Friday 31 August 2018

महाराष्ट्रात सुरु होणार ११ नवीन पासपोर्ट सेवा केद्र - डॉ. ज्ञानेश्वर मुळे


नवी दिल्ली, ३१: ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली. या नवीन केंद्रांसह राज्यात पासपोर्ट सेवा केंद्रांची एकूण संख्या ३६ होणार आहे .    
 नागरिकांना त्यांच्या जिल्हयातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’या कार्यक्रमांतर्गत पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात २८९ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला.टप्याटप्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असूनदेशभरात आतापर्यंत  २१८ पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार देशभरात ८७नवीनपासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत  पैकी महाराष्ट्रात ११ नवे केंद्र उभारण्यात येणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.
   पहिल्या तीन टप्प्यात महाराष्ट्रात २५ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली  होती यापैकी आतापर्यंत १४  नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. तर  ४ सप्टेंबर २०१८ रोजी बारामती येथे नवीन केंद्राची सुरुवात होणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले. पहिल्या तीन टप्प्यातील २५ आणि चौथ्या टप्प्यातील ११ असे एकूण ३६ पासपोर्ट सेवा केंद्र राज्यात उभारली जाणार आहेत असेही ते म्हणाले.  
अशी आहेत ११ नवीन पास पोर्ट सेवा केंद्र
            राज्यात भंडारा, गडचिरोली, रामटेक, बुलडाणा, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, धुळे, रावेर, रायगड आणि भिवंडी याठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा क्रेंद्र उभारण्यात येणार आहेत.
            गेल्या दीड वर्षात १४ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात आली. यामध्ये वर्धा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, सांगली, कोल्हापूर, सातारा, घाटकोपर-विक्रोळी,  पिंपरी-चिंचवड, पंढरपूर, नांदेड,सिंधुदुर्ग या शहरांचा समावेश आहे. या नवीन केंद्रांद्वारे पासपोर्ट वितरणाचे कार्यही सुरु झाले आहे. 
बारामती येथे ४ सप्टेंबर रोजी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असून यानंतर अकोला,अमरावती, चंद्रपूर, डोंबिवली, लातूर, माढा, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, नवी मुंबई, पनवेल याठिकाणी  पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याच्या दिशेने कामांस सुरुवात होणार आहे.       

0000

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी अर्ज आमंत्रित

नागपूर, दि. 31 : अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरु करण्यात आल्या असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये नवीन विहीरी खोदण्यासाठी 2.50 लक्ष रुपये, विद्युत पंप बसविण्यासाठी 20 हजार रुपये, विज जोडणीकरिता 10 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. जुनी विहीर दुरुस्ती 50 हजार, इनवेल बोअरिंग 20 हजार, शेततळ्यात प्लास्टिक अस्तिरीकरणासाठी 1 लक्ष रुपये, ठिंबक सिचन संचाकरिता 50 हजार व तुषार सिंचनाकरिता 25 हजार रुपये अनुदान प्राप्त होईल.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेद्वारे अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना परसबाग 500 रुपये, पीव्हीसी पाईपाकरिता 30 हजार मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये समाविष्ट बाबींचा देखील शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.
अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी व अनुसूचित जमातीचे शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सक्षम प्राधिकाऱ्यांचे जात प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीकरिता जाती वैधता प्रमाणपत्र, सातबारा, 8 अ नकाशा, लाभधारकाचे स्वत:चे आधार कार्डशी जोडलेल्या बॅंक खात्याची माहिती, दारिद्य रेषेखालील किंवा 1 लक्ष 50 हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेला शेतकरी योजनेकरिता अर्ज सादर करु शकतो. शेतकऱ्यांनी www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने किंवा कृषी अधिकारी पंचायत समिती कामठी या कार्यालयास प्रत्यक्ष दिनांक, 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करु शकता, अशी माहिती कामठीचे पंचायत समिती गट विकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*****

आजपासून मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण अभियान

नागपूर, दि. 31 : राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात या अभियानाची सुरुवात शनिवार 1 सप्टेंबरपासून करण्यात येत आहे. दिनांक, 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर दरम्यान मतदार यादीत नाव नोंदणी करण्यापासून ते विविध प्रकारच्या दुरुस्ती करण्याची मतदारांना संधी राहील.
 मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण अभियानांतर्गत 1 जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना देखील नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करता येईल. याशिवाय नावात दुरुस्ती, पत्त्यात बदल, दुबार नावे, स्थलांतरीत झालेल्या मतदारांना दुरुस्ती करण्याची संधी देण्यात येणार आहे. दिनांक 1 सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र, मतदार मदत केंद्र, संबंधित विधानसभा मतदार संघातील कार्यालय, विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात मतदारांना आवश्यक फार्म नंबर 6, 6अ, 7, 8, 8 अ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
केंद्र निवडणूक आयोगाच्या ‘एकही मतदार वंचित राहू नये’ या घोषवाक्यासह सुरु करण्यात विशेष मतदार नोंदणी अभियानाचा जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
*****

जिल्हा पुरस्कारासाठी यशस्वी उद्योजकांकडून अर्ज आमंत्रित

नागपूर, दि. 31 : उद्योजकांमध्ये जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी, त्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी शासनाच्या वतीने यशस्वी उद्योजकांना जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यशस्वी उद्योजक सन 2018 च्या जिल्हा पुरस्कारासाठी दिनांक, 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करू शकतील.
यशस्वी उद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी स्थायी नोंदणी (एम एस एम ई-) असलेले, वित्तीय संस्थांचे थकबाकीदार नसलेले तसेच सलग 2 वर्षे उत्पादनात असलेल्या लघु उद्योजकांना पात्र मानण्यात येईल.
सन 2018 करिता लघु उद्योजक पुरस्कारासाठी अर्ज सादर करताना एन्टरप्रेन्युअर मेमोरंडम पार्ट 2 मेमोरंडम उद्योग आधार मेमोरंडम स्विकृत केल्याच्या एक्नॉलेजमेंटची संपूर्ण प्रत, मागील 3 वर्षातील ताळेबंद, बँकेचे-वित्तीय संस्थांचे थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. लघु उद्योजकास यापूर्वी जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झालेला नसावा. अनुसूचित जाती, जमाती, अपंग तसेच महिला उद्योजकास विशेष प्राधान्य देण्यात येईल.
प्राप्त अर्जातून निवडण्यात आलेल्या यशस्वी उद्योजकांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय पुरस्कारस्वरूप 15 हजार व 10 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व गौरवचिन्ह देण्यात येईल. पुरस्कारासंबंधी अधिक माहितीकरिता जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, 2 रा माळा, सिव्हील लाईन, नागपूर, दुरध्वनी क्रमांक 0712-2565974 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*****

जलयुक्त शिवार अभियानामुळे पिकांना मिळाले शाश्वत सिंचन - अश्विन मुदगल

    * तीन वर्षात 718 गावांमध्ये जलयुक्तची कामे
    * यावर्षी 3 हजार 121 कामांवर 93.23 कोटीचा निधी

नागपूर, दि. 31 :  जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे पावसाचा प्रदीर्घ खंड पडूनही शेतातील पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देणे शेतकऱ्यांना सुलभ झाले आहे. जलयुक्त शिवार अभियान हे पिकांसाठी संजीवनी ठरत आहे. जिल्ह्यात मागील तीन वर्षात 718 गावांमध्ये विविध स्वरुपाची कामे घेण्यात आली असून यावर्षी 170 गावांमध्ये 3 हजार 121 कामांचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
शेतकऱ्यांनी पिकांसाठी आवश्यकतेनुसार शाश्वत सिंचनासाठी जलयुक्त शिवार उपयुक्त ठरत असल्यामुळे लोकसहभागातूनही या अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामांना सुरुवात झाली आहे. जलयुक्त शिवार अभियान या महत्वाकांक्षी योजनेत सन 2017-18 मध्ये जिल्ह्यातील 220 गावांचा समावेश करण्यात आला. या गावांमध्ये कृषी, वन, बफर झोन, जलसंधारण, जिल्हा परिषद लघु सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, भूजल सर्व्हेक्षण, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत 3 हजार 511 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. विविध कामांकरिता 94 कोटी 17 लक्ष 8 हजार निधी मंजूर करण्यात आला असून आतापर्यत 3 हजार 319 कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियानाचे गेल्या तीन वर्षाचे फलित पाहता यावर्षी देखील जिल्ह्यातील 170 गावांचा समावेश करण्यात आला आहे. सन 2018-19 च्या जलयुक्त शिवार अभियानाचा आराखडा मंजूर करण्यात आला असून यात 3 हजार 121 कामांचा समावेश करण्यात आला आहे. सदर कामांवर प्रशासनाच्या वतीने विविध योजनांमार्फत 93 कोटी 23 लक्ष 67 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मंजूर आराखड्यानुसार कृषी विभागामार्फत 1 हजार 280 कामांवर 32 कोटी 14 लक्ष, वन विभागाच्या 306 कामांवर 6 कोटी 15 लक्ष, बफर झोन मधील 53 कामांवर 76 लक्ष, जलसंधारणाच्या 48 कामावर 13 कोटी 18 लक्ष, जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाच्या 285 कामांवर सर्वाधिक 38 कोटी  36 लक्ष, भूजल सर्व्हेक्षणाच्या 305 कामांवर 2 कोटी 31 लक्ष तर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत 844 कामांवर 30 कोटी 71 लक्ष रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे.



