बुलडाणा, दि.3: येथील ग्रद्रे सार्वजनीक वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी आज सदिच्छा भेट दिली.
यावेळी कृषि मंत्री तथा पालकमंत्री पाडुंरंग फुंडकर, गृह राज्यमंत्री रणजीत पाटील, आमदार सर्वस्वी संजय कुटे, आकाश फुंडकर, चैनसुख संचेती, हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे, बुलडाणा नगर पालिकेच्या नगराध्यक्षा नजमुन्नीसा सय्यद, अध्यक्ष केशवराव एकबोटे, सचिव उदय देशपांडे, ग्रंथपाल नेमीनाथ सातपुते, संचालक गोकूल शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भुपृष्ठ वाहतूक व जहाज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गद्रे वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वाचनालयास शुभेच्छा दिल्या. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस आणि भुपृष्ठ वाहतूक व जहाज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येथील श्रीमती मंगला तारे अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संचालक, वाचक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment