Saturday 30 September 2017

दीक्षाभूमी विकास आराखडा लवकरच कार्यान्वित - देवेंद्र फडणवीस

v  बौद्धस्थळ पर्यटन विकास आराखडा
नागपूर दि.30 : दीक्षाभूमीच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा शासनाने तयार केला असून तो लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दीक्षाभूमी येथे आयोजित 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाने, आमदार नाना शामकुळे, प्रकाश गजभिये, डॉ.मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनूप कुमार, स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, श्रीमती कमलताई गवई, आनंद फुलझेले, राजेंद्र गवई, विलास गजघाटे व समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
दीक्षाभूमी येथे आज 61 वा धम्मचक्र प्रवर्तनदिन मोठ्या हर्षोलासात साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या प्रगतीचा पाया रचण्याचे काम बाबासाहेबांनी केले. बाबासाहेब हे व्यक्ती नाही तर संस्था होते. बाबासाहेब राष्ट्रनिर्माते युगपुरुष असून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच सर्वांना समानसंधी प्राप्त झाली आहे. बाबासाहेबांचे स्मारक असलेल्या दीक्षाभूमीच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा शासनाने तयार केला आहे. दीक्षाभूमीसमोरील जागेचा या आराखड्यात अंतर्भाव असून भव्यदिव्य असा विकास या माध्यमातून करण्यात येणार आहे. हा आराखडा लवकरच कार्यान्वित होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शस्त्रांशिवाय जगाला जिंकणारा एकमेव बौद्धधर्म असून जगात सर्वात प्रगत राष्ट्र असलेला जपान बौद्ध धर्माचा विचारावर जातो. आपल्या जिवनावर भगवान गौतम बुद्धाचा विचाराचा प्रभाव असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दीक्षाभूमी नेहमी उर्जा देत असून याठिकाणी बाबासाहेबांनी बौद्धधम्माची दीक्षा घेतली. बाबासाहेब हे विज्ञानवादी होते. जे समाजासाठी उत्तम आहे. तेच त्यांनी स्वीकारले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बौद्धस्थळांची शंभर कोटींची पर्यटन विकास योजना तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वंचितांचा विकास हेच सरकारचे ध्येय असून आपले सरकार बाबासाहेबांचा विचारावरच मार्गक्रमण करेल असे ते म्हणाले.
समता, समानता व न्याय हे बाबासाहेबांचे तत्व असून या तत्वानुसारच देशाची प्रगती होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. केंद्र सरकारने नदी जोड प्रकल्प ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. नदी जोड प्रकल्पाची प्रेरणा बाबासाहेबांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ज्या गोष्टी आज आम्ही करत आहोत, जी प्रगती आज होत आहे त्या सर्व बाबी बाबासाहेबांनी त्याकाळी नमूद केल्या होत्या, असे ते म्हणाले. बाबासाहेबांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांचे विचार मनामनात रुजविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. बाबासाहेब यांचेव्हिजन प्रेरणादायी होते. आणि त्यानुसारच देश प्रगती करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारताला मजबूत करण्याचा विचार बाबासाहेबांनी दिला, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पाली भाषेचा समावेश भारतीय भाषेत व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी सांगितले. दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्यशासन प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. महापौर नंदा जिचकार म्हणाल्या की, बाबासाहेबांचे विचार आजही क्रांती घडवितात. नागपूर शहर स्मार्ट होत असून नागपूरलाग्लोबल लूक देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले शहर अस्वच्छ होणार नाही असा आज संकल्प करु या असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून दीक्षाभूमी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तो साकार होईल, अशी खात्री स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली. या प्रसंगी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई यांचे भाषण झाले. दीक्षाभूमीवरील या कार्यक्रमास  बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन विलास गजघाटे यांनी केले. तर आभार राजेंद्र गवई यांनी मानले.  
                                                            ** * * * **

