Monday, 10 September 2018

तुळजापूर-लातूर आणि रेणापूर- परळी मार्ग भूसंपादनाच्या तक्रारी तातडीने निकाली काढा - महसूल मंत्री


मुंबई, दि. 10 : तुळजापूर-औसा-लातूर महामार्गाच्या भूसंपादन मधील जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिलात असलेली प्रकरणे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निकाली काढावीत.  औसा तसेच रेणापूर परळी मार्गाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निर्देश दिले.
तुळजापूर-औसा-लातूर महामार्ग व रेणापूर-पानगाव-परळी रस्त्याच्या भूसंपादन संदर्भात आज महसूल मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे, कृषी सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अभिमन्यू पवार यांच्यासह अधिकारी, संबंधित गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
तुळजापूर-औसा-लातूर महामार्गाच्या भूसंपादनाविरुद्ध शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले आहे. या अपिलांची सुनावणी करून निर्णय घ्यावा, अशा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच औसा व रेणापूर येथील 24 मीटर रस्त्याच्या आत मध्ये येणाऱ्या जमिनींची संयुक्त मोजणी करून एक महिन्यात अहवाल द्यावा, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
0000

No comments:

Post a Comment