Monday 31 July 2017

महाविद्यालयामध्ये संगणक ‘टॅब बेस’ प्रणालीद्वारे शिकाऊ अनुज्ञप्ती


नागपूर, दि. 31 : प्रादेशिक परिवहन (शहर) कार्यालयातर्फे महाविद्यालयामध्ये संगणक ‘टॅब बेस’ प्रणालीद्वारे शिकाऊ अनुज्ञप्ती ऑनलाईन चाचणी घेऊन शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्याबाबत धोरण निश्चित करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून परिवहन आयुक्तांनी मान्यता दिली आहे.
महाविद्यालयांमध्ये कम्प्युटर लॅब असावी त्यात कमीत कमी 10 संगणकाच्या जोडणीचा लॅन नेटवर्क किमान 2 एमबीपीस क्षमतेची जोडणीची तसेच प्रिंटरची सुविधा असावी, ज्या महाविद्यालयात सदर अट वगळता अन्य सुविधा उपलब्ध आहेत अशा पात्र कॉलेजात संबंधित  प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी टॅब आधारे चाचणीची सुविधा उपलब्ध करु शकतील., शासन मान्यता प्राप्त शिक्षण संस्था असावी., महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात यावी., महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची चाचणीची व्यवस्था महाविद्यालयाने नि:शुल्क करावी., चाचणीचे वेळापत्रक परिवहन कार्यालयाच्या मानयतेने संबंधित  महाविद्यालयाने तयार करावे., चाचणी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज व्यवस्थापनाने तयार करावी., सर्व अर्जदाराचे अर्ज महाविद्यालयाने संकेतस्थळावर अपलोड करावे. ऑलनाईन शुल्क भरावे, उमेदवाराचे वय पत्ता या आवश्यक कागदपत्राच्या अर्जाची छाननी कॉलेज व्यवस्थापनाने करावी ( पत्ता, जन्मतारीख इ. च्या छायांकित प्रती व शुल्क भरणा). अर्जामधील माहिती चुकीची आढळल्यास त्याबाबत संबधित महाविद्यालय पूर्णत: जबाबदार राहील.
इच्छुक महाविद्यालयांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर (शहर) येथे, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नावे सदर सुविधेसाठी आगावू अर्ज करावा, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment