नागपूर, दि. 17 : गुडीपाडवाच्या पर्वावर विकासक व प्लॉट विक्रेत्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात फ्लॅट व प्लॉटसंबंधिची जाहीरात करण्यात येते. या जाहिरातींवर महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचा नोंदणी क्रमांक टाकणे अनिवार्य असल्याने विकासक व प्लॉट विक्रेत्यांनी महारेरामध्ये नोंदणी करावी, असे महारेराचे उपसचिव गिरीश जोशी यांनी कळविले आहे.
नोंदणीकृत नसलेल्या विकासक व प्लॉट विक्रेत्यांनी कुठल्याही प्रकारची जाहिरात तसेच करारनामा केल्यास अशा व्यक्तीं किंवा संस्थांविरुद्ध दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
महारेरा कार्यालय स्थलांतरीत
महारेराचे अस्थायी कार्यालय सोमवार, दि. 19 मार्च 2018 पासून प्रशासकीय इमारत क्र. 1 उद्योग भवनच्या बाजूला व विभागीय आयुक्त, कार्यालय नागपूर यांचे परिसरात स्थलांतरीत करण्यात येणार असून विकासक व प्लॉट विक्रेत्यांना या कार्यालयात नोंदणी करता येणार असल्याचे महारेराचे उपसचिव गिरीश जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment