नागपूर, दि. 04 : 17 वर्षीय वयोगटातील मुला-मुलींकरिता महानगरपालिका स्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे
शुक्रवार, दिनांक, 7 सप्टेंबरपासून नंदनवन येथील महिला महाविद्यालयाच्या
प्रांगणावर आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेची सुरुवात मुलींच्या
खो-खो ने होणार आहे. 17 वर्षे वयोगटातील मुलांची खो-खो स्पर्धा दिनांक 8 सप्टेंबर
रोजी घेण्यात येईल. स्पर्धेत निवड झालेल्या संघाना 14 सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे
आयोजित नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा तसेच 1 ऑक्टोबर रोजी आयोजित राष्ट्रीय
स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेसंबंधी अधिक माहितीकरिता
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ www.nagpursports.com अथवा पराग बन्सोले
9890985950, पंकज करपे 9021361903, वनोद ठिकरे 9422154606 या क्रमांकावर संपर्क
साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment