मुंबई, दि. 5 : विविध मराठी मालिकांमधून
आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांच्या निधनाने कला
क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, या शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी
श्रद्धांजली वाहिली आहे.
शुभांगी जोशी यांनी ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील
गौरीच्या आजीची , ‘कुंकू, टिकली
आणि टॅटू’
या
मालिकेतील जिजीची साकारलेली भूमिका अतिशय लोकप्रिय झाली. अल्पावधीतच विविध मराठी
मालिकांद्वारे घरा-घरांत पोहोचलेल्या शुभांगी जोशी यांच्या निधनाबद्दल सांस्कृतिक
कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दुःख व्यक्त केले आहे.
००००
No comments:
Post a Comment