मुंबई,
दि. 31 :विमुक्त
जाती, भटक्या जमाती,
इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गामधील पात्र विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क,
निर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय फीचा लाभ मंजुरीसाठी लाभार्थ्यांना
थेट लाभ हस्तांतरण योजना (DBT) लागू
करण्यात आली आहे. या अनुषंगाने विजाभज, इमाव
व विमाप्र कल्याण विभागांतर्गत मंजूर करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती,
शिक्षण शुल्क, निर्वाह
भत्ता व इतर अनुज्ञेय फीचा लाभ मिळण्यासाठीचे अर्ज वित्तीय वर्ष 2017-18
पासून https://mahadbt.gov.in हे
संकेतस्थळ विकसीत करण्यात आले आहे.
सर्व
संबंधितांनी उपरोक्त संकेतस्थळावर त्यांचे अर्ज तात्काळ अपलोड करण्याची कार्यवाही
करावी. यासाठी काही तांत्रिक अडचणी किंवा शंका उद्भवल्यास DBT
टोल फ्री क्र. 18001025311
किंवा mahadbt.helpdesk@maharashtra.gov.in या
ई-मेलवर संपर्क साधावा, असे
सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, मुंबई शहर यांनी कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment