मुंबई, दि.19: ब्रुसेल्लोसिसबाधित पशुधनापासून पशुचिकित्सकांना ब्रुसेल्लोसिस
रोगाची लागण होऊ नये म्हणून नागपूर विभागात 2015-16 आणि 2016-17 मध्ये चार
महिन्यावरील व एक वर्षाखालील 1 लाख 47 हजार 568 कालवडींना ब्रुसेल्लोसिसची लस
टोचण्यात आलेली आहे. त्यामुळे ब्रुसेल्लोसिसच्या प्रमाणात १८.३५ टक्के वरून ०.७४ टक्के एवढी घट झाली असून पुढील दोन वर्षांत हा आजार
राज्यातून नष्ट होईल,अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत
दिली.
सदस्य प्रशांत बंब यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला
होता. त्यासंदर्भात श्री. खोतकर यांनी सांगितले, 2011-12 ते 2017-18 या कालावधीत नागपूर विभागातील 14.69 टक्के
पशुचिकित्सकांना ब्रुसेल्लोसिस बाधित पशुधनापासून ब्रुसेल्लोसिस हा आजार झाल्याचे
आढळून आले आहे. पशुधनाच्या जननेंद्रिय तपासणी व पशुप्रजननसंबंधी कामे करत
असल्यामुळे त्यांना ब्रुसेल्लोसिसबाधित पशुधनापासून हा आजार होण्याची शक्यता असते.
नागपूर विभागात पशुधनांना ब्रुसेल्लोसिस रोगाची लागण
व त्याचा प्रसार होऊ नये म्हणून 2015- 16 आणि 2016-17 मध्ये चार महिन्यावरील व एक
वर्षाखालील 1 लाख 47 हजार 568 कालवडींना ब्रुसेल्लोसिसची लसमात्रा टोचण्यात आलेली
आहे. पशुप्रजननासंबंधी कामे करताना बाधित जनावरांपासून या रोगाची बाधा होऊ नये
म्हणून पशुचिकित्सकांना हातमोज्यांचा नियमितपणे पुरवठा करण्यात येत असून त्याचा
वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
००००
No comments:
Post a Comment