतदानासाठी मतदान केंद्रनिहाय पथके तयार करण्यात येऊन त्यांना आवश्यक सूचना देण्यात येणार आहे. या व्यवस्थेचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी आज घेतला. पूर्व मतदारसंघासाठी ईश्वर देशमुख महाविद्यालय, दक्षिण मतदारसंघासाठी बचत भवन, दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी कुर्वेज मॉडेल स्कूल तसेच ग्रामीण पोलीस मुख्यालय तसेच हैद्राबाद हाऊस येथे निवडणूक विषयात साहित्याचा पुरवठा तयार करण्यासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या पक्षाची पाहणी जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी केली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा उपस्थित होत्या. विधानसभा मतदारसंघनिहाय करण्यात आलेले व्यवस्थेसंदर्भात सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती सुजाता गंधे, व्ही.व्ही.जोशी, ज्ञानेश भट्ट, जगदिश काकर, शिरीष पांडे, श्रीमती शितल देशमुख यांनी दिली.
******

निवडणूक चिन्हांवर डिजिटल साधनांचा प्रभाव

198 मुक्त चिन्हं उमेदवारांना उपलब्ध
मुंबईदि. 31 :  लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये (सिम्बॉल्स) यंदा  दुपटीनहून अधिक वाढ करण्यात आली आहे. 198 निवडणूक चिन्हे मुक्त चिन्हे’ (फ्री सिम्बॉल्स) घोषित करण्यात आली असून त्यावर डिजिटल साधनांचा प्रभाव दिसून येतो.

राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांची चिन्हे राखीव आहेत. 2014 च्या निवडणुकांमध्ये 87 मुक्त चिन्हे होती. त्यापैकी काही चिन्हे वगळून आणि नव्याने समावेश करुन यावर्षी198 मुक्त चिन्हे निवडण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन दिली आहेत. यामधून उमेदवारांना चिन्हाची मागणी करता येणार आहे. निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, 1968 नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना विहीत पद्धतीने चिन्हांचे वाटप केले जाते.

दैनंदिन वापरातील वस्तूव्यक्तिगत साधनेदळणवळणाची साधनेफळेभाज्यास्वयंपाकघरातील वस्तूखेळकृषी क्षेत्रबांधकाम क्षेत्रअत्याधुनिक संगणक युगातील साधने आदी विविध क्षेत्रातील साधनांचा मुक्त चिन्हांमध्ये समावेश करुन आयोगाने सर्वसमावेशकता जपली आहे.

मुक्त चिन्हांमध्ये नव्या- जुन्याचा मिलाफ
जुन्या काळातील वाळूचे घड्याळदळणाचे जातेउखळनरसाळेधान्य पाखडण्याचे सूपग्रामोफोनटाईपरायटरडिझेल पंप ते आधुनिक काळातील लॅपटॉप,कॉम्प्युटरचा माऊससीसीटीव्ही कॅमेरापेनड्राईव्हरोबोटहेडफोन अशा नव्या-जुन्याचा संगम या मुक्त चिन्हांमध्ये करण्यात आला आहे.

व्यक्तिगत वापराच्या वस्तूंना स्थान
आपल्याला सकाळी उठल्यापर्यंत लागणाऱ्या टूथब्रशटूथपेस्ट पासून ते रेझरसाबणदानीचप्पलबूटमोजेउशी आदी व्यक्तिगत वापराच्या वस्तूंनाही चिन्हांमध्ये स्थान मिळाले आहे.

हेल्मेटद्वारे सुरक्षेचा संदेश
मुक्त चिन्हांमध्ये हेल्मेटचा समावेश करुन आयोगाने एक प्रकारे दुचाकी चालकाच्या जिवीताच्या रक्षणासाठी संदेशच दिला आहे.

शेती आणि शेतकऱ्याला मान देणारी चिन्हे
या चिन्हांमध्ये ऊस शेतकरी (गन्ना किसान)नारळाची बागडिजेल पंपट्रॅक्टर चालविणारा शेतकरीशेतीच्या मशागतीसाठीचे टीलरविहीर अशा चिन्हांचा समावेश करुन असून एकप्रकारे शेतीचे महत्त्व लक्षात घेतले आहे.

स्वयंपाकघरच अवतरले
गॅस सिलेंडरगॅस शेगडीरेफ्रीजरेटरमिक्सर, प्रेशर कुकरहंडीकढईतळण्याची कढई (फ्राईंग पॅन)काचेचा ग्लासट्रेकपबशीचहाची गाळणीउखळ आणि खलबत्ता,शिमला मिर्चीफूलकोबीहिरवी मिरचीभेंडीआलेमटारफळांची टोपलीसफरचंदद्राक्षेनासपती (पीअर्स)फणसअननसअक्रोडबिस्कीटब्रेडकेक आदींच्या रुपात मुक्त चिन्हे ठरविताना आयोगाने स्वयंपाकघराला मान दिला आहे.

यासोबत रिक्षाट्रकहेलिकॉप्टरजहाज अशी रस्ते तसेच जलवाहतुकीची साधनेविटाथापीकरवतकडीकुलपाची चावी असे बांधकाम साहित्यबॅटबुद्धीबळ पट,कॅरम बोर्डफूटबॉलल्युडोस्टम्पहॉकी स्टीक आणि बॉलटेनिस रॅकेट आणि बॉल अशी खेळांची साधने तसेच क्रिकेट फलंदाजफूटबॉल खेळाडूमोत्यांचा हारहिरा,अंगठी असे मौल्यवान दागिनेहार्मोनियमसितारव्हायोलीन अशी संगीताची साधने यांच्यासोबतच अनेक विविध क्षेत्रातील चिन्हेही मुक्त चिन्हांमध्ये समाविष्ट आहेत.

Saturday 30 March 2019

पृथ्वीराज देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल


मुंबईदि. 30 : सांगली लोकसभा मतदार संघात पृथ्वीराज (बाबा) सयाजीराव देशमुख यांनी जाहीर सभेत केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने दाखल तक्रारीची शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि.1860 चे कलम 171 आणि 171 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहेअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
सांगली लोकसभा मतदार संघांतर्गत मिरज विधानसभा मतदार संघात दि. 27 मार्च रोजी आणि पलूस-कडेगाव मतदार संघात 28 मार्च 2019 रोजी पृथ्वीराज देशमुख यांनी केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने आयोगाकडे तक्रार केली गेली होती. तक्रारीची शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध मिरज पोलीस ठाणे आणि भिलवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही कार्यालयाने कळविले आहे.
0000

लोकसभा निवडणूक मतदानादिवशी सुट्टी जाहीर


           नागपूर, दि. 30:  लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी कामासाठी आपल्या लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कर्मचाऱ्यांनाही लागू असेल. राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच अकृषी, कृषी आणि अन्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, शिक्षण संस्था आदींनाही ही अधीसूचना लागू राहील.

            पहिल्या टप्प्यात गुरुवार, दि. 11 एप्रिल 2019  रोजी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली - चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असून त्यादिवशी संबंधित मतदार संघात सार्वजनिक सुट्टी राहील. 

व्हीव्हीपॅटमुळे मतदान अधिक पारदर्शक - अश्विन मुदगल











                                                                

                            
            नागपूर दि.30,  मतदानासाठी वापरण्यात येणारे व्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे अत्यंत सुरक्षित आहे.  मतदारांना आपल्या मतासंदर्भात सेकंदापर्यंत पाहण्याची सुविधा व्हीव्हीपॅटमुळे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिली.
            वनामती येथे आयोजित केलेल्या माध्यम संवाद कार्यक्रमात संपादकांशी जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल बोलत होते.
            यावेळी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्यायरामटेक लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके,पोलिस अधीक्षक राकेश ओलाविशेष शाखेच्या उपायुक्त निर्मलादेवी एस., उपनिवडणूक निर्णय अधिकारी राजलक्ष्मी शहातहसीलदार प्रताप वाघमारे आदी उपस्थित होते.
         नागपूर जिल्ह्यात व्हीव्हीपॅटचा प्रथमच वापर करण्यात येत असूनदोन्ही उपकरणांमध्ये तंत्रज्ञानतांत्रिक सुरक्षितता आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडून होणारा सुरक्षित वापर याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांनी माहिती दिली. ही उपकरणे कोणत्याही इतर उपकरणांना जोडता येत नाहीत. त्यामुळे मतदानासाठी वापरण्यात येणारे व्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे अत्यंत सुरक्षित आहे.  यामध्ये कोणालाही हस्तक्षेप वा छेडछाड करता ये नाही तसेच व्हीव्हीपॅटला कोणीही हॅक करु शकत नाहीव्हीव्हीपॅटमुळे मतदाराने केलेले मतदान प्रत्यक्ष स्क्रीनवर सेकंदापर्यंत पाहण्याची सोय असल्याची माहिती त्यांनी दिली.
            यावेळी संपादकांनी व्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक मतदान करण्याचा अनुभव घेतला. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी संपादकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
******

  

पाळीव प्राणी विपणन केंद्रांची नोंदणी करणे बंधनकारक


नागपूर दि. 30, जिल्ह्यातील पाळीव प्राणी दुकाने, प्रजनन आणि विपणन केंद्रांची नोंदणी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे करणे बंधनकारक असून, यासंबंधीत व्यावसायिकांनी याबाबतचा परिपूर्ण अर्ज तालुकास्तरावर पशुधन विकास अधिकारी (विस्तार) संबंधीत पंचायत समिती तर नागपूर शहरासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, सेमिनरी हिल्स यांच्याकडे सोपविण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलीक यांनी केले आहे.  
 ******

केवळ एक रुपयात पाळीव प्राण्यांसाठी तोंडखुरी व पायखुरी प्रतिबंधात्मक लसीकरण 21 मेपर्यंत


नागपूर दि. 30, राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात तोंडखुरी व पायखुरी आजार झालेल्या पाळीव प्राण्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी 21 मेपर्यंत जिल्ह्यात केवळ एक रुपयात प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिली आहे.
 लसीकरण मोहिमेची ही 14 वी फेरी असून, वर्षातून दोन वेळा पाळीव प्राण्यांचे लसीकरण केले जाते. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांना लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी नजिकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात वरील लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
                                ******

Friday 29 March 2019

मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास मतमोजणी दिवशी मद्यविक्रीस मनाई


निवडणूक विशेष वृत्त -
मुंबई, दि. 29 : लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी मदयविक्री करण्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 135(सी) नुसार मनाई करण्यात आली आहे. हे दिवस 'कोरडा दिवस' म्हणून संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.
निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भर वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधित मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येते. तसेच मतदानापूर्वीचे 48 तास आणि मतमोजणीच्या दिवसाचे 24 तास मद्यविक्री करण्यात येणारी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने यांना हा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल. आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
            तीन दिवस कोरडा दिवस म्हणून जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधी अधिनियम, 1951 च्या कलम 135(सी) अन्वये तरतूद करण्यात आली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी ४८ मतदारसंघामध्ये एकूण टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी 7 मतदारसंघासाठी, दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी 10 मतदारसंघासाठी, दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी 14 मतदारसंघासाठी आणि 29 एप्रिल 2019 रोजी 17 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मतमोजणी 23 मे 2019 रोजी होणार आहे.
००००

उमेदवारांचे भवितव्य सीलबंद करणारी कामगिरी ‘लाख’ मोलाची


निवडणूक विशेष वृत्त -
- लाखेच्या सहा लाख कांड्‌या आणि चार लाख मेणबत्यांचा वापर
मुंबई, दि. 29 : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात सील होईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, त्याचे कंट्रोल युनिट आणि यंदा वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट यंत्रासह इतर सामग्री सीलबंद ठेवण्याची लाखमोलाची कामगिरी बजावायला लाखेचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी 6 नग या प्रमाणे लाखेचे 6 लाख 81 हजार नग कांडी लागणार आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वापरण्याची निवडणूक काळातील पहिलीच वेळ असावी.
जप्ती असो अथवा कागदपत्रे, पुरावे सीलबंद करायचे असो शासकीय कारवाईत लाखेची लालभडक मोहोर महत्त्वाची ठरते. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानानंतर मतदान यंत्रे व त्याच्याशी निगडित साहित्य मतमोजणीपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी ती सीलबंद केली जातात. त्यासाठी मोलाची कामगिरी लाखेकडून बजावण्यात येते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट, व्ही व्ही पॅट यंत्र, मतदारांची नावे व स्वाक्षरी असलेली यादी आदी साहित्य मतदानाची वेळ संपल्यानंतर सीलबंद केली जाते. मतमोजणीच्या दिवशी हे सील काढले जाते.
            यापूर्वी कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान होत असल्यामुळे मतपेटी व इतर साहित्य सीलबंद केली जात. मात्र, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आल्यानंतर या यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट, व्हीव्ही पॅट यंत्र यांनाही सील केले जाते. मतदान यंत्रे व इतर अनुषंगिक साहित्य सीलबंद करण्याची कामगिरी ही मतदान प्रक्रियेतील ही सर्वात मोठी जबाबदारी असते.  हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी आऊटर पेपर, ग्रीन पेपर व व्हीव्हीपॅटसाठी पिंक पेपरचा वापर केला जातो. त्यावर लाख लावून सिलबंद केले जाते. यासाठी यंदा प्रत्येक मतदान केंद्रासाठी 6 नग या प्रमाणे राज्यासाठी 6 लाख 81 हजार 800 नग लाख  मागविण्यात आले आहेत. भारतीय सुरक्षा मुद्रणालयाकडून ही लाख केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राज्याकडे पाठविण्यात येते.
ही लाख वितळवून मतदान यंत्रे सिलबंद केली जातात. ती वितळविण्यासाठीची मेणबत्ती निवडणूक आयोगाकडून पुरविली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वितळविण्यासाठी सुमारे 4 लाख 55 हजार मेणबत्त्यांची मागणी राज्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबरोबर कागदे, पेन्सिल, खोडरबर, शाई आदी साहित्य मोठ्या प्रमाणात मागविण्यात आले आहेत.
पुढील पाच वर्षासाठी लोकप्रतिनिधी कोण होणार याचे भवितव्य या मतदान यंत्रात सुरक्षितपणे ठेवण्यासाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत या लाखेला मोठे मोल आहे.
००००

