Thursday, 5 July 2018

परिवहन मंत्री दिवाकर रावते पूर्व विदर्भ दौऱ्यावर


      छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेचा घेणार आढावा
 नागपूर दि. 5 परिवहन व खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते हे शनिवार दि. 7 जुलै रोजी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे
शनिवार दि. 7 जुलै रोजी सकाळी 9 वाजता नागपूर येथून मोटारीने भंडाराकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती व कर्ज उपलब्धी योजनेची आढावा बैठक घेतील. त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे सकाळी 11 वाजता गोंदियाकडे प्रयाण.
दुपारी 12 वाजता गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती व कर्ज उपलब्धी योजनेची आढावा बैठक. दुपारी 1 वाजता मोटारीने गडचिरोलीकडे प्रयाण.
दुपारी 3 वाजता गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती व कर्ज उपलब्धी योजनेची आढावा बैठक. दुपारी 4 वाजता मोटारीने चंद्रपूरकडे प्रयाण.
सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आगमन. सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती व कर्ज उपलब्धी योजनेची आढावा बैठक. सायंकाळी 6 वाजता मोटारीने नागपूरकडे प्रयाण. रात्री 8 वाजता नागपूर येथे आगमन व मुक्काम.

No comments:

Post a Comment