Wednesday 25 September 2019

नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची तयारी पूर्ण - अश्विन मुदगल

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019

· निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी

· मतदारसंघनिहाय व्यवस्थेचा आढावा

नागपूर, दि.25: विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हयातील बारा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगातर्फें शुक्रवार दि.27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिध्द होत असून, उमेदवारी अर्ज स्विकारण्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानसभा निवडणुकीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी आज घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, मुद्रांक जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, निशिकांत सुके, शिरीष पांडे, तसेच विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना प्रसीध्द झाल्यानंतर उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रासंदर्भात पूर्वसूचना देण्यासोबतच निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे 4 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची सुविधा विधानसभा मतदारसंघ निहाय करण्यात यावी. ही संपुर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवावी, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.

निवडणुकीची अधिसूचना 27 सप्टेबर रोजी प्रसिध्द होत असून, नामनिर्देशन पत्र 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 3पर्यंत स्विकारण्यात येणार आहे. छाननी 5 ऑक्टोबर रोजी होईल, त्यांनतर 7 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकीव्दारे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.



विधानसभा निवडणूक-2019

निवडणूकीसाठी उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र येथे स्वीकारल्या जातील

अ.क्र. विधानसभा मतदान संघाचे क्रमांक व नांव निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नांव नामनिर्देशन पत्र स्विकारण्याकरीता निश्चित केलेले ठिकाण

48-काटोल श्री. श्रीकांत उंबरकर

निवडणूक निर्णय अधिकारी 48 काटोल विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, काटोल यांचे कार्यालय, पहिला माळा, प्रशासकीय इमारत काटोल, मेन रोड काटोल तालुका काटोल

49-सावनेर श्री. अतुल म्हेत्रे

निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, 49-सावनेर विधानसभा मतदार संघ प्रशासकीय ईमारत, तहसिल कार्यालय, सावनेर तालुका- सावनेर

50-हिंगणा श्रीमती इंदिरा चौधरी

निवडणूक निर्णय अधिकारी 50-हिंगणा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, हिंगणा तळ मजला, तहसिलदार हिंगणा यांचे दालन, तहसिल कार्यालय, हिंगणा

51-उमरेड (अ.जा.) श्री. हिरामण झिरवाळ

निवडणूक निर्णय अधिकारी 51-उमरेड (अ.जा.) विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, उमरेड यांचे कक्ष तहसिल कार्यालय, उमरेड

58-कामठी श्री. एस.आर.मदनूरकर

निवडणूक निर्णय अधिकारी 48-कामठी विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, मौदा बैठक सभागृह तहसिल कार्यालय, कामठी

59- रामटेक श्री. जोगेंद्र कट्यारे

निवडणूक निर्णय अधिकारी 59- रामटेक विधानसभा मतदार संघ, तथा उपविभागीय अधिकारी, रामटेक यांचे कक्ष, इमारत पहिला मजला, उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, रामटेक

52- नागपूर, दक्षिण-पश्चिम श्री. शेखर बी. घाडगे

उपविभागीय अधिकारी, नागपूर (शहर),यांचे दालन, रुम नंबर-1, तहसिल कार्यालय, नागपूर आकाशवाणी चौक, सिव्हील लाईन्स, नागपूर-440001

53- नागपूर दक्षिण, श्री. आशिष बिजवल

निवडणूक निर्णय अधिकारी, 53-नागपूर दक्षिण विधासभा मतदार संघ यांचा कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पहिला माळा, नागपूर

54-नागपूर पूर्व, श्रीमती शितल देशमुख

निवडणूक निर्णय अधिकारी, 54-नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघ तहसिल कार्यालय (शहर) नागपूर, खोली क्र. 19, नागपूर

55-नागपूर मध्य, शिवानंदा लंगडापुरे

निवडणूक निर्णय अधिकारी, 55-नागपूर मध्य विधानसभा मतदार संघ यांचे कार्यालय उपजिल्हाधिकारी, (भूसंपादन क्रमांक-1), वि.पा.वि.म.जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर

56-नागपूर पश्चिम, श्रीमती हेमा बढे 4

निवडणूक निर्णय अधिकारी, 56-नागपूर पश्चिम विधानसभा मतदार संघ, नागपूर यांचे कार्यालय, खोली क्रमांक 24 पहिला माळा, तहसिल कार्यालय, नागपूर (शहर)

57-नागपूर उत्तर (अ.जा.), श्रीमती सुजाता गंधे

निवडणूक निर्णय अधिकारी, 57-नागपूर उत्तर (अ.जा.), विधानसभा मतदार संघ, नागपूर यांचे कार्यालय, राजस्व शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय मळमजला, सिव्हील लाईन्स, नागपूर


*****

राज्याच्या जलसंपदा विभागाला ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’


नवी दिल्ली25 : एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला आज केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते राष्ट्रीय जल अभियान पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिक जिल्हयातील शेतकरी बापु साळुंखे यांनाही प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
            केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात सुरु असलेल्या 6 व्या राष्ट्रीय जल सप्ताहाच्या दुस-या दिवशीच्या शेवटच्या सत्रात राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारांचे’ वितरण करण्यात आले. जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारीया  आणि विभागाचे सचिव यु.पी.सिंहराष्ट्रीय जल अभियानाचे संचालक जी. अशोक कुमार  यावेळी मंचावर उपस्थित होते.
केंद्र शासनाच्यावतीने वर्ष 2011 पासून देशभर राष्ट्रीय जल अभियान’ राबविण्यात येतेयावर्षी प्रथमच या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणारे विविध राज्यांचे विभागखाजगी क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींना राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय जल अभियानाअंतर्गत ठरवून देण्यात आलेल्या 5 उद्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण 9 श्रेणींमध्ये 23 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
गोदावरी खोरे आणि उपखोरे अंतर्गत येणा-या धरणांच्या पाण्याचे एकात्मिक जल व्यवस्थापन करून जलसंरक्षणात दिलेल्या उल्लेखनिय योगदानासाठी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाला एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन श्रेणी अंतर्गत दुस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल यांच्यासह विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1 लाख 50 हजार रूपयेसन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
उपलब्ध पाण्याचा प्रभावी उपयोग करून जलव्यवस्थापन व जलसंरक्षणात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी नाशिक जिल्हयातील चांदवड तालुक्याच्या वडनेर (भैरव) येथील  शेतकरी बापु साळुंखे यांना शेतक-यांच्या श्रेणीत प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. 2 लाख रूपयेसन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी श्री. साळुंखे यांच्या मालकीच्या एकूण 25 एकर शेतीतील केवळ 2 एकर शेतीलाच पाणी उपलब्ध होते. मात्रया स्थितीवर मात करण्यासाठी  वर्ष 2004 पासून सुक्ष्म जलसिंचन पध्दतीचा प्रभावी अवलंब करून श्री. साळुंखे यांनी आपली 25 एकर शेती ओलीताखाली आणली असून या जमीनीवर ते द्राक्ष उत्पादन घेत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारासाठी घेण्यात आली.                  
००००

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन


नागपूर,दि.25:विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज पंडित दीनदयाळ उपाध्याय  यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त संजय धिवरे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त सुधाकर तेलंगअंकुश केदाररमेश आडे तहसिलदार धर्मेंद्र फुसाटेप्रताप वाघमारे तसेच अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालयात आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी  रविंद्र खजांजीउपजिल्हाधिकारी अविनाश कातडेश्रीमती विजया बनकरजिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे तसेच अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

साखरेचे नियतन प्राप्त


नागपूर, दि.25 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांना साखर वितरीत करण्यासाठी साखरेची खरेदी ई-लिलाव एनसीडीईएक्स ई-मार्केटस लिमिटेडमार्फत काढण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून नागपूर ग्रामीणसाठी 2164 क्विंटल माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर, 2019  या तिमाहीसाठी साखरेचे नियतन प्राप्त झाले असून तालुकानिहाय रास्त भाव दुकानदारामार्फत फक्त अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रति कुटूंब एक किलो साखर 20 रुपये प्रति किलो दराने वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी कळविले आहे.
*******

माजी सैनिक दरबाराचे आयोजन समस्या सादर कराव्यात


नागपूर, दि.25 : जिल्हयातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबीत यांच्या समस्या सोडविण्यासाठी माजी सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या माजी सैनिक, सैनिक विधवा व अवलंबित यांचे समस्या असतील त्यांनी संबंधीत समस्येच्या कागदोपत्री पुराव्यासह दोन प्रतीमध्ये अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नागपूर येथे दिनांक 3 ऑक्टोबर 2019 पर्यंत जमा करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी लेफ्टनंट नितीन पांडे यांनी कळविले आहे.
*******

कारागृह बंदीच्या मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी

कारागृह बंदी किशोर कन्हैयालाल भाटीया  
            मुंबईदि. 25 : कारागृहातील बंदी किशोर कन्हैयालाल भाटीया हे दि. 26 जुलै2019 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवारदि. 27 सप्टेंबर2019 रोजी दुपारी 2.00 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयनिवडणूक शाखातिसरा मजलाजुने जकात घरशहिद भगतसिंग मार्गफोर्ट मुंबई 400001 या ठिकाणी होणार आहे.
            या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारीमुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावेअसे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
००००
कारागृह बंदी राजेश हनुमंता पोटसूळ यांच्या
मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी
            मुंबईदि. 25 : कारागृह बंदी राजेश हनुमंता पोटसूळ हे दि. 30 जुलै2019 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवारदि. 27 सप्टेंबर2019 रोजी दुपारी 3.00 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयनिवडणूक शाखातिसरा मजलाजुने जकात घरशहिद भगतसिंग मार्गफोर्ट मुंबई 400001 या ठिकाणी होणार आहे.
            या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारीमुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावेअसे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
००००
कारागृह बंदी संजय बाबुराव सुतार यांच्या
मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी
            मुंबईदि. 25 : कारागृहात बंदी असलेले संजय बाबुराव सुतार हे दि. 24 जुलै2019 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवारदि. 27 सप्टेंबर2019 रोजी दुपारी 2.00 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयनिवडणूक शाखातिसरा मजलाजुने जकात घरशहिद भगतसिंग मार्गफोर्ट मुंबई 400001 या ठिकाणी होणार आहे.
            या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारीमुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावेअसे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
००००
कारागृह बंदी सलीम मोहमद मुन्ना शेख यांच्या
मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी
            मुंबईदि. 25 : कारागृहात बंदी असलेले सलीम मोहमद मुन्ना शेख हे दि. 27 मे2019 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवारदि. 27 सप्टेंबर2019 रोजी दुपारी 3.00 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयनिवडणूक शाखातिसरा मजलाजुने जकात घरशहिद भगतसिंग मार्गफोर्ट मुंबई 400001 या ठिकाणी होणार आहे.
            या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारीमुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावेअसे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
००००
कारागृह बंदी महादु रघुनाथ वाघमारे यांच्या
मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी
            मुंबईदि. 25 : कारागृहात बंदी असलेले महादु रघुनाथ वाघमारे हे दि. 12 जुलै2018 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवारदि. 27 सप्टेंबर2019 रोजी दुपारी 3.30 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयनिवडणूक शाखातिसरा मजलाजुने जकात घरशहिद भगतसिंग मार्गफोर्ट मुंबई 400001 या ठिकाणी होणार आहे.
            या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारीमुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावेअसे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
००००
कारागृह बंदी स्वप्नील सुहास नेरलेकर यांच्या
मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी
            मुंबईदि. 25 : कारागृहात बंदी असलेले स्वप्नील सुहास नेरलेकर हे दि. 31 मे2019 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवारदि. 27 सप्टेंबर2019 रोजी दुपारी 2.00 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयनिवडणूक शाखातिसरा मजलाजुने जकात घरशहिद भगतसिंग मार्गफोर्ट मुंबई 400001 या ठिकाणी होणार आहे.
            या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारीमुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावेअसे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
००००
कारागृह बंदी महिला पार्वती विजय सिंग यांच्या
मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी
            मुंबईदि. 25 : कारागृहात बंदी असलेली महिला पार्वती विजय सिंग ही दि. 02 ऑक्टोबर2018 रोजी मृत्यू पावली आहे. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवारदि. 27 सप्टेंबर2019 रोजी दुपारी 2.30 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयनिवडणूक शाखातिसरा मजलाजुने जकात घरशहिद भगतसिंग मार्गफोर्ट मुंबई 400001 या ठिकाणी होणार आहे.
            या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारीमुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावेअसे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
००००
कारागृह बंदी महिला शकीला बानु रईस अन्सारी यांच्या
मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी
            मुंबईदि. 25 : कारागृहात बंदी असलेली महिला शकीला बानु रईस अन्सारी ही दि. 02 ऑक्टोबर2018 रोजी मृत्यू पावली आहे. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवारदि. 27 सप्टेंबर2019 रोजी दुपारी 04.00 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयनिवडणूक शाखातिसरा मजलाजुने जकात घरशहिद भगतसिंग मार्गफोर्ट मुंबई 400001 या ठिकाणी होणार आहे.
            या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारीमुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावेअसे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
000

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदारसंख्येत 21 लाखांनी वाढ



मुंबई, दि. 25 : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार होते तर आता 31 ऑगस्टपर्यंत 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 एवढी मतदार नोंदणी झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले. जुलै-ऑगस्ट 2019 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हा कार्यक्रम राबविण्यात आला. सुट्ट्यांच्या दिवशी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले. त्यातून अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातूनही शहरी भागातील मतदार जोडण्यात आले.
            मार्चमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी 4 कोटी 57 लाख 02 हजार 579 पुरुष मतदार व 4 कोटी 16 लाख 25 हजार 819 महिला मतदार होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित अंतिम मतदारयादीमध्ये पुरुष मतदारामध्ये दहा लाख 35 हजार 262 नव्या पुरुष मतदारांची वाढ होवून ती 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 एवढी झाली आहे. तर महिला मतदारांमध्ये 10 लाख 79 हजार 958 एवढी वाढ होऊन ती आता 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी 2 हजार 86 तृतीयपंथी मतदार होते त्यामध्ये 507 मतदार वाढून ते आता 2 हजार 593 एवढे झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे.
००००

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना विनाशुल्क बदली ओळखपत्रे



मुंबई दि. 25 : पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1 लाख 56 हजार 060 नागरिकांना तर सांगली जिल्ह्यातील एकूण 4 लाख 35 हजार 422 नागरिकांना विनाशुल्क बदली ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत महापुराने बाधित क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार छायाचित्रासह ओळखपत्र विनाशुल्क देण्याची कार्यवाही केली जाईल.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात महापूर आला होता. या महापुरात या दोन जिल्ह्यातील गावे बाधित झाली होती. या महापुरात या दोन जिल्हयातील नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, महत्वाचे दस्ताऐवज यांचे नुकसान झाले. ही बाब लक्षात घेऊन ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी या दोन जिल्ह्यातील नागरिकांना आता बदली ओळखपत्रे पुरविण्यात येणार आहेत.
००००



Tuesday 24 September 2019

शासकीय रेखाकला परीक्षा-2019 पुढे ढकलली



मुंबई, दि. 24 : शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा दि. 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये आयोजित करण्याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार मोहोरबंद प्रश्नपत्रिका वितरणाचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत.
परीक्षेचे पुढील वेळापत्रक www.doa.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच ज्या परीक्षा केंद्रांने प्रश्नपत्रिकांची मोहोरबंद पाकीटे ताब्यात घेतली आहेत. ती सर्व मोहोरबंद पाकीटे प्रश्नपत्रिका वितरण केंद्रावर परत करावी, याची शासकीय रेखाकला परीक्षा 2019चे सर्व विद्यार्थी, केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी केले आहे.
००००



महाराष्ट्राला ‘एनएसएस’चे दोन पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान


नवी दिल्ली, 24 : राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्यासाठी आज मुंबई विद्यापीठाचे किशनचंद चेल्लाराम (के.सी.) महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी सचिन ढोले यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते एनएसएस पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले.
            केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएस दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वर्ष 2017-18 च्या एनएसएसपुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            या कार्यक्रमात देशातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये देशातील एकूण 10 महाविद्यालयांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून मुंबई येथील किशनचंद चेल्लाराम (के.सी.) महाविद्यालयाचा यावेळी सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्य हेमलता बागला यांना  चषक आणि 1 लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर  याच महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश कोलते यांना 70 हजार रूपये , रजत पदक आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
            विद्यार्थ्यांच्या श्रेणीमध्ये देशातील एकूण 29 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर शाखेचा विद्यार्थी सचिन ढोले हा महाराष्ट्रातून सर्वोत्तम एनएसएस विद्यार्थी ठरला असून त्याला 50 हजार रूपये , रजतपदक आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.                                                                        
००००

विधानसभा निवडणूक काळात राज्यात 3 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त



मुंबई, दि. 24 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून मागील तीन दिवसात आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस यांनी केलेल्या कारवाईत एकूण 3 कोटी 79 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एक कोटी 36 लाखांची रोख रक्कम, 1 कोटी 68 लाख किंमतीचे मद्य, 29 लाख रुपये किंमतीचे मादक पदार्थ व 46 लाख रुपये किंमतीचे मौल्यवान दागिने यांचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आदर्श आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत शासकीय जागेवरील 75 हजार 981, सार्वजनिक ठिकाणच्या 73 हजार 445 व खासगी ठिकाणावरील 16 हजार 428 जागांवरील अनधिकृत फलक, बॅनर, कटआऊट व झेंडे काढण्यात आले आहेत. सर्व जाहिराती, पोस्टर व कटआऊट हटविण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुदतीत हे सर्व साहित्य काढण्यात येत आहेत. आचारसंहिता भंग प्रकरणी आतापर्यंत 50 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कायद्यानुसार बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नये व पर्यावरणाला हानी पोहचेल अशा वस्तू टाळाव्यात, असे आवाहनही श्री.शिंदे यांनी केले.
००००

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण; 15 हजार अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रणा पुरविणार - अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे



मुंबई, दि. 24 : भारत निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून 15 हजार अतिरिक्त मनुष्यबळ व अतिरिक्त मतदान यंत्रे उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
श्री. शिंदे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. 4 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची तारीख असून 5 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होईल. 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.
सातारा लोकसभा मतदारसंघात कोरेगाव, वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण व सातारा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या मतदानसाठी 15 हजार कर्मचाऱ्यांची अतिरिक्त गरज भासणार आहे. तसेच पोटनिवडणुकीसाठी 3500 बॅलेट युनिट (बीयू), 3000 कंट्रोल युनिट (सीयू) व 3200 व्हीव्हीपॅट हे जास्तीचे लागणार असून ही सर्व यंत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
श्री. शिंदे म्हणाले की, सातारामध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्रच होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन इव्हिएम व व्हीव्हीपॅटची दोन संच राहतील. यामध्ये लोकसभेसाठी असणाऱ्या मतदान यंत्रावर पांढऱ्या रंगाचे स्टिकर लावण्यात येणार असून विधानसभेसाठी असणाऱ्या यंत्रावर गुलाबी रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांची गफलत होणार नाही. तसेच मतदान यंत्रावरील मतपत्रिकेचा रंगही याप्रमाणेच राहणार असून यंत्रावर मोठ्या अक्षरात लोकसभा व विधानसभा असे नमूद करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर एकच मतदार नोंदणी पुस्तिका ठेवण्यात येणार आहे. परंतु विधानसभा व लोकसभेसाठी दोन वेगवेगळ्या मतदार स्लिप असणार आहेत.

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी संख्येत वाढ करण्यात आली आहे. 1200 मतदार असलेल्या ठिकाणी एक केंद्राध्यक्ष व पाच अधिकारी, तर 1200 पेक्षा अधिक मतदार असलेल्या ठिकाणी एक केंद्राध्यक्ष व सहा कर्मचारी असतील.
००००