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी 12 सदिच्छादुतांचे आवाहन















निवडणूक विशेष वृत्त -


मुंबई, दि. 29 :  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावामतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कलाक्रीडासाहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध 12 मान्यवरांची सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. समाज माध्यमेमुद्रितमाध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलक, भित्तीपत्रकादवारे हे सदिच्छादूत  लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

या सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण सन्मानित अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक पदमश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. निशिगंधा वाड, राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते पद्माकर कांबळे, खेळाडू राही सरनोबत, वीरधवल खाडे, नेत्रशल्यचिकित्सक डॉ.तात्याराव लहाने, डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे, माजी सनदी अधिकारी ए.एम. खान यांनी सदिच्छादूतम्हणून काम करुन मतदान जागृतीचे आवाहन केले होते. 
००००

Thursday 28 March 2019

नागपूर लोकसभा मतदार संघात 30 उमेदवार निवडणूक रिंगणात



  3 उमेदवारी अर्ज मागे
नागपूर, दि. 28: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 10-नागपूर मतदार संघात 30 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 3 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले असून 6 उमेदवारी अर्ज अवैघ ठरले आहेत.
अ.क्र.
उमेदवारांचे नांव
पक्षांचे नाव
चिन्ह
1
नाना पटोले
इंडियन नॅशनल काँग्रेस
हात
2
नितीन जयराम गडकरी
भारतीय जनता पार्टी
कमळ
3
मोहम्मद जमाल  
बहुजन समाज पार्टी
हत्ती
4
अली अशफाक अहमद
बहुजन मुक्ती पार्टी
खाट
5
 आसीम अली 
मायनॉरीटीज डेमोक्रेटीक पार्टी
क्रेन
6
गोपालकुमार गणेशु कश्यप
छत्तीसगड स्वाभिमान मंच
काचेचा पेला
7
दिक्षीता आनंद टेंभूर्णे
देश जनहित पार्टी
ल्युडो
8
डॉ. मनीषा बांगर
पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक)
फळा
9
मनोहर उर्फ सागर पुंडलीकराव डबरासे
वंचित बहुजन आघाडी
कपबशी
10
ॲड (डॉ) माने सुरेश 
बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी
एअरकंडिशनर
11
कॉम्रेड योगेश कृष्णराव ठाकरे
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एम.एल.) रेड स्टार
करवत
12
वनिता जितेंद्र राऊत
अखिल भारतीय मानवता पक्ष
पेनाची नीब सात किरणांसह
13
ॲड.  विजया दिलीप बागडे
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
कोट
14
विठ्ठल नानाजी गायकवाड
हम भारतीय पार्टी
ऊस शेतकरी
15
डॉ.विनोद काशिराम बडोले
अखिल भारतीय सर्वधर्म समाज पार्टी
बॅट
16
साहिल बालचंद तुरकर
भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टी
बिस्कीट
17
श्रीधर नारायण साळवे
राष्ट्रीय जनसंभावना पार्टी
फुलकोबी
18
उदय रामभाऊजी बोरकर
अपक्ष
पेन स्टँड
19
ॲड. उल्हास शालिकराम दुपारे
अपक्ष
कपाट
20
कार्तिक गेंदलाल डोके
अपक्ष
तुतारी
21
दिपक लक्ष्मणराव मस्के
अपक्ष
हेलीकॉप्टर
22
प्रफुल्ल माणिकचंद भांगे
अपक्ष
हेल्मेट
23
प्रभाकर कृष्णाजी सातपैसे
अपक्ष
पाण्याची टाकी
24
मनोज कोठुजी बावणे
अपक्ष
फुटबॉल
25
रुबेन डॉमनीक फ्रांसीस
अपक्ष
ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी
26
सचिन जागोराव पाटील
अपक्ष
सीसीटीव्ही कॅमेरा
27
सचिन हरीदास सोमकुंवर
अपक्ष
संगणक
28
सतिश विठ्ठल निखार
अपक्ष
रबर स्टॅम्प
29
सिद्धार्थ आसाराम कुर्वे
अपक्ष
लॅपटॉप
30
सुनिल सुर्यभान कवाडे
अपक्ष
रोड रोलर
*******