Wednesday 28 February 2018

विधानपरिषद इतर कामकाज : अनिष्ट प्रथेविरुद्ध काम करणाऱ्या तरुणांना संरक्षण देण्यात येईल - रणजित पाटील

वृ.वि.  577                                                                                       
                                                                                                         दि. 28 फेब्रुवारी, 2018


        मुंबईदि. 28 : कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथेविरोधात समुपदेशन करुन सुधारणा करणाऱ्या या समाजातील सुशिक्षित तरुणांना आवश्यक ते संरक्षण देण्यात येईलअसे गृह राज्यमंत्री (शहरे) रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
            श्री. पाटील पुढे म्हणालेकौमार्य चाचणी करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारीवरुन पुणे पोलीस स्टेशनमार्फत चौकशी करण्यात आली आहे. समाजातील अनिष्ट  प्रथा विरुद्ध तक्रार करण्यास संघटना पुढे आल्यास त्यांना संरक्षण देण्यात येईल. तसेच याबाबत स्वयंस्फर्तीने कार्यवाही करण्याबाबत पोलीसांना सूचना देण्यात येतील. कौमार्य चाचणीबाबत जाहीर वाच्यता केल्यास याबाबत गुन्हा नोंदविला जाईल व कार्यवाही करण्यासाठी सर्व पोलीस स्थानकांना सूचना देण्यात येतील. एका महिन्याच्या आत बैठक घेण्यात येवूनदर तीन महिन्यांनी याबाबतचा आढावा घेण्यात येईलमहाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंदबंदी व निवारण) आदी नियमानुसार कार्यवाही करण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.
            ही लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य डॉ. निलम गोऱ्हे यांनी मांडली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य हेमंत टकलेविद्या चव्हाणॲड. हुस्नबानु खलिफे यांनी या लक्षवेधीच्या चर्चेत सहभाग घेतला.
000

No comments:

Post a Comment