तीन वर्षात 718 गावांचा समावेश
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, राज्याच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाची सुरुवात सन 2015-16 पासुन करण्यात आली. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील एकूण 718 गावांचा अभियानांत समावेश करून विविध विभागांमार्फत 11 हजार 406 कामे पूर्ण करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागात विशेष करुन शेतकऱ्यासाठी जलसाठा निर्माण करण्यात प्रशासन यशस्वी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

मागेल त्याला शेततळे योजनेत 3 हजार 343 पात्र
मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 4 हजार 151 लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले. प्रशासनाच्या वतीने 3 हजार 500 शेततळे वाटपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याने प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानुसार 3 हजार 343 पात्र लाभार्थ्यांच्या अर्जास मंजुरी देण्यात आली आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये सध्या 1 हजार 816 कामे पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
*****

महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त पदांवर नियुक्त्या जाहीर

मुंबई, दि. 31 : राज्य शासनाने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये 10 महामंडळे6 मंडळे, 2 प्राधिकरण व एका आयोगातील पदाचा समावेश आहे.
नव्याने घोषित केलेल्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे
शासकीय महामंडळे, मंडळे, प्राधिकरणे आणि समित्यांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्या नियुक्त्या
अ.क्र.
नाव
पद
महामंडळ / समिती
1)  
हाजी अरफात शेख
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग
2) 
जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर
उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग
3) 
बाळासाहेब ज्ञानदेव पाटील
सभापती
कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ
4)             
हाजी एस. हैदर आझम
अध्यक्ष
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ
5)              
सदाशिव दादासाहेब खाडे
अध्यक्ष
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण
6) 
नरेंद्र अण्णासाहेब पाटील
अध्यक्ष
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
7)              
संजय उर्फ संजोय मारुतीराव पवार
उपाध्यक्ष
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
8)              
आशिष जयस्वाल
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ
9) 
प्रकाश नकुल पाटील
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
10)           
नितिन संपतराव बानगुडे-पाटील
उपाध्यक्ष
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ
11)           
जगदिश भगवान धोडी
उपाध्यक्ष
कोकण पाटबंधारे विकास महामंडळ
12)           
उदय सामंत
अध्यक्ष
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण
13)           
श्रीमती ज्योती दिपक ठाकरे
अध्यक्ष
महिला आर्थिक विकास महामंडळ
14)         
विनोद घोसाळकर
सभापती
मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ
15)
विजय नाहटा
सभापती
मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ
16)          
रघुनाथ बबनराव कुचिक
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ
17)           
मधु चव्हाण
अध्यक्ष
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
18)          
संदिप जोशी
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ
19)          
प्रशांत ठाकूर
अध्यक्ष
शहर व औद्योगिक विकास महामंडळ
20)           
मो. तारिक कुरैशी
अध्यक्ष
नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
21)          
राजा उर्फ सुधाकर तुकाराम सरवदे
अध्यक्ष
महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ

0000

शुल्क निश्चिती प्रस्ताव 31 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 31 शुल्क नियामक प्राधिकरणामार्फत राज्यातील सर्व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थाचालकांनी शुल्क निश्चिती प्रस्ताव येत्या 31ऑक्टोबर 2018 पूर्वी सादर करावेत, असे आवाहन शुल्क नियामक प्राधिकरण सचिव डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.
महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन ) अधिनियम 2015 नुसार शैक्षणिक वर्ष 2019-20 साठीचे शुल्क निश्चिती प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे.
येत्या 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत जी खासगी अनुदानित महाविद्यालयेसंस्था शैक्षणिक वर्ष 2019-20 साठीचे प्रस्ताव सादर करणार नाहीत अशा महाविद्यालयांकडून पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार असल्याचे शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव डॉ. माणिक गुरसळ यांनी स्पष्ट केले आहे. प्रस्तावासंदर्भात अधिक माहितीसाठी www.sssamiti.org या संकेतस्थळावर तसेच 7021833054 या भ्रमणध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. शैक्षणिक वर्ष 2019-20 साठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी  https: //sspnsamiti.com/prp/ssi_prp_18/ अशी लिंक देण्यात आली आहे.
शुल्क नियामक प्राधिकरणाकढून शैक्षणिक वर्ष 2019-20 साठीच्या प्रस्तावासाठी लागणारे प्रक्रिया शुल्क माफ करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी ज्या संस्थांना कायदयातील कलम 14(1) (ख)च्या तरतूदीनुसार शैक्षणिक वर्ष 2018-19 चे प्राधिकरणाने मंजूरी दिलेले अंतिम शुल्क कायम ठेवावयाचे असल्यास सदर संस्थांनी 2019-20 साठी लॉगिन करुन upward revision form मध्ये no पर्याय निवडून ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही शुल्क नियामक प्राधिकरणाच्या परिपत्रकात करण्यात आले आहे.
००००

राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठवा

राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठवा
मुंबई, दि. 31 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने येत्या 10 डिसेंबर पासून राज्य बालनाट्य स्पर्धा सुरु होत आहेत. या बालनाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. 30 सप्टेंबर 2018  पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या राज्यातील संस्‍थांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक संजीव पलांडे यांनी केले आहे.
16 व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक 10 डिसेंबर 2018 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. बालनाट्य स्पर्धेसाठी 1 हजार रुपये इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालकसांस्कृतिक कार्यमहाराष्ट्र राज्यमुंबई यांच्या नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्य संस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी बालनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिकानियम शासनाच्याwww.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 30 सप्टेंबर पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.
मुंबईकोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालकसांस्कृतिक कार्यजुने सचिवालयविस्तार भवनपहिला मजलामहात्मा गांधी मार्गमुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
 पुणे महसूल विभागातील संस्थांनीसहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयविभागीय कार्यालयबंगला क्रमांक-4विमानतळ रोडपुणे (020-20271301) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
 औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयविभागीय कार्यालयरुम नंबर-02एमटीडीसी बिल्डिंगगोल्ड टॉकीजच्या समोरस्टेशन रोडऔंरगाबाद-431005 (0240-2339055) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
 नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयविभागीय कार्यालयद्वारा : अभिरक्षकमध्यवर्ती संग्रहालय,अस्थायी प्रदर्शन हॉलतळमजलासिव्हिल लाईननागपूर-440001 (0712-2554211) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाहीयाची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी.
स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाहीतर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेसाठी संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईलअसे संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.
००००

चहा स्टॅालद्वारे जमा ५१ हजार रुपयांचा निधी केरळच्या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द

अहमदपूरच्या डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या चिमुकल्यांची सहृदयता
मुंबईदि. ३१ : चहा स्टॅालच्या कमाईतून निधी उभा करून तो केरळच्या पूरग्रस्तांसाठी देण्याची सहृदयता लातूरच्या अहमदपूर येथील डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या चिमुकल्यांनी दाखविली आहे. हा ५१ हजार रुपयांचा निधी आज या चिमुकल्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा शासकीय निवासस्थानी सुपूर्द केला.
केरळमधील प्रलंयकारी पुरामुळे तेथील जनतेचे जीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणि विविध प्रकारच्या सहाय्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनानेही वैद्यकीयआर्थिक आणि अनुषंगिक मदत यापुर्वीच पाठविली आहे.
केरळच्या जनतेला आपत्तीवर मात करता यावी यासाठी विविध प्रकराची मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद म्हणून अहमदपुरच्या डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चहाचा स्टॅाल सुरू केला. यातून चहा विक्री करून सुमारे ५१ हजार रुपयांचा निधी जमा झाला. हा निधी विद्यालयातील हरिओम मुसळेविश्वांभर मुलगीरसंजय केंद्रेशुभम चित्ते या विद्यार्थ्यांनी धनादेशाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधतत्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.
यावेळी आमदार विनायक पाटील यांच्यासहविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती यादवशिक्षक हरिनारायण साबदेनारायण केरलेपरमेश्वर जगतापधोंडिराम परांडे आदी उपस्थित होते.
००००