Monday, 3 September 2018

'जय महाराष्ट्र'कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले


मुंबई.दि.3: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात 'जेष्ठ नागरीक धोरण' या विषयावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होईल.निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
ज्येष्ठ नागरिक धोरणाचे मुख्य उद्देश व त्या अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा, वृद्ध मित्र संकल्पना, स्वयंसेवी संस्थांमार्फत विरंगुळा केंद्र व स्मृतीभ्रंश केंद्रांची स्थापना, ज्येष्ठ नागरिक कक्षाचे कार्य, त्यांना योग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाने आखलेली मार्गदर्शक तत्वे, ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी वार्डन योजना तसेच कृती आराखडा याविषयाची माहिती श्री. बडोले यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
000

No comments:

Post a Comment