Wednesday 28 February 2018

विधान परिषद इतर कामकाज : परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन अंशदानाचे 1182 कोटी रुपये वितरीत करणार -विनोद तावडे


मुंबईदि. 28 परीभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत खाती उघडलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या मासिक अंशदानाच्या सममुल्य रक्कम  शासनाचा हिस्सा म्हणून 1182 कोटी व कर्मचा-यांचे मासिक अंशदान व या वरील व्याजाची रक्कम म्हणून 130 कोटी रुपये एवढी रक्कम वितरीत करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत दिली.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संघटनेने त्यांच्या काही मागण्यांसाठी   12 वीच्या परिक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. या संघटनांसोबत झालेल्या बैठकीनंतर मान्य करण्यात आलेल्या मागण्यांसंदर्भात त्यांनी विधान परिषदेत तसेच विधान सभेत निवेदन सादर केले.
श्री. तावडे यांनी सांगितलेशालेय शिक्षण विभागाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार एक नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिकमाध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी परिभाषित निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या मासिक अंशदानातील शासनाचा हिस्सा देण्याच्या निर्णयामुळे सुमारे 50 हजार 26 एवढ्या प्राथमिक शाळांमधील व 47 हजार 292 एवढी माधमिक व उच्च माध्यमिक शाळंमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होणार आहे.
मान्यता प्राप्त खाजगी कायम अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमधील कायम शब्द वगळण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला होता. या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या नावांची यादी करण्याचे नागपूर अधिवेशनात ठरले होते. त्या प्रमाणे आज काही कनिष्ठ महाविद्यालयांची यादी घोषीत करण्यात येत असून लवकरच पूर्ण यादी जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
००००

No comments:

Post a Comment