मुंबई, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त इंद्रा
मालो यांची ‘राष्ट्रीय पोषण महिना : उपक्रम’ या विषयावर विशेष
मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या मंगळवार
दि. ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका
श्रीमती मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यात दि. १ सप्टेंबरपासून राबविण्यात येणारा राष्ट्रीय पोषण
महिना राबविण्याचा एकात्मिक बाल विकास आयुक्तालयाचा प्रमुख उद्देश, आयसीडीएसच्या
माध्यमातून माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, तसेच पुरविण्यात येणाऱ्या
खाद्यपदार्थांचा दर्जा, गरोदर व स्तनदा मातांनी घ्यावयाची काळजी, स्तनपानाचे महत्व, कुपोषणमुक्तीसाठी
करण्यात येत असलेल्या उपाययोजना, बालकांचा
पोषण आहार व लसीकरणाचे महत्व या विषयांची माहिती श्रीमती मालो यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली
आहे.
००००

No comments:
Post a Comment