Friday, 6 July 2018

रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनविषयक कॉफीटेबल बूक, संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन


नागपूर, दि. 6 :रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या वतीने निर्मीत 'रत्नागिरी - एक स्वच्छंद मुशाफिरी' या मराठीतील तर Ratnagiri - Shores of wanderlust या इंग्रजीतील कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेआज येथील रामगिरी निवासस्थानी प्रकाशन करण्यात आले.

रत्नागिरीतील पर्यटन स्थळांची माहितीदेणाऱ्या www.ratnagiritourism.in  या संकेतस्थळाचाही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार सदानंद चव्हाण, आमदार रमेश लटके,  जिल्हाधिकारी पी. प्रदीप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल आदी यावेळी उपस्थित होते.

कॉफीटेबल बुकमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन वैभवाची  माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध किल्ले, सागर किनारे, ऐतिहासिक वास्तू, पुरातन गुहा, मंदिर, धबधबे आदींची माहिती समाविष्ट आहे. जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव, जैवविविधता, कला, महोत्सव, यात्रा-जत्रा, कोकण रेल्वे आदींची माहिती, छायाचित्रांसह देण्यात आली आहे. संकेतस्थळावरही जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची इत्यंभूत माहिती इंग्रजी आणि मराठी भाषेत समाविष्ट करण्यात आली आहे.
0000

No comments:

Post a Comment