Friday 31 August 2018

चहा स्टॅालद्वारे जमा ५१ हजार रुपयांचा निधी केरळच्या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द

अहमदपूरच्या डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या चिमुकल्यांची सहृदयता
मुंबईदि. ३१ : चहा स्टॅालच्या कमाईतून निधी उभा करून तो केरळच्या पूरग्रस्तांसाठी देण्याची सहृदयता लातूरच्या अहमदपूर येथील डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या चिमुकल्यांनी दाखविली आहे. हा ५१ हजार रुपयांचा निधी आज या चिमुकल्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा शासकीय निवासस्थानी सुपूर्द केला.
केरळमधील प्रलंयकारी पुरामुळे तेथील जनतेचे जीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणि विविध प्रकारच्या सहाय्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनानेही वैद्यकीयआर्थिक आणि अनुषंगिक मदत यापुर्वीच पाठविली आहे.
केरळच्या जनतेला आपत्तीवर मात करता यावी यासाठी विविध प्रकराची मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद म्हणून अहमदपुरच्या डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चहाचा स्टॅाल सुरू केला. यातून चहा विक्री करून सुमारे ५१ हजार रुपयांचा निधी जमा झाला. हा निधी विद्यालयातील हरिओम मुसळेविश्वांभर मुलगीरसंजय केंद्रेशुभम चित्ते या विद्यार्थ्यांनी धनादेशाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधतत्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.
यावेळी आमदार विनायक पाटील यांच्यासहविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती यादवशिक्षक हरिनारायण साबदेनारायण केरलेपरमेश्वर जगतापधोंडिराम परांडे आदी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment