मुंबई, दि. 5 : खत नियंत्रण कायद्यांतर्गत न येणारी सेंद्रीय व इतर सर्व उत्पादनांची विक्री परवानाधारक दुकानांमधून न करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
केंद्रीय किटकनाशक मंडळाद्वारे मान्यता न मिळालेले जैविक किटकनाशके व पीक वाढ संजीवके आदी वेगवेगळ्या नावाने विक्री होतात. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या अधिपत्याखालील परवानाधारक दुकानातून फक्त खत नियंत्रण आदेश 1985 व किटकनाशक नियंत्रण मंडळाद्वारे मान्यता प्राप्त असलेल्या कृषी निविष्ठांचीच विक्री करण्यात यावी. बिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठांची विक्री शासन परवानाधारक विक्री केंद्रामधून आता करता येणार नाही.
No comments:
Post a Comment