Wednesday 28 February 2018

लक्षवेधी सूचना 2 : लोटे परशुराम येथील नविन सामुहिक सांडपाणी प्रक्रिया संयत्रणा उद्या एमआयडीसीच्या ताब्यात देणार - पर्यावरण मंत्र्यांची माहिती



मुंबईदि. 28 : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत नव्याने सामुहिक सांडपाणी प्रक्रिया संयत्रणेचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून दि. 1 मार्च पासून हे केंद्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे देण्यात येईलअशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली.
यासंदर्भात सदस्य भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना श्री. कदम म्हणाले कीसामुहिक सांडपाणी संयत्रणेतून खाडीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याची गुणवत्ता विहीत मर्यादेपेक्षा जास्त असल्याने एमआयडीसीने या यंत्रणेच्या अद्ययावतीकरणासाठी व विस्तारीकरणासाठी 26 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्याचे काम 80 टक्के झाले आहे.
या औद्योगिक वसाहतींमधील 65 कंपन्यांची तपासणी करण्यात आली आहे त्यातील सहा कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. दरम्याननाशिक येथील औद्योगिक वसाहतींमधील प्रदुषणाबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेण्यात येईल असे त्यांनी एका उपप्रश्नाला उतर देतांना सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अजित पवारसंजय कदमअस्लम शेखश्रीमती देवयानी फरांदे यांनी भाग घेतला.
००००

No comments:

Post a Comment