Tuesday, 5 September 2017

महाराष्ट्रातील 25 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान


नागपूर5 : महाराष्ट्रातील 25 शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी आज उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले .
             येथील विज्ञान भवनात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्यावतीने शिक्षक दिना निमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरराज्यमंत्री उपेंद्र कुशवाह आणि डॉ. सत्यपाल सिंहसचिव अनिल स्वरूप यावेळी उपस्थित होते.
               उल्लेखनीय योगदानासाठी यावर्षी देशभरातील एकूण 319 शिक्षकांना  राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2016-17’ प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील एकूण 25 शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले. यात 17 प्राथमिक शिक्षकांपैकी 2 शिक्षकांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. माध्यमिक शिक्षकांपैकी एका  शिक्षकास विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. पदक,प्रमाणपत्र आणि 50 हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
17 प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नागोराव तायडेमहानगर पालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र.2,घाटकोपर(प.) (मुंबई), उज्ज्वला नांदखिलेजिल्हा परिषद प्राथमिक शाळासाडेसतरा नळी,ता.हवेली (पुणे)शोभा मानेजिल्हा परिषद प्राथमिक शाळाचिंचणीता. तासगांव(सांगली), तृप्ती हतिसकरमहानगर पालिका प्राथमिक शाळाप्रभादेवी (मुंबई), सुरेश शिंगणेजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळापिंपळगांव चिलमखापो. उंबरखेडता. देऊळगांव राजा(बुलडाणा), संजिव बागुल,जिल्हा परिषद प्राथमिक शाळासांभवेपो. माळे  ता.मुळशी (पुणे), राजेशकुमार फाटे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळाडोंगरगांवपंचायत समिती लाखनी (भंडारा), ज्योती बेलावळे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळाकेवनीदिवेपो. काल्हेरता. भिवंडी (ठाणे), अर्जुन ताकटेजिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अहेरगांव, ता. निफाड(नाशिक), रुख्मिणी कोळेकरजिल्हा परिषद प्राथमिक शाळावांगी-2,  ता. करमाळा (सोलापूर), रामकिशन सुरवसेजिल्हा परिषद प्राथमिक शाळानागोबावाडीता.औसा (लातूर), प्रदीप शिंदेजिल्हा परिषद प्राथमिक शाळाशिलापूर,ता.जि.(नाशिक),अमीन चव्हाणजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळानिंभापो. देऊरवाडाता. दिग्रस (यवतमाळ), उर्मिला भोसलेजिल्हा परिषद प्राथमिक शाळामहालदारपुरी,ता.वाशी (उस्मानाबाद), गोपाल सुर्यवंशी ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळागंजुरवाडीता.जि.(लातूर) या शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  
 प्राथमिक शिक्षकांच्या विशेष श्रेणी अंतर्गत अर्चना दळवीजिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बाहुलीता.हवेली (पुणे), सुरेश धारवजिल्हा परिषद प्राथमिक शाळा निफाड क्र.2 ता. निफाड(नाशिक) यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. उपरोक्त पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक हे सहायक शिक्षक आहेत.

8 माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 माध्यमिक शाळांच्या शिक्षकांमध्ये तीन मुख्याध्यापक व पाच सहायक शिक्षकांना सन्मानीत करण्यात आले. या शिक्षकांमध्ये नंदा राऊतमोतीलाल कोठारी विद्यालयकडा,ता.आष्टी (बीड), स्मिता करंदीकरअहिल्यादेवी मुलींची उच्च माध्यमिक शाळाहोळकरवाडा,शनिवार पेठ, पुणे (पुणे), नंदकुमार सागर (मुख्याध्यापक), जिजामाता उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय,जेजुरीता. पुरंदर (पुणे), शर्मिला पाटीलअं‍बिका विद्यालयकेडगांवता.जि.(अहमदनगर), सुनील पंडीत (मुख्याध्यापक), प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,नवीपेठ ,अहमदनगर (अहमदनगर), कमलाकर राऊतयोगेश्वरी नुतन विद्यालयपरळी रोड,अंबाजोगाई (बीड), संजय नारलवार (मुख्याध्यापक), प्रियंका उच्च माध्यमिक शाळाकानेरीता. जि. (गडचिरोलीयांचा समावेश आहे.         

माध्यमिक शिक्षकांच्या विशेष श्रेणी अंतर्गत डॉ. मिनल सांगोळे, मुक-बधिर शाळाउत्तर अंबाझरी रोडशंकरनगर नागपूर, (नागपूर)  यांना यावेळी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment