Sunday, 29 October 2017

जनता आणि शासनातील संवाद दृढ करणारी मॅरेथॉन - अरूण जेटली


कस्टम हाफ मॅरेथॉन - 2017

मुंबई,दि. 29 : कस्टम  हाफ मॅरेथॉन- 2017’ ही जनता आणि शासन यांच्यातील संवाद दृढ करणारी मॅरेथॉन ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.

          बेलार्ड इस्टेट येथे सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातर्फे आयोजित पहिली कस्टम हाफ मॅरेथॉन 2017 च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. जेटली बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्लावित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार,पर्यटनमंत्री जयकुमार रावलसीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्त राजीव टंडन यांसह सिनेकलाकार,उद्योजकसर्व वयोगटातील मॅरेथॉन स्पर्धक यावेळी उपस्थित होते.

        श्री.जेटली म्हणालेशासनाच्या नाविन्यपूर्ण  उपक्रमांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा मुंबईचे स्पिरीट दाखविणारा आहे. सर्व वयोगटातील नागरिकांचा सहभाग असल्यामुळे ही मॅरेथॉन एकता दर्शवणारी ठरूनऐतिहासिकसांस्कृतिक वारसा दृढ करणाऱ्या उपक्रमांना समाजातील जागरुक नागरिक नेहमीच प्रतिसाद देतील अशी आशा श्री.जेटली यांनी  यावेळी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment