Wednesday, 4 July 2018

दिलखुलास कार्यक्रमात पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांची मुलाखत


          मुंबई,दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांची पोलीस आयुक्त मुंबई म्हणून कार्यरत असताना 'मुंबई शहराची कायदा व सुव्यवस्था' या विषयावर घेतलेली विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत उद्या गुरुवार दि . 5 जुलै आणि शुक्रवार दि. 6 जुलै रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन सकाळी7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
        मुंबई शहराची कायदा व सुव्यवस्था,राखण्यासाठीदहशतवादी कारवाया रोखण्यासाठी शासनाकडून राबविण्यात ये असलेल्या उपाययोजना, मुंबई शहरातील पोलीस ठाण्यांचे बळकटीकरण,पोलीस आणि जनतेतील दरी कमी व्हावी यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न,सायबर पोलीस ठाण्यांची कार्यकक्षा, शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा, आपत्कालीन स्थितीत कार्यरत असणारी पोलीस यंत्रणा, डायल  १०० यंत्रणेसह विविध उपक्रमांचे लोकार्पण या विषयांची सविस्तर माहिती श्री. पडसलगीकर यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
0000

No comments:

Post a Comment