Wednesday 28 February 2018

शालेय शिक्षण विभागाची माहिती गुगल फॉर्मवर 11 मार्चपर्यंत भरावी

वृ.वि.  580                                                                                        
                                                                                                     दि. 28 फेब्रुवारी, 2018



मुंबई, दि. 28:   शालेय शिक्षण विभागाअंतर्गत शासनास आवश्यक असणाऱ्या माहितीसाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आलेले आहेत.   गुगल फॉर्मच्या सहाय्याने माहिती संकलित करण्यात येत असून संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी आवश्यक ती माहिती गुगल फॉर्मवर 11 मार्चपर्यंत भरण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.
मुख्याध्यापकांनी संबंधित शाळेची माहिती भरताना वेगवेगळया वर्गवारीमध्ये माहिती भरावी जसे :

स्वयंअर्थ सहाय्यित तत्वावर परवानगी दिलेल्या नवीन शाळा/दर्जावाढ नुसार सुरु झालेल्या
शाळांची माहिती
 स्वयंअर्थ सहाय्यित तत्वावर शाळांना शासनाने सन 2013-14 पासून परवानगी दिलेली आहे. अशा शाळांना युडायस क्र.दिलेले आहेत अद्यापही काही शाळा युडायस शिवाय सुरु आहेत. त्या शाळांना युडायस नंबर देण्यासाठी तसेच या शाळा शासनाने परवानगी दिल्यापासून विहित केलेल्या 18 महिन्याच्या शाळा सुरु होणे आवश्यक त्या सुरु झाल्या आहेत किंवा नाही याबाबतची माहिती घेण्यासाठी संबंधित शाळांनी गुगल फॉर्मवर माहिती भरणे आवश्यक आहे. विहित मुदतीत माहिती भरण्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक हे जबाबदार असतील. त्यांनी माहिती न भरल्यास सदर शाळा अनधिकृत समजण्यात येईल. वेब लिंक-http://goo.gl/forms/7UKfAddgPic3l00l.

राज्यातील विना अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक (इंग्रजी माध्यम वगळून) शाळा आणि वर्ग तुकडी यांची विना अनुदानावर असल्याबाबतची माहिती

 शासनाने वेळोवेळी विना अनुदान तत्वावर शाळा/तुकड्यांना शासन परवानगी दिलेली आहे. या शाळांना अनुदान देखील सुरु केलेले आहे. परंतू अद्यापही काही विना अनुदान तत्वावर शाळा/तुकड्या सुरु आहेत. याबाबत नेमक्या किती शाळा/तुकड्या विना अनुदान तत्वावर सुरु आहेत याबाबतची माहिती संकलित करावयाची आहे. शिक्षणाधिकारी यांचेकडून माहिती संकलित केलेली आहे. परंतू सदर माहितीमध्ये सर्वच शाळा समाविष्ठ झाल्या असतील असे नाही. अथवा शाळा वंचित राहु नये म्हणून याद्वारे सर्वच सध्या विना अनुदान तत्वावर असलेल्या शाळा/तुकडीची माहिती संकलित करता यावी म्हणून हा गुगल फॉर्म तयार करण्यात आलेला आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही माहिती मुदतीत भरावी व माहिती मुदतीत न भरल्यासशाळा/तुकडी स्वयंअर्थ सहाय्यिता शाळा/तुकडी म्हणून कार्यवाही करण्यात येईल. वेब लिंक-http://goo/gl/forms/ho2Qx4g5vontwao82.

दि. 02 मे2012 नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणी शाळा मुख्याध्यापक यांनी भरावयाची माहिती

दि. 02.05.2012 नंतर नियुक्ती देण्यात आलेले शिक्षक ज्यांची मा.आयुक्तशिक्षण यांच्याकडे चौकशी करुन वैयक्तिक मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात आली त्याबाबत मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मान्यता दिलेल्या अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक/माध्यमिक शाळांतील शिक्षकांबाबत विभागीय  शिक्षण उपसंचालक यांच्याकडे व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या बाबतीत शिक्षण संचालक (माध्य व उच्च माध्य.)पुणे यांनी सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक/संबंधित शिक्षक यांनी गुगल फॉर्मवर माहिती भरावी. माहिती न भरल्यास सुनावणीतील निर्णय देण्यास विलंब/विरोधात गेल्यास संबंधित शिक्षक/शाळा/संस्था जबाबदार राहणार आहे. वेब लिंक- http://goo/gl/forms/FHCInF62iu2SReBI2.
सदर माहिती गुगल फॉर्मवर भरणे आवश्यक असून संकेतस्थळाची कालमार्यादा असल्याने या कामाला प्राधान्य देण्यात यावे असे आवाहन शालेय ‍शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.
००००

No comments:

Post a Comment