मुंबई, दि. 27 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असणाऱ्या शाळांमधील रिक्त असलेली कर्मचाऱ्यांची पदे भरताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ही प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित आणि पूर्णत: पारदर्शक असेल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी दिली.
रिक्त पदांची भरती करण्यासाठी निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय काही पदे पदोन्नतीने देखील भरणार असल्याचेही श्री. सवरा यांनी सांगितले. या शाळांमध्ये एक हजार 57 रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आहेत. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा दहा वर्षे वा अधिक असेल अशा कर्मचाऱ्यांचाही भरती प्रक्रियेत विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य ॲङ राहुल नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
No comments:
Post a Comment