समाजातील अत्यंत प्रतिभावान व्यक्तिंना समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाव देणार- देवेंद्र फडणवीस

v  डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे उद्घाटन
v  प्रतिक व बोध वाक्याचे अनावरण
v  समता प्रतिष्ठानच्या मुख्य उद्देशिका पुस्तिकेचे अनावरण
नागपूर, दि. 30 :   समाजातील दुर्बल घटकांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासोबतच संशोधन संस्थेच्या माध्यमातून समाजातील अत्यंत प्रतिभावान लोकांना योग्य न्याय देऊन त्यांच्या प्रतिभेला वाव देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय विभागाच्या प्रांगणात आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी समता प्रतिष्ठानच्या समता व्हिजन व मुख्य उद्देशिका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे, डॉ.मिलिंद माने, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त मिलिंद शंभरकर, महासंचालक राजेश धाबरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून केंद्र शासनाने विविध शैक्षणिक तसेच समाजपयोगी राबविले असून या माध्यमातून समाजातील अत्यंत प्रतिभावानांना त्यांच्या प्रतिभेला न्याय देण्याचे काम करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर राज्यातही महाराष्ट्र शासनाने समता प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता आणण्याकरिता संविधान दिले. या माध्यमातून सामान्य माणसाला मोठी शक्ती दिली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानच्या स्थापनेसोबतच प्रतिष्ठानचे प्रतिक आणि ब्रीद वाक्याचा अनावरण होत आहे. समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील प्रतिभेला न्याय देण्यात येईल, अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच दीप प्रज्वलित करुन समता प्रतिष्ठानचे विधीवत उद्घाटन केले.
प्रारंभी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सामाजिक प्रतिष्ठानच्या  स्थापने संदर्भातील उद्देश सांगतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवितांना समाजात समता तसेच जात विरहीत समाज निर्माण करण्यात येईल. समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित अभ्यास आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याण व विकासासाठी विविध उपक्रम राबविणे यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे सामाजिक न्यायमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
प्रतिक व बोध वाक्य स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक गणेश महादेवराव तायडे, द्वितीय पारितोषिक भंते सारिपुत, प्रोत्साहनपर पटेल मोबीन शेखलाल, यशवंत वानखेडे, रघुवीर पंढरीनाथ पवार हे विजयी ठरले आहेत. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता खेलरत्न पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू मोना राजेश मेश्राम हिला अकरा लक्ष रुपये व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रारंभी सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर आभार प्रदर्शन सामाजिक न्याय राज्यमंत्री व प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप कांबळे यांनी मानले. 

असुरी शक्तींवर विजय मिळवून चांगला समाज घडवूया – मुख्यमंत्री

मंचच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेला 32 हजार रुपयांचा धनादेश

नागपूर दि.30 : प्रभू श्रीरामांनी समाजातील सर्व घटकांना संघटित करून विजयाचा मंत्र दिला. आजही समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन चांगला समाज घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच असुरी शक्तींवर विजय मिळवून चांगला समाज घडवूया, असे आवाहन करत नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
            जयताळा येथील बाजार मैदानात झुंझार नागरिक मंचच्या वतीने आयोजित (प्रदूषण व पर्यावरण विरूद्ध झुंज) रावण दहन उत्सव -२०१७ कार्यक्रमात ते बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर महापौर श्रीमती नंदाताई जिचकार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'संकल्प से सिद्धी तक'च्या यशस्वीतेसाठी राज्याला भ्रष्टाचारगरिबी, जातियता आणि धर्मांधता मुक्त करुयात. असुरी शक्तींवर विजय मिळविण्यासाठी प्रभू श्रीरामांनी समाजातील छोट्या –छोट्या घटकांना एकत्र करुन, सज्जन समाजाच्या निर्मितीचा संदेश आपल्या कर्तृत्वातून दिला. प्रभू श्रीरामांचा हाच संदेश आपण आत्मसात करुन चांगल्या  समजाच्या निर्मितीसाठी काम करुयात, असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.
            झुंझार नागरिक मंच मागील १४ वर्षापासून कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजक ॲङ नितीन तेलगोटे, अध्यक्ष किशोर वानखडे व संपूर्ण मंचचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेला झुंझार नागरिक मंचचे कार्यकर्ते नानाजी सातपुते यांनी २१ हजार रुपये तर दत्तूभाऊ वानखेडे यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
            यावेळी महापौर श्रीमती नंदाताई जिचकार यांनी प्रास्ताविकात स्वच्छ, सुंदर आणि प्रगतशील नागपूरसाठी प्रयत्न करण्याचे नागरिकांना आवाहन केले. तसेच उपस्थित नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येंने नागरिकांची उपस्थिती होती.

मेट्रो रेल्वे प्रकल्प आर्थिक विकासाचे ग्रोथ इंजिन - देवेंद्र फडणवीस

v  माझी मेट्रो रेल्वेच्या ट्रायल रनला हिरवी झेंडी
v  मेट्रोमुळे 20 हजार लोकांना रोजगाराच्या संधी
v  समृद्धी महामार्गासाठी कोरीयाचे सहकार्य
v  चांगी विमानतळाप्रमाणेच नागपूर व पुण्याचा विकास
v  एसबीआयच्या महाकार्डद्वारे सर्व सेवांचा लाभ  

नागपूर, दि. 30 : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे जलद दळण-वळणाच्या सुविधा उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे 20 हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच मेट्रो रेल्वेस्टेशनच्या माध्यमातून अत्याधुनिक सेवा व सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे हा प्रकल्प आर्थिक विकासाचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 नागपूर मेट्रोच्या ट्रायल रनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर माझी मेट्रोला प्रत्यक्ष सुरुवात झाली. नागपूर मेट्रो प्रकल्प हा शहराचे चित्र बदलणारा महत्वकांक्षी प्रकल्प असून केवळ 27 महिन्यात साडेपाच कि.मी. च्या ट्रायल रनला सुरुवात झाली आहे.  स्टेट बँक इंडियाच्या महाकार्ड सेवेचा शुभारंभ यावेळी झाला.  
मिहान प्रकल्प परिसराचे मिहान डेपो येथे नागपूर मेट्रोच्या ट्रायल रन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा श्रीमती अरुंधती भट्टाचार्य विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर महापौर नंदाताई जिचकार, खासदार कृपाल तुमाने, डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, समीर मेघे, डॉ.मिलिंद माने, सुधीर पारवे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय सचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, नासुप्रचे सभापती डॉ.दीपक म्हैसेकर आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वांच्या स्वप्नातील माझी मेट्रो वेगाने आकार घेत आहे. या वेगाने देशातल्या कोणत्याही मेट्रोचे काम पुढे गेले नसल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नागपूर मेट्रो बुटीबोरी, हिंगणा तसेच कन्हानपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. मेट्रो स्टेशनच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे रस्त्यावरील ताणही कमी होईल. मॉरेस कॉलेज टी पाईंट तसेच पुणे येथील स्वारगेट येथे मोठा हब महामेट्रोतर्फे उभारण्यात येणार असून सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सहभाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्टेट बँक इंडियातर्फे महा कार्डचा मेट्रो रेल्वेसाठी शुभारंभ होत असून या कार्डाद्वारे रेल्वेसह सर्व सुविधांसाठी कार्डचा वापर होणार आहे. त्यामुळे महामोबिलिटी कार्ड राज्यातील सर्व मेट्रो, बस, टोल नाके, महानगरपालिका आदी साठी एकत्रितपणे संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्टेट बँकेने मेट्रो सेवा सुरु होण्यापूर्वीच महाकार्ड लाँच केले आहे. बँकेने सुद्धा ही सेवा राज्यात अल्पदरात सुरु करावी, अशी सूचना यावेळी दिली. पोर्टतर्फे वाहतूक मार्गदर्शनासंबंधात ॲप तयार करण्यात आले असून तीनशे मीटर परिसरात जी.पी.एस. सिस्टीमद्वारे वाहतुकीचे मार्गासंदर्भात मार्गदर्शन मिळणार आहे. ही सुविधा नागपूरसह राज्यात सुरु करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी कोरीया येथे झालेल्या सामंजस्य करारासंदर्भात सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, या महत्वाकांक्षी मार्गासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी तत्वत: मान्यता दिली आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाने सुद्धा अकरा हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले असून या महामार्गासाठी निधीचा प्रश्न नसल्याचे त्यांनी सांगितले. देशातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी केंद्र शासनाने मान्यता दिली असून या प्रकल्पामुळे नागपूर येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे.
नागपूर विमानतळावर कार्गोहब सुविधा उपलब्ध होण्यासोबतच पुणे विमानतळाच्या विकासासाठी जगातील सर्वोत्कृष्ट चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ बनविणाऱ्या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज लक्षात घेऊन रोड आणि रेल्वेचा कॉरीडॉर तयार करण्यात येणार आहे. यासाठी निती आयोगाने मान्यता देण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर मेट्रो हा महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम अत्यंत चांगल्या दर्जाचे होत असून सौर उर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे सांगतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मेट्रो प्रकल्पासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने महा कार्ड मेट्रो सुरु होण्यापूर्वी सुरु केले आहे. हे कार्ड सर्वत्र वापरता येणार असून या प्रकल्पासाठी उपयुक्त ठरणार आहे. अजनी येथे 800 कोटी रुपये खर्च येणार असून मल्टी मॉडेल हब बांधण्यात येणार असून सर्वसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी सेंट्रल जेल, सिंचन विभागाच्या कॉलनीची जागा तसेच वेअर हाऊसच्या सुमारे 700-800 एकर परिसरावर जागतिक दर्जाचे सुविधा केंद्र राहणार आहे.
खापरी येथे कार्गो हब बांधण्यात येणार असून यासाठी केंद्र शासनाने वाराणसी व नागपूर येथे या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम येत्या दोन महिन्यात सुरु होणार असून जगातील सर्व विमाने येथे थांबून इंधन भरण्याचे सुविधा उपलब्ध होईल. अंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कार्गोहबमुळे येत्या पाच वर्षात 50 हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. नागपूरच्या युवकांना प्राधान्याने रोजगार देण्याची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा श्रीमती अरुंधंती भट्टाचार्य म्हणाल्या की, 50 वर्षापूर्वी नागपूरला स्कूटर चालविणारी महिला प्रथम बघितली होती. त्यावेळी नागपूर हे प्रगतीच्या पुढे होते आणि आज मेट्रोमुळे आजही प्रगतीच्या खूप पुढे असणारे शहर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे निश्चलणीकरणानंतर कॅशलेस व्यवहाराकडे सुरुवात झाली असून महा कार्डच्या माध्यमातून मेट्रोसह बस वाहतूक महानगरपालिकेच्या सुविधांसाठी तसेच इतर खरेदीसाठी महा कार्ड सुलभ ठरणार आहे. सर्व व्यवहार एकाच कार्डच्या माध्यमातून होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात या कार्डचा वापर आजपासून सुरु होत असल्याचे यावेळी सांगितले.
प्रारंभी महामेट्रोचे संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांनी नागपूर मेट्रोच्या माध्यमातून जलद व चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न असून 38 कि.मी. लांबीपैकी साडेपाच कि.मी. वर ट्रायल रन सुरु करण्यात आला आहे. हे काम केवळ 27 महिन्यात पूर्ण झाले आहे. वर्धा रोड येथे मेट्रो रेल्वे व दळण-वळणासाठी डबलडेक्कर रोड तयार करण्यात येत असून जगातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी प्राधान्य दिल्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जलदगतीने जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही या प्रकल्पाला महत्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार सुनील माथूर यांनी मानले.

Friday 29 September 2017

Maharashtra Governor greets people on ‘Vijayadashmi’

Mumbai, Sept 29 : The Governor of Maharashtra Ch Vidyasagar Rao has greeted the people of Maharashtra on the happy  occasion of Vijayadashmi.  In his message the Governor has said:

“May the auspicious festival of Vijaya Dashmi foster harmony and brotherhood  among all sections of society. I take great pleasure in conveying my greetings to the people of Maharashtra on this occasion and wish them happiness, progress and prosperity.”
००००

फैजपूर येथे ग्रामीण महाआरोग्य शिबीर


मुंबई, दि. 29 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे ग्रामीण महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
            जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे सकाळी 10 वा. हे आरोग्य शिबीर सुरु होणार आहे. प्रथमच होणाऱ्या या ग्रामीण महाआरोग्य शिबीरात नेत्ररोग, हृदयरोग, मेंदूरोग, जनरल शस्त्रक्रिया, बालरोग, मुत्ररोग, त्वचा रोग, स्त्रीरोग, मनोविकार, श्वसन विकार, ग्रंथीचे विकार, कर्करोग आदी आजारांची तपासणी करुन उपचार करण्यात येणार आहेत. अनेक नामवंत तज्ज्ञ डॉक्टर सामाजिक बांधिलकीतून आपल्या सेवा विनामुल्य या महाआरोग्य शिबीरात उपलब्ध करुन देणार आहेत. तसेच अत्याधुनिक वैद्यकीय सेवा ही या शिबीरात उपलब्ध केल्या आहेत.
००००

एलफिन्स्टन रोड-परळ रेल्वे पूल दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखाची मदत


·        जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासनाकडून
·        दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश

          मुंबईदि. 29: मुंबई उपनगरीय रेल्वेच्या एलफिन्स्टन रोड (प्रभादेवी) आणि परळ स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलावर आज झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत आणि जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च शासनाच्यावतीने करण्यात येणार असून या दुर्घटनेची राज्य सरकार आणि रेल्वे विभागाद्वारे सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
            मुख्यमंत्री म्हणालेही दुर्घटना अतिशय धक्कादायक आणि दु:खद असून मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन सर्व जखमींना योग्य उपचार तात्काळ मिळवून देण्यासह परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव तसेच मुंबई पोलीस आयुक्त यांना दिले आहेत. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशीदेखील या दुर्घटनेबाबत चर्चा केली असून या घटनेची राज्य शासन व रेल्वे विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा घटना घडू नयेतयासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य रेल्वे प्रशासनाला करण्यात येईल.
----०----

मी मुख्यमंत्री बोलतोय' : 'विकास गावांचा' विषयावर प्रश्न पाठविण्याचे आवाहन

            मुंबईदि. 29 : ऑक्टोबर मध्ये प्रसारित होणा-या 'मी मुख्यमंत्री बोलतोयया कार्यक्रमासाठी 'विकास गावांचा'  या विषयाकरिता जनतेकडून ई-मेल आणि व्हॉटस ॲपवर दि. 4 ऑक्टोबर 2017 पर्यंत प्रश्न मागविण्यात येत आहेत.
            ग्रामीण भागातील रस्ते आणि पूलआरोग्य सेवाशालेय शिक्षणस्वच्छतापाणीपुरवठावीज तसेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था- जिल्हा परिषदपंचायत समितीग्रामपंचायत या विषयांवर जनतेला प्रश्न विचारता येतील.
सदरचे प्रश्न mmb.dgipr@gmail.com तसेच 8291528952 या व्हॉटस अप क्रमांकावर पूर्ण नावपत्त्यासहित पाठवावेत असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात आले आहे.
००००

विजया दशमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा


मुंबई, दि. 29 : राज्यपाल चे. विद्यासागररावयांनी राज्यातील जनतेला दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील सर्व नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद होत आहे. या सणानिमित्त समाजात सदभावना व बंधुभाव वृध्दींगत होवोअसे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
००००

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा दौरा

        नागपूर दि29 :- सामाजिक न्याय राज्यमंत्री  दिलीप कांबळे यांचे शनिवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी पुणे येथून विमानाने सकाळी11.40 वाजता नागपूर विमानतळावर आगमन. स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे शासकीय विश्रामगृह येथून रात्री 8 वाजता विमानतळाकडे प्रयाण. रात्री 9.20 वाजता नागपूर विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण.
                                                                        ***

कृषी उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या - सामाजिक न्यायमंत्री

        नागपूर दि29:-  लोकसहभागातूनच विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करतानाच  या पाणीसाठ्यांचा उपयोग करुन कृषीक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विकास करता येणार आहेकृषीक्षेत्रावर राज्याचा आर्थिक विकास शक्य आहे. त्यासाठी कृषीक्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  देऊन उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केलेकृषी पदव्युत्तर वसतीगृहाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहेधम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.     
            कृषी विभागकृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि डॉपंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय प्रदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे 
            राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्थानचे संचालक डॉएम.एस.लदानियाराष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोगिता संस्थानचे संचालक डॉएसकेसिंगकेंद्रीय कापूस अनुसंधानचे संचालक व्हीएनवाघमारेडॉपंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉडीएममानकरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडेप्रज्ञा गोडघाटे व्यासपीठावर उपस्थित होते
            राज्याचा विकास हा कृषी विकासावर अवलंबून असूनकृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवनवे प्रयोग करणे आवश्यक आहेतप्रायोगिक तत्त्वावर शेती करण्याला प्राधान्य देण्याची वेळ आता आली आहेशेतकऱ्यांना नवनवी यंत्रसामुग्री राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून पुरवत आहेत्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेत स्वावलंबी होणे आवश्यक असल्याचे सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी सांगितले.
             पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणावर माजी मालगुजारी तलाव आहेतजलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून या जलाशयांमधील गाळ काढण्यात येत आहे.मामा तलावांमध्ये असलेल्या पाण्यातून शेतीचे उत्पादन तर वाढविता येतेयावर्षी जरी पूर्व विदर्भातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असला तरी नंतरच्या पावसाने दिलासा दिला आहेशिवाय निलक्रांतीमुळे मासेमारीभात पीक आणि शिंगाड्यासारखी कृषीपूरक उत्पादनेही घेता येतातया उत्पादनांच्या माध्यमातून शेतकरी समृध्द होऊ शकतोत्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी योजनांबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
           
            सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगोला येथील शेतकऱ्यांनी स्वत:ला कसे समृध्द केले याबाबत माहिती दिली.त्यांच्याप्रमाणे विदर्भातील शेतकऱ्यांनी समृध्द होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पाण्याचे योग्य नियोजन करुन प्रयत्न करणे गरजेचे आहेयासाठी कृषी विभागाची जबाबदारी महत्तवाची असल्याचे सांगितलेडॉबाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजना शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जावून राबविण्यासाठी कृषी विभागाचे याकडे त्यांनी लक्ष वेधलेअसे झाले तर पश्चिम महाराष्ट्रातील सधन शेतकऱ्यांसारखे विदर्भातीलही शेतकरी सधन व समृध्द होतीलअसा विश्वास सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.
            हे कृषी चर्चासत्र व प्रदर्शन तीन दिवस चालणार आहेप्रदर्शनात उच्च कृषी तंत्रज्ञानाचे लाईव्ह मॉडेल आहे.कृषी व संलग्न विभागातील योजनांची माहिती विविध स्टॉल्सच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.तसेच चर्चासत्रामध्ये रेशीम व्यवसायमत्स्यव्यवसाय,वनशेतीमधूमक्षकिा पालनकुक्कुटपालनइत्यादी कृषीपूरक जोडधंदे यावर तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहेकृषी तंत्रज्ञानामध्ये पॉलिहाऊस,शेडनेट हाऊसमध्ये भाजीपालाफुलपीके उत्पादनइस्त्रायल पध्दतीने संत्रा लागवडभाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर विविध स्टॉल्सच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहेशेतकरी गटाव्दारे उत्पादित कृषी मालाची विक्रीआणि कृषी विभाग व आत्मा यंत्रणेचे विविध उपक्रम यावर तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.