Friday 22 December 2017

पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल - पर्यावरण मंत्री रामदास कदम

नागपूरदि.22 : समुद्र किनारी सागरी नियमन क्षेत्र व पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करुन बांधकाम केल्या प्रकरणी पर्यावरण कायदद्यानुसार संबंधीत अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानपरिषदेत सांगितले.
            सदस्य श्री. किरण पावसकर यांनी मुरुड-जंजिराबोरलीबार्शी व नांदगांव (जि.रायगड) येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करुन काही अधिकाऱ्यांनी बांधाकाम व्यावसायिकांच्या संगनमताने आलिशान बंगले बांधल्या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला होत. त्यावर उत्तर देताना श्री. कदम पुढे म्हणाले अलिबाग व मुरुड तालुक्यातील समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या अनुक्रमे 145 व 167 बांधकाम धारकांना तहसीलदारांकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच अलिबाग तालुकयातील 61 व मुरुड तालुक्यातील 101 दाव्यामध्ये अनाधिकृत बांधकामाबाबत न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. लवकरच ही सर्व प्रकरणे केंद्रीय हरीत लवादाकडे वर्ग झाल्यावर पुढील दोन तीन महिन्यात या संदर्भात निर्णय येईल.
            यावेळी झालेल्या चर्चेत पर्यावरण राज्य मंत्री प्रवीण पोटे-पाटीलसदस्य सर्वश्री जयंत पाटीलभाई जगताप यांनी भाग घेतला.
0000

No comments:

Post a